Pakija Attar

Inspirational


5.0  

Pakija Attar

Inspirational


न्याय

न्याय

5 mins 1.3K 5 mins 1.3K

आज आभाळ भरुन आलं होतं. खूप उदास वाटत होतं. अप्पा गॅलरीत येऊन बसले होते. आज पत्नीला जाऊन एक वर्ष झालं होतं. तिची आठवण येत होती जणू त्यांना आवाज आला. 

"गॅलरीत काय बसलाय आत् या. गरम गरम चहा घ्या. पावसाची वाट पाहत काय बसलात. ढग भरुन आलेत पण ते परत विरून जातील. चक्क प्रकाश पडेल. अहो ऐकलंत का"

" हो हो आलोच मी." असे म्हणत आप्पा आत मध्ये आले. 

आत कोणीच नव्हते. सुनबाई कामाला गेली होती. तन्मय शाळेत गेला होता. अप्पा चा मुलगा तोही कामाला गेला होता. रमा गेली आणि घराची रया गेली. घर खायला उठते. पाऊस पडायला लागला . रमा गरमागरम भाजी बनवायची.

 आता तसं काहीच नव्हतं. सुनबाई संध्याकाळी कामावरून येणार. येताना निकत पोळ्या आणणार. भाजी काहीतरी बनवेल. झालं जेवण तयार. अप्पाची अडचण वाटत होती. आप्पा व तन्मय यांची मात्र मैत्री होती. 

"आप्पा तन्मयला शाळेत सोडत. डबा बॉटल सगळं बरोबर द्या. वेळेवर जा." असे म्हणत सुनबाई धावत निघत असे. 

"आजोबा आई गेली ना. चला मग आपण गप्पा मारू या. हो पण शाळेत वेळेवर जायचे आपल्याला. उगीच उशीर व्हायला नको."आप्पा म्हणाले. 

"हो हो आजोबा, संध्याकाळी बागेत जाऊया. तुम्हाला एक गंमत दाखवायची आहे." तन्मय म्हणाला. 

"जाऊ या. शाळेत जायची तयारी कर. होमवर्क पूर्ण केलाय का. आवर पटकन." असे म्हणत आजोबा पसारा सगळा आवरू लागले. तन्मय ची तयारी झाली. त्याला शाळेत सोडत रमत गमत येत होते, एवढ्यात आवाज आला. 

"अप्पा इकडे ये. कसं काय चाललय घरी." हनुमंतराव म्हणाले. 

"बर आहे बाबा. तुझं कसं काय आहे?" 

"काय सांगू बाबा, सकाळी झोपेत असताना मुलाचं व सुनबाईचं बोलणं ऐकलं. त्यांना माझी अडचण होत आहे. ते दोघे मला वृद्धाश्रमात ठेवायला निघाले आहेत. खरच का रे मी एवढा वाईट आहे. एवढी संपत्ती मिळवली. राब राब राबलो. मुलाला शिकविले. सगळं काही रांगेला लावले. आज माझी अडचण होते. मुलाने जे काही मागितले ते आणून दिले. बाईक मागितली. कर्ज काढून दिले. आता माझं काय चुकलं रे. माझी जागा वृद्धाश्रमात."असे म्हणत हनुमंत राव यांचे डोळे पाणावले. 

आप्पा ही स्तब्ध झाले. त्यांनाही भीती वाटत होती. आपली स्थिती अशीच होणार नाही ना. परत ते सावरले. 

"हनुमंता काळजी करू नकोस. तुझ्या मुलाला मी भेटायला येईल. मी सांगेन वृद्धाश्रमात पाठवू नका . असा कसा पाठवेल तो. त्याचे बाबा आहे. हाताला धरून चालायला शिकवलं, बोलायला शिकवलं. आज कुटुंब सांभाळतोय. तुझ्या कुटुंबात बाबांना जागा नाही का. असं खडसावून विचारतो. तू घाबरू नकोस. मी, विजय, आम्ही सगळे येऊ. मग तर झालं ना." आप्पा म्हणाले. 

"तुम्ही यायच्या आधी माझी रवानगी वृद्धाश्रमात झाली नाही म्हणजे मिळवलं." हनुमंत म्हणाला. 

"चल आता जाऊ या. विजय तु पण चल. आपण याच्या घरी जाऊया. त्याला विचारूया." आप्पा म्हणाले. 

"आता नको, आता सगळे बाहेर पडण्याच्या घाईत आहे. संध्याकाळी ये."

"ठीक आहे आम्ही संध्याकाळी येऊ." आप्पा घरी आले. 

डोक्यात विचारचक्र चालू होते. आज त्याच्याकडे ही परिस्थिती आहे, उद्या आपल्याकडे का असणार नाही. काहीतरी विचार करायला हवा. काय चुकते आपले हे शोधायला हवं. तेवढ्यात तन्मय आला. 

"आजोबा आज संध्याकाळी आपल्याला जायचे बागेत लक्षात आहे ना!" तन्मय म्हणाला. 

"जाऊया! पण आज आपण दुसऱ्या आजोबांच्या घरी जाऊ, नंतर बागेत जाऊया."आप्पा म्हणाले. 

"काय हो आजोबा असं करता. मित्रांना सांगून आलोय ना. "

"तुझ्या मित्राला पण भेटायला मी येणार आहे पण थोडा उशिरा जाऊया. आधी आजोबांकडे जाऊया. तिकडून तसेच तुझ्या मित्रांना भेटूया मग तर झालं. बर माझा छकुला. आता किती छान दिसतोस. असाच हसत राहा बाळा. हातपाय धुऊन घे. जेवायला वाढते. तुझा अभ्यास कर मग निघूया." असे म्हणत आजोबांनी तन्मयला जेवण वाढलं. 

आप्पांच्या डोक्या मध्ये विचारांचे काहूर माजले होते. हा प्रश्न कसा निकालात काढायचा हीच दुविदा होती. काही सुचत नव्हतं. रमा आज असायला हवी होती. तिने हा प्रश्न चुटकी सारखा सोडवला असता. "आजोबा झाला अभ्यास चला जाऊया."तन्मय म्हणाला.

"ठीक आहे चला." असे म्हणत आप्पांनी विजयला फोन लावला. विजय येतोय ना तू. लगेच निघ, मी खाली येतोय."

तिघे हनुमंतराव यांच्या घराजवळ आले दाराची बेल वाजवली. दार उघडले.

 "या या आज सगळे इकडे कसे." हनुमंतराव चा मुलगा म्हणाला.

"आलो भेटायला सर्वांना." विजय म्हणाला. 

"असे एकदम भेटायला काहीतरी असणार नक्कीच." मुलगा म्हणाला. 

"तूझे काम वगैरे कसं चाललंय बाळा. आणि नकुल कुठे आहे." आप्पा म्हणाले. 

"नकुल ये लवकर! बघ आजोबा आले तुझा मित्र तन्मय आलाय."

 नकुल धावत आला त्याने तन्मयला आत मध्ये नेले. हनुमंतराव आपलया मित्रांकडे पाहू लागले. 

"आम्ही असं ऐकलंय कि बाबांना वृद्धाश्रमात सोडतोय." आप्पा म्हणाले. 

"कोणी सांगितलं तुम्हाला." मुलगा म्हणाला.

"मी ऐकलंय स्वतःच्या कानाने. तुम्ही मला वृद्धाश्रमास सोडत आहे." हनुमंतराव म्हणाले. 

"मग काय करणार आम्ही. दोघेही नोकरीला. नकुल शाळेला. यांना कोण पाहणार. वृद्धाश्रमात सगळी सोय आहे. तेथे पाहायला लोक आहेत. करमणूक पण होते. आणखी काय पाहिजे. फुकट नाही,10000 मोजणार आहे मी ह्यासाठी दर महिन्याला. लक्षात येतय का तुमच्या." मुलगा म्हणाला. 

"अरे सगळं ठीक आहे तिथे प्रेम वात्सल्य हे सगळं कुठे मिळेल. तुला बाबांना सोडून राहावेल? नकुलला विचारलस का."आप्पा म्हणाले.

"त्याला काय विचारायचंय तो छोटा आहे." मुलगा म्हणाला. 

"अरे, तो सुद्धा एक घटक आहे. त्याला त्याचे आजोबा हवेच आहेत ना. नकुला शाळेत सोडतात. बागेत घेऊन जातात. आणखी काय हव आहे. तुला लहानपणी बाबांनी सोडून नाही दिलं. शाळेत पाठवलं. शाळा सुटल्यावर घरी आणलं. मग बाबांना का शिक्षा. हे बघ झाड मोठं होतं फळ देतो. सावली देतो. तसं घरातलं मोठा माणूस असतं. कुटुंबात कुटुंबाचा आधार असतो. झाडाच्या मुळाला घाव घातला तर ते कोलमडून जाते. तुम्हाला तर चांगली संधी आहे. आई-बाबांची ऋण फेडायचे. ते सोडून आई-बाबांना वाऱ्यावर सोडायचे हा कुठला न्याय बाळ. तू थोडा विचार कर. हाडामासाचा सजीव जीव. भारतीय संस्कृती सुसंस्कृतपणा या भारतात श्रावण बाळासारखे मुले जन्माला आली. त्या भारतात वृद्धाश्रम येणे हेच मुळीच चुकीचे आहे. वृद्धाश्रमाची गरजच भासली नाही पाहिजे. प्रत्येक मुलाने आई-बाबांना सांभाळून घेतले पाहिजे. प्रत्येक आई-बाबांनी मुलांना समजून घेतले पाहिजे." आप्पा म्हणाले. 

"खरंच असं झालं तर भारताचे नंदनवन होईल."विजय म्हणाला.

 मुलाचे डोळे पाण्याने डबडबले. "बाबा मी खरं चुकललो. पुन्हा मी असा विषय कधीच करणार नाही. तुम्ही आम्हाला हवे आहात. नकुला आजोबा हवे आहेत. कामाला बाई ठेवून व नकुला सांभाळायला कोणी ठेवले तरी प्रेम नाही कोणी देणार. प्रेम विकत मिळत नाही. हे मला कळलं बाबा. मला माफ करा. मला माफ करा." मुलगा म्हणाला. 

सगळ्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले. आज एका वृद्धाला न्याय मिळाला होता. आपल्या भारत देशात अनेक वृद्ध आहेत. त्यांनाही न्याय मिळाला पाहिजे.


Rate this content
Originality
Flow
Language
Cover Design