Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

kanchan chabukswar

Action

4.0  

kanchan chabukswar

Action

एस्कॉर्ट सौ कांचन चाबुकस्वार

एस्कॉर्ट सौ कांचन चाबुकस्वार

9 mins
268


हल्ली एस्कॉर्ट म्हणून जाणा देखील फारच कठीण झाले आहे. शाळेतले किंवा कॉलेज मधले शिक्षक जेव्हा तरुण मुलांना घेऊन बाहेरगावी किंवा बाहेरच्या देशांमध्ये जातात, तेव्हा आई-वडिलांची फारच अपेक्षा असते कि शिक्षक डोळ्यात तेल घालून मुलiकडे लक्ष देईल. शिक्षकाचं काम पण तेच असतं, पण जसा काही एअरपोर्ट घातला जातो गाठला जातो त्यानंतर मुला-मुलींचे वागण एकदम 360 अंशांनी बदलून जाते. कॉलेजमध्ये असताना हीच का ती मुले, आज्ञाधारक, गोड बोलणारी, आपलं काम व्यवस्थित करणारी, मुला मुलीन बरोबर संयमाने वागणारी असा जबरदस्त प्रश्न शिक्षकांना पडतो.

काही कॉलेजेस आपल्या प्रोफेसर्स पाठवण्याच्या ऐवजी पालकांना सांगतात तुम्ही तुमची मुले घेऊन जा, खरं म्हणजे काही अंशांनी तेच खरे.


एखाद्या कॉम्पिटिशन साठी जेव्हा आपण एखादा चमू घेऊन जात असतो, तेव्हा बहुतेक करून ही जबाबदारी कॉलेजच्या एखाद्या प्रोफेसर वर येते. तेवढीच हवापालट किंवा दुसरे देश बघण्यात येतात म्हणून प्रोफेसर देखील तयार होतात, आपण याच्या मध्ये केवढा तरी धोका असतो हे विमानात बसल्यावरती जाणवत.

 सुरुवात एअरपोर्ट पासूनच होते, आई-वडिलांना टाटा केल्यावरती, मुले सरळ वॉशरूम मध्ये जाऊन कपडे बदलून येतात, अवताराकडे बघून प्रोफेसर डोक्याला हात लावतात.

    

वसुंधरा पटवर्धन यांच्यावरती तीन मुली आणि तीन मुले यांना अमेरिकेला घेऊन जाण्याची जबाबदारी पडली. कसलीशी वाद-विवाद स्पर्धा होती आणि त्यानंतर पाच दिवस मध्ये साईट सीन साठी त्यांचा मुक्काम होता.

नीलिमा राजाध्यक्ष या बाकीच्या दहा मुलांना घेऊन चार दिवसानंतर त्याच कॉम्पिटिशन साठी न्यूयॉर्क ला येणार होता. वसुंधरा बरोबरच्या सहा मुलांनी एक लाख रुपये जास्त भरल्यामुळे त्यांना जवळजवळ दहा दिवसाचा अमेरिका मुक्काम होता, तर नीलिमा राजाध्यक्ष बरोबर आलेल्या मुलांन मुलांना फक्त पाच दिवसाचा मुक्काम होता या पाच दिवसा पैकी तीन दिवस तर वादविवाद स्पर्धेत जाणार होते आणि त्याच्यानंतर नीलिमा मुलांना घेऊन परत जाणार होत्या. पटवर्धन मॅडम शिस्तीच्या पण प्रेमळ होत्या, सोळा सतरा वर्षाची मुले सांभाळण्याची की त्यांच्याकडे खुबी होती त्याच्यामुळे, जास्त दिवसांसाठी त्यांना पाठवण्यात आले. त्यांच्याबरोबर ची सगळी बारावी मधली होती, नीलिमा मॅडम बरोबर आली होती दहावी शिकणारी मुले.


        कॉम्पिटिशन वाल्यांनी कॉस्ट कटिंग करत टप्पे टप्पे घेत जाणारे विमान आणि त्याची कंपनी सिलेक्ट केली. करण विमानाचा भाडं फारच कमी होतं. कितीही काहीही म्हटलं तरी मुलांनी त्यांच्या सीट्स त्यांना जशा पाहिजे तशाच घेतल्या, आणि तिथे वसुंधरा मॅडमचा काहीही चालले नाही.

      प्रवास सुरळीत चालू झाला, जवळजवळ दोन दिवसानंतर विविध शाळांचे चमू, जे त्याच विमानाने प्रवास करत होते ते न्यूयॉर्कला येऊन पोहोचले ते.

    आतातरी हॉटेलमध्ये जाऊ असं मनाशी ठरवत सगळी मुलं त्यांनी दिलेल्या बस मध्ये चढली, पण कसलं काय, हातामध्ये एक पोळी पोळीचा रोल, आणि एक लसीची बाटली देऊन सगळ्यांना गप्प करण्यात आल. ऑर्गनायझर अनाउन्स केलं डायरेक्ट वॉशिंग्टन डीसी ला जाणार आहोत. बापरे साडेपाच तासाचा प्रवास तोदेखील मध्यरात्री बारा वाजता सुरू झालेला, म्हणजे रात्री सगळी बस मध्ये जाणार, तेच हॉटेल चे पैसे वाचवले.

पहाटे डी सी च्या हॉटेलमध्ये पोचल्यावर परत तोच प्रकार, मुलांना सांगण्यात आले चला आपण मॉर्निंग वॉकला जाऊ आणि बाहेरच ब्रेकफास्ट करू, कारणही होतं कारण त्यांनी हॉटेलच्या रुम बुक केल्या नव्हत्या. वसुंधरा मॅडमन मात्र त्या मॉर्निंग वॉकला येणार नाहीत असे जाहीर करून टाकले, पण सगळ्यांचे नैसर्गिक विधी होते आणि जवळजवळ तीस तासांनंतर जमिनीवर उतरल्यावर थोडीशी पाठ सरळ करण्याची सगळ्यांची इच्छा होती. जी मुलं अमेरिकेला नवीन होती, ती मुले फक्त ताबडतोब तयार झाली.


काही कॉलेजेस आपल्या प्रोफेसर्स पाठवण्याच्या ऐवजी पालकांना सांगतात तुम्ही तुमची मुले घेऊन जा, खरं म्हणजे काही अंशांनी तेच खरे.

मॅडम आणि बाकी काही प्रोफेसर्स हे जवळजवळ साडेनऊ वाजता मुलांना भेटले. जेव्हा मुल कॅपिटल एरिया पाशी जमलेली होती. सगळ्या मुलांनी भरपूर तक्रार केली की ब्रेकफास्ट च्या नावाखाली त्यांना फक्त एक बेगल, आणि काही कुकीज देण्यात आल्या होत्या. ऑर्गनायझर मात्र फार गोड बोलत होते. तसेच दिवसभर मुलांना बाहेर बाहेर ठेवून फक्त रात्री त्यांना हॉटेलमध्ये रुम देण्यात आली. अमेरिकेतलं बाहेरचं जेवण बऱ्याच जणांना काही पटलं नाही, इतर ऑर्गनायझर लोकांनी अगदी स्वस्तातले हॉटेल सिलेक्ट केले होते आणि मुलं अर्धपोटीच राहिली. दोन दिवस मध्ये राहिल्यानंतर तिसऱ्या दिवशी भल्या पहाटे उठवून न्यूयॉर्कला सगळ्या टीमला परत आणण्यात आले.

न्यूयॉर्क पोचल्यावर ती परत तोच प्रकार हॉटेलमध्ये खोल्या बुकींग केलेलं नव्हतं, वाटेतच एक एक बेगल खायला घालून साईट सिंग च्या नावाखाली बस फिरवत ठेवण्यात आली. मग मात्र सगळं भयंकर चिडले आणि ऑर्गनायझर बरोबर भांडायला सुरुवात केली.

पैसे देऊनच बसलेलो होतो साडेतीन साडेतीन लाख रुपये ऑर्गनायझर वसूल केलेले होते.

न्यूयॉर्कमध्ये मुलांच्या बरोबरच शिक्षकांना देखील ठेवण्यात आले. म्हणजे मुलींच्या रूम मध्ये लेडीज प्रोफेसर किंवा मुलांच्या रूम मध्ये पुरुष प्रोफेसर. जे मुला-मुलींना नको होतं.

त्यांना मोकळेपणा पाहिजे होता म्हणून ते अमेरिकेला आले होते. त्यांच्या मनामध्ये काहीतरी वेगळाच होता. त्यांना आपल्या तारूण्याचा आस्वाद घ्यायचा होता, छोटे छोटे कपडे घालून बाहेरचा देश बघायचा होता. कॉम्पिटिशन त्ला काही फारसा अर्थच नव्हता. थोड्याफार प्रमाणात सगळ्यांची तीच अवस्था होती.

वसुंधरा मॅडम ना जेव्हा तीन मुलींच्या रूम मध्ये जाण्यास सांगितले तेव्हा त्या मुलींचा चेहरा भयानक पडला. कारण रूम मध्ये फक्त दोन क्वीन्स बेड होते. एक सोफा पण होता. बस वसुंधरा मॅडम मी ठरवलं की त्या सोप्या वरती झोपतील. आणि मुलींना पलंगावर . मुलींना रूम मध्ये त्या अजिबातच नको होत्या. कारण त्यांच्या तयार होण्यामध्ये बाथरूम वापरणे मध्ये सगळीकडेच वसुंधरा मॅडमचे अतिशय अडचण होत होती. ऑर्गनायझर च्या मनात काहीतरी वेगळेच होते त्यामुळे त्यांनी आपल्या आपल्या प्रोफेसर्स आणि त्यांचे विद्यार्थी यांना एकत्र ठेवले होते. मुली अतिशय नाराज झाल्या. त्यांनी परत परत मुलांना फोन करून त्यांना बोलावण्यास सांगितले.

वसुंधरा मॅडमना मुली म्हणाल्या की त्या दुसऱ्या दिवशीच्या वादविवाद स्पर्धेचा च्या तयारीसाठी म्हणून मुलांच्या खोलीत जात आहेत. आणि त्याचा वसुंधरा मॅडम ना अतिशय त्रास होत होता. मुलींनी त्यांना वचन दिले की त्या एक तासाभरात परत येतील. आणि त्या रात्रभर आल्याच नाहीत.

एवढं मोठं पंधरा मजली हॉटेल मुलींना कुठे शोधणार? फोन करून वसुंधरा मॅडम अगदी वैतागून गेल्या कारण कोणीही फोन उचलतच नव्हतं. शेवटी रात्रीचे दोन वाजले, वसुंधरा मॅडम अकराव्या मजल्यावरती गेल्या जेथे त्यांच्यासोबत आलेल्या मुलांच्या खोल्या होत्या. बेल वाजवून वाजवून त्या दमल्या तरी कोणीही दार उघडले नाही. शेवटी एका मुलांनी दार उघडले. आणि आतला प्रकार बघून त्यांनी कपाळाला हात लावला. मुलींना त्या ओढत स्वतःच्या खोलीमध्ये घेऊन गेल्या. त्यांनी त्यांना धमकावले की ताबडतोब त्या त्यांच्या पालकांना सांगतील आणि तिथून निघून जातील. पण मुलींच्या डोक्यामध्ये जणू काही एखादा वादळ निर्माण झालेलं होतं तीनपैकी दोन्ही मुलींनी आपल्या पालकांना फोन करून उलटच सांगितलं की खोलीमध्ये जागा नव्हती म्हणून त्या दुसऱ्या मुलींच्या खोलीमध्ये राहायला गेल्या होत्या. पालकांनी वसुंधरा मॅडमना फोन करून त्यांनाच उलट जबाब मागितला. मॅडम मी शांतपणे त्यांना सांगितले की ती बोलायची वेळच नव्हती आणि त्या घरी आल्यानंतर व्यवस्थित सगळा रिपोर्ट देतील.

अशी घाणेरडी रात्र गेल्यानंतर मॅडम ना काही झोप लागली नाही. सकाळी उठल्यावरती त्या सर्वात आधी तयार झाल्या. मुलींना गदागदा हलवले तरी त्या हलायला तयार नव्हत्या. कशिष, सिमरन अजिबात तयार नव्हत्या. शेवटी वसुंधरा मॅडमनी त्यांच्या तोंडावर पाणी मारले तेव्हा त्या कशा तरी उठल्या. मॅडमचा खाली हॉल मध्ये मध्ये जाणार होत्या कारण त्यांना दुपारचे पासेस घ्यायचे होते. त्यांनी मुलींना तयार व्हायला सांगितले, तेवढ्यात नीलिमा मॅडम आल्याची बातमी त्यांना लागली म्हणून त्या त्याच्या मुलीला भेटण्यासाठी खाली हॉल मध्ये गेल्या..

नीलिमा मॅडम ना देखील प्रवासामध्ये खूपच घाणेरडा अनुभव आलेला होता त्यामुळे त्या पण वैतागून गेल्या होत्या. नीलिमा मॅडम आणि वसुंधरा मॅडमनी मुलींना सरळ करण्यासाठी काय करावे ह्याचा भरपूर विचार केला.

    नीलिमा मॅडम च्या बरोबर आठ मुलगे आणि दोनच मुली होत्या त्याच्यामुळे नीलिमा मॅडम ची सोय त्या दोन्ही मुलीं बरोबर झाली. नशिबाने ही नीलिमा मॅडम आणि त्यांच्या बरोबरच्या मुलांची सोय एकाच मजल्यावर ती झाली.

   मुली तयार झाले असतील असं वाटून वसुंधरा मॅडम नीलिमा मॅडम ना घेऊन रूमवरती आल्या. बघतो काय मुलींचे सामान अस्ताव्यस्त पसरलेलं बाथरुमचे पाणी बाहेर आलेलं मुलींचे अंतर्वस्त्र वाटेल तिकडे पडलेली रूममध्ये पाऊल ठेवण्यासाठी देखील जागा नव्हती. मुली अतिशय अस्ताव्यस्त वागत होत्या, त्यांनी वसुंधरा मॅडमची बॅग देखील एका कोपऱ्यात ढकलून दिली होती. अतिशय निलाजरेपणे यांच्या आईवडिलांनी काही शिस्त शिकवली नाही अशा त्या वागत होत्या. कशिश, सिमरन, निलोफर, सिद्धांत, अमर , रितिक वसुंधरा मॅडम बरोबर होते. सिद्धांत कायमच कसलेतरी गोळ्या तोंडात ठेवून असायचा. जवळून गेल्यास मिंट उग्र वास यायचा. अमरचा काहीतरी वेगळाच विचार होता. बाकीच्या मुलींवर बारीक डोळे ठेवून होता. परवानगी नसताना देखील तो हॉटेलच्या स्विमिंग पूल मध्ये छोटे कपडे घालून उतरत असे. बाकीच्या शाळांचे मुलं-मुली तिथे पोहोचत असत, त्याला तेच पाहिजे होते. रितिक आपल्या वडिलांच्या श्रीमंती वरती फारच उड्या मारत होता.

सिमरन आणि निलोफर दोघीही भलत्याच विचारांमध्ये मध्ये होत्या. कशिश ने जास्त पैसे आणले नव्हते त्यामुळे ती सतत रितिक ला चिटकून होती.

वसुंधरा आणि नीलिमा मॅडमचा नकळत मुलांनी टाइम्स स्क्वेअर ला जायचा बेत केला.

पहिल्या दिवशी चे उद्घाटन समारंभ उरकल्यावर ती जेवण झाल्यावर ती हॉटेल कडे येण्याचे सोडून चार मुलांनी मिळून टॅक्सी केली आणि सरळ टाइम स्क्वेअर कडे निघून गेले.

आता मात्र दोन्ही मॅडमचा धाबे दणाणले. मुले हरवली तर? कुठे काही गडबड झाली तर? फोन करून करून दोघीजणी थकल्या.

शेवटी अमरने फोन घेतला. तो म्हणाला ते सगळे व्यवस्थित आहेत आणि हॉटेल कडे परत येत आहेत. न्यूयॉर्कच्या टाईम्स स्क्वेअर बघण्यासारखा असतो हे ठीक आहे पण कुठल्या वेळेला आणि कोणी जायचं याला काही धरबंद आहे की नाही? त्यांच्या हॉटेल च्या बाजुला आज मॅनहॅटन मुख्य ट्रेन स्टेशन होतो, सगळेजण म्हणत पळवणारी टोळी तिथे फार कार्यरत आहे म्हणून. काही कोणाला उचलून नेले तर? कुठे शोधायचे?


शेवटी रात्री एक वाजता सगळी मुलं आणि मुली हॉटेलवर ती आले, त्यांच्या चेहऱ्यावर कुठलाही पश्‍चाताप नव्हता, सगळ्यांनी बहुतेक बियर प्यायली होती, काहींनी तर जास्तच घेतली होती. काही मुलींना चालता पण येत नव्हते. त्यांना बोलण्यात काहीही फायदा नव्हता. नीलिमा मॅडम नि सरळ सगळ्यांचा व्हिडिओ काढला आणि त्यांच्या पालकांना पाठवून दिला. प्राध्यापकांबरोबर राहणे हे मुलांवरती बंधनकारक असतं, प्राध्यापकांनी त्यांच्या मागे पडणे हे अपेक्षित नसते.

दुसऱ्या दिवशी सकाळी शेलक्या शब्दांमध्ये सगळ्यांची कान उघाडणी करून मुलांना डिबेट च्या ठिकाणी नेण्यात आलं. पहिली गोष्ट म्हणजे सगळ्यांच्या पैसे काढून घेण्यात आले. त्यांचे पासपोर्ट पण मॅडमनी काढून स्वतःजवळ ठेवले. कोणीही कुठेही जायचं नाही आणि जर गेलात तर तुम्हाला इथेच सोडून घेऊ अशी धमकी देऊनच मुलांना बरोबर नेले.

 डिबेट च्या ठिकाणी नेटवर्क ब्लॉक केल्यामुळे कोणाचाही फोन लागत नव्हता. तरीपण सगळी मुले नजरेखाली असल्यामुळे दोघेही मॅडमनी सुटकेचा श्वास सोडला.

पहिल्या दिवशीच्या डिबेट मध्ये सगळे मुद्दे तयार असून देखील मुलांनी थोबाड देखील उघडलं नाही. नुसते बसून राहिले. बहुतेक ते झोपेमध्ये असतील. डोळे जड झालेल्या अवस्थेत सगळेजण दगडासारखे सारखे बसून राहिले. संध्याकाळी जुळ्या टावर ऐवजी बांधलेले टावर बघण्याचा कार्यक्रम होता. पण सगळी मुलं खोलीमध्ये गेली बाहेरच आली नाही. दार ठोकून फोन करून दोघीही मॅडम थकून गेल्या. बरोबर आहे आदल्या रात्री काय झालं होतं त्यामुळे त्यांची झोप झाली नाही आणि आता त्यांना झोप येत होती.

मध्यरात्री हॉटेलचा मॅनेजर चा फोन नीलिमा मॅडम कडे आला. मॅनेजर नी अमर रितिक आणि कशिष हॉटेलच्या बाहेर गेल्याचे सांगितले.

आता मात्र मॅडमचा संताप अनावर झाला. त्यांनी हॉटेल मॅनेजर ला उलट प्रश्न केला की सोळा सतरा वर्षाची मध्यरात्री तुम्ही हॉटेलच्या बाहेर सोडलं कसं?

नीलिमा मॅडम मी ताबडतोब हॉटेल च्या वॉचमन कडून कॅब चा नंबर घेतला आणि पोलीस कम्प्लेंट केली.

   एक तासानंतर पोलिसांनी त्या एरियातल्या एका वाईट ठिकाणावरून मुलांना पकडून हॉटेलमध्ये आणले. हॉटेलच्या लॉन्च मध्ये एका माणसाने मुलांना एप्पल फोन सस्ता देतो या बहाण्याने रात्री बोलावले होते. मुलांनी काहीही न सांगता त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून त्यांनी सांगितलेल्या पत्त्यावर की जायचे ठरवले. एवढा मोठा धोका?

काहीही होऊ शकले असते. त्यातून मूर्ख कशिश, तिला वाटत होतं की तिला पण एक भारीपैकी फोन स्वस्तात मिळेल. ती पण चिटकली.

नीलिमा मॅडम न ताबडतोब त्यांच्या पालकांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की तुम्ही इकडे या आणि मुलांना घेऊन जा.

अमरने आणि सिद्धांत नि आपल्या वडिलांचा क्रेडिट कार्ड स्वतः जवळच ठेवलं होतं, आणि मॅडम ला खोटं सांगितलं होतं आणलेल्या पैशाबद्दल.

तरी पण मध्यरात्री हॉटेल सोडून जायचा मूर्खपणा हा अगदी अक्षम्य होता. नवीन जागी, माहिती नसलेले ठिकाण, माहिती नसलेले लोक, कोणी सांगितलं की बाहेरचे देश सुरक्षित आहेत म्हणून? वाद-विवाद सोडून शॉपिंग करणे किंवा एकटेच भटकत बसणे किंवा काही अपेयपान करणे किंवा अजून काही …….., मुलांच्या लक्षात कसे येत नाही की त्यांनी फक्त सोळा वर्षांचा आयुष्य जगलेला आहे पुढचा अख्खा आयुष्य त्यांच्यापुढे पडलेला आहे आणि एकदा का आयुष्य नासलं गेलं तर पुढे कसले चांगले आयुष्य?

तिसऱ्या दिवशी अर्धा दिवस कार्यक्रम होता. कारण काही जणांना रात्री चे विमान पकडायचे होते. मुले नीलिमा मॅडम च्या हाता पाया पडली. त्यांनी प्रॉमिस लिहून पण दिले पुढच्या पाच दिवसांमध्ये की कुठल्याही प्रकारचे दंगामस्ती करणार नाहीत. पण पुढचे पाच दिवस फक्त वसुंधरा मॅडमचा त्यांच्याबरोबर होत्या.

वाद-विवाद सगळा खेळ खंडोबाचा होता. ऑर्गनायझर माहिती होतं श्रीमंत बापाची पोरं अशाप्रकारे बोलवून दुसऱ्या देशात नेण्यात येतात, एकदा पैसे काढून घेतले कोणाला काहीही बोलता येत नाही. नवश्रीमंत त्यांची मुलं वेगळे देश बघण्यासाठी म्हणून आपल्या आई बापाला गळ घालतात,

 सगळ्यांनी लक्षात ठेवावे, ज्यांनी कोणी स्पर्धा आयोजित केली आहे ते सरकारी लोक आहेत का? हे सगळे खर्च उचलणार आहेत का? सुरक्षेची काय जबाबदारी आहे? त्यांचा कार्यक्रम त्यांनी एक महिना आधी तरी आपल्याला दिला आहे का? आणि याची जर काही खात्री पटली नाही तर कोणीही असल्या कार्यक्रमांना मुलांना पाठवू नये.

मुले मॅडम च्या हाता पाया पडली.तरीपण नीलिमा मॅडमनी सगळ्या मुलांची तिकीटं बदलून , पुढील आठवड्याचा कार्यक्रम रद्द करून, वसुंधरा मॅडम आणि नीलिमा मॅडम सगळ्या मुलांना घेऊन भारतामध्ये परतल्या.


Rate this content
Log in

Similar marathi story from Action