Aditya Kulkarni

Inspirational Romance


2.5  

Aditya Kulkarni

Inspirational Romance


भेट -7

भेट -7

2 mins 15.9K 2 mins 15.9K

शांत मनाने मी परत स्पर्धा सभागृहात येऊन बसलो

स्पर्धा संपली. बक्षीस घेऊन मी आनंदाने परत निघालो. दुपारी तिच्याशी बोलणं झाल्यावर मी phone सायलेंट करून ठेवला होता .

बाहेर पडलो आणि पहिला मेसेज तिला केला. रिप्लाय ❤❤❤❤ एवढाच आला .

पोहचायला उशीर होणार होता म्हणून मग वाटेतच खायला थांबलो. ऑर्डर दिल्यावर फोन चेक केला .

Call me एवढीच अक्षरं होती .

कॉल केला.

' आदि .. '

'बोल बाळा ..'

' मला कळत नाहीये '

' काय '?

' आपल्या दुपारच्या बोलण्यावर काय रिअॅक्ट होऊ ते '

' का ' ?

' मला विचारच करता येत नाहीये ....म्हणजे मी दुपारपासून आपलं पहिल्या भेटीपासून बोलणं आठवत्ये ... M totally blocked '

' पण एवढ्या घाईत निर्णय का घेत्येस ... वेळ जाऊ दे की ...Take your own time '

' पण माझ्या डोक्यातून ते विचार जातच नाहीयेत , त्याचं काय '?

' विचार करूच नको ना ..! तुझं daily routine follow कर फक्त '

'............'

' नक्की काय होतंय बाळा तुला ...'?

' तू इथे का नाहीयेस आत्ता '?

' आणि आलो तर ...पुढे काय '?

'मला आत्ताच भेटायचं होतं तुला '...

' ******* , तुला पण माहित्ये ..मला आत्ता नाही येता येणार तिकडे ' ....

' हम्मम ...'

' एक गेम खेळूया '?

'आत्ता ' ?

' हो ' .....

' मी एक शब्द सांगेन तो ऐकल्यावर तुझ्या मनात असलेला शब्द तू सांगायचा .... विचार अजिबात करायचा नाही ... त्या क्षणी येणाराच शब्द असायला हवा ' ....

' चालेल ' ....

' करू सुरू ' ?

'हो ' ..

' नांदेड ' ?

'विद्यापीठ महोत्सव '

' गुलाबी ' ?

'प्रेम '

'कॉलेज ' ?

' मी एकटीच '

' PJ आणि मनमुराद हसणं ' ?

' आपली पहिली भेट '.....

' तुझा निघायचा दिवस ' ?

' मुड ऑफ ' ....

' ****पूर ' ... ?

' आठवणी '

' झोप ' ?

' आठवण '

' पुस्तक '.. ? 

' दुसर विश्व '.....

' पाऊस ' ?

'आनंद ' ....

' प्रेम ' ?

' तू ' 

' प्रेमी ' ?

'मी '

काय ....?

' ........... ' 

' बोल ना ' .....

चल बाय .... मी जेवायला जात्ये ...

' अगं ए .... हॅलो ....हॅलो .....U there ?' 

क्रमशः 

© आदित्य शेखर कुलकर्णी .


Rate this content
Log in