Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Jyoti gosavi

Children Stories Drama Tragedy

4.8  

Jyoti gosavi

Children Stories Drama Tragedy

बहरलेला चाफा

बहरलेला चाफा

2 mins
1.2K


आमच्यासमोर एक आजी राहत होत्या. त्यांच्याकडे गोष्टींचा खजिना होता .त्यातील एक आवडती गोष्ट "बहरलेला चाफा"


एक नवरा-बायको व त्याची आई असे तिघेजण राहत होते. परिस्थिती गरिबीची, कसंबसे पोट भरत असत.  त्यामुळे मुलगा धंदा-पाण्यासाठी परदेशी जायचे ठरवतो. घरामध्ये नवपरिणीत बायको असते, तिचा चेहरा उतरतो. हिरमुसली होऊन जाते .त्यावर तिचा नवरा , एक चाफ्याचं झाड घरासमोरच्या अंगणामध्ये लावतो व तिला सांगतो या चाफ्याला रोज पाणी घालत जा व माझी आठवण काढत जा. जेव्हा या चाफ्याला बहर येईल तेव्हा मी घरी येईन, असे वचन देऊन तो जातो. पुढे काही वर्षे जातात सासुसुना गरिबीमध्ये आपले दिवस कंठत असतात. आणि मुलाच्या येण्याकडे डोळे लावून बसलेले असतात.


 एक दिवस त्यांच्या दारामध्ये एक दाढी मिशा वाढवलेला पांथस्थ उतरतो व आजची रात्र मुक्काम करण्याबद्दल विचारणा करतो. त्याबरोबर ती म्हातारी बोलते "नको रे बाबा माझ्या घरात तर , तरणी ताठी सून आहे! माझा मुलगा बाहेरगावी आहे तर अशा कोणा पण माणसाला मी थारा देत नाही. माझ्या मुलाला कळले तर तो मलार रागे भरेल. त्यावर तो माणूस म्हातारीला पैशाचं आमिष देतो, मग म्हातारी तयार होते. त्यानंतर तो जेवणाबद्दल विचारतो आधी म्हातारी नाहीच म्हणते व नंतर पैशाच्या आशेने जेवण द्यायला तयार होते.


त्याची अशी अट असते की सुनेने येऊन जेवण वाढले पाहिजे व जेवताना पंख्याने वारा घातला पाहिजे. म्हातारी पैशासाठी त्याला पण तयार होते. खरे तर या गोष्टीला सून तयार नसते. पण सासूच्या दबावाने तयार होते जेवण झाल्यानंतर तो पांथस्थ माझे पाय खूप दुखतात चालून -चालून थकलो आहे जर तुमच्या सुनेने माझे पाय दाबून दिले तर मी अजून पैसे देईन असे म्हातारीला आमिष देतो व म्हातारी त्याला पण तयार होते आणि सुनेची इच्छा नसताना देखील त्या पांतंस्था चे पाय दाबण्यासाठी पाठवून देते.


सून पाय दाबत असताना रडत असते तिच्या डोळ्यातले अश्रू त्याच्या पायावर पडतात त्याबरोबर ज्या चाफ्याच्या झाडाखाली त्याची बाज टाकलेली असते आणि सून बसून पाय दाबत असते तिथे चाफ्याच्या फुलांचा वर्षाव होतो त्या बरोबर ती रागाने म्हणते..


 "चाफा लावला कुण्या पुरुषा?

पाणी घातलं कुण्या नारी?

बरसलास  

कुठल्या पाप्यावरी " 


त्यावर तो पटकन तिचा हात धरतो आणि म्हणतो 


 "चाफा लावला याच पुरुषा, पाणी घातलं याच नारी ,बरसला आपल्या दोघांवरी"

तो पांथस्थ दुसरा तिसरा कोणी नसून तिचा नवराच असतो त्यानंतर तो स्वतःच्या आईला देखील पैशाच्या लोभापायी असं वागल्याबद्दल चार गोष्टी सुनावतो व बायकोला देखील नको तितका आज्ञाधारकपणा केल्याबद्दल चार गोष्टी ऐकवतो अशी आहे चाफा बहरण्याची गोष्ट.



Rate this content
Log in