Yogita Takatrao

Inspirational


3  

Yogita Takatrao

Inspirational


माझं अस्तित्व

माझं अस्तित्व

2 mins 1.0K 2 mins 1.0K


         माणुस असतो ना तो कायम स्वतःला सिद्ध करतं असतो पहा.....? जन्म घेतल्या पासून, जीवन उपभोगून त्यात यशस्वीरित्या स्थिर स्थावर होऊ पाहतोय आणि त्यातही तो धावतच आहे,एका सारख्या लक्ष्य बदलत राहणाऱ्या शर्यतीत......धावतोय ,नुसता.......धावतोय.......धावतोय....दम लागे पर्यंत.....तो धावतोय....!

         

         मी पण त्यातलीचं एक बाई माणूस .....अचानक सुरळीतपणे चालत राहणाऱ्या जीवनात वादळं यावित ,त्या प्रमाणेच मनात विचारांच्या वादळरूपी थैमानाने.........पार माझं मन आणि आयुष्य अंतर्बाह्य ढवळून टाकलं......! ऊभे राहिलेले ...सारखे ...सारखे....मला भेडसावणारे राक्षसी प्रश्न.......माझी झोप...माझं सुख....माझं चैतन्य सारं काही हिरवून घेणारे ठरले !


         सगळयांच बाबतीत सर्व सुखी असताना.......का बरं छळावं ह्या प्रश्नाने मला....? कोण तु ?....काय तुझं नाव ? काय तुझं अस्तित्व...? अस्तित्व ह्या तीन अक्षरी शब्दांत माझा जीव टांगणीला लागला होता...? माझं असं काय आहे...? माझ्या नावाचं ......माझं अस्तित्व...? खूप त्रास देत राहिला हा प्रश्न...?


         काहीतरी करायचंच हा ठाम निर्णय घेऊन मी माझ्या लग्नाच्या अकराव्या वर्षां नंतर माझ्या बाजूला सारुन ठेवून दिलेल्या माझ्या छंदाला......परत जवळ केलं कायमचं..........त्यात यशस्वीरित्या कामही चालू आहे....नविन योजना....नवे उपक्रम.....नविन स्वतःशिच लावलेल्या पैजा........खूप समाधान मिळतं मला माझ्या छंदातून.....!


         तर मित्र-मैत्रिणींनो......कोणता असा छंद आहे माझा...? चला जास्त त्रास न देता सांगून टाकते एकदाचं...! 

         

         कविता करणे....लेख लिहिणे....गाणी रचने.....आणि छोट्या-मोठ्या गोष्टी लिहिणे....आय मीन ऑनलाईन जमान्यात मोबाईलवर टाईप करणे........इत्यादी...इत्यादी....बरंच काही अजून.......छंदाची यादी खूप मोठी आहे........बरेच दिवस ऑनलाईन काही स्पर्धा मिळतात का ते शोधत रहायचे वेड लागल्या सारखे आणि एक दिवस मला स्टोरीमिरर ह्या ऑनलाईन पोर्टल ची लिंक मिळाली ...मग काय ? मला माझ्या छंदाला प्रत्यक्ष जीवनात उतरवण्याची सुवर्णसंधीच मिळाली जणू.......मग काय मस्तपैकी त्यावर वाट्टेल तेवढं लिहिते.....मी जेवढे विचार लिहून कागदावर ऊतरवते ,तेवढेच ते नव्याने नविन विचार डोक्यात यायचं काम चालू राहते.........मेंदू ईकडचे तिकडचे विचार बिलकुल नाही करत, हिने असं बोललं ?....तिने तसंच बोललं ...? ह्या पेक्षा जीवनात करण्यासाठी भरपूर चांगल्या गोष्टी आहेत....... आणि मी त्यामुळे खूप समाधानी आहे....त्यावर येणारे नव नवे उपक्रम आणि स्पर्धेतही भाग घेते.....जणू मला एक अनोखं विश्वच मिळालं आहे ....मी कोण आहे हे सिद्ध करायला....माझं अस्तित्व जवळ जवळ सिद्ध झाले आहे आणि होतं ही आहे...!


माणूस चांगल्या गोष्टीत आणि कामात गुंतलेला उत्तमच...! नाहीतर त्रास तर काहीनाकाही जवळ पास सगळयांनाच असतात, पण त्या त्रासाला मेंदू तून हद्दपार करणे आपल्याच हाती असते,बाकी कोणतीही व्यक्ती ते काम आपल्या साठी करुच नाही शकत,करेल ...? तरी ते थोडया काळासाठी....नंतर काय...?आपणच आहोत आपल्या साठी....स्वतःसाठी.......स्वतःला चांगल्या कामासाठी...झोकून देण्यासाठी.......! मी तेच करत आहे....! माझ्याकडे आत्मिक समाधान आहे म्हणुनच....!


         ही आहे माझ्या जीवनाची गोष्ट......माझं अस्तित्व.........! माझ्यसमोर एक ध्येय आणि लक्ष्य आहे.....! आणि ते मी एक उत्तम कवयित्री आणि लेखिका म्हणुन सिद्ध करेनच ...तेव्हाच माझा जन्म सफल झाला असं मानेन मी..........धन्यवाद.....!


Rate this content
Log in