Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Milind Ghaywat

Tragedy

4.4  

Milind Ghaywat

Tragedy

पार्टनर ०२

पार्टनर ०२

3 mins
1.4K


पार्टनर,

जणू अचानकच वीज पडावी तसं तुझ्या आजाराबद्दल माहीत झालं, पायाखालची जमीनच खचून गेली रे क्षणात..

सगळीकडे उरली केवळ भयाण नि जीवघेणी शांतता.

कारण तोवर केवळ 'मी म्हणजे तू' नि 'तू म्हणजे मी' एवढंच आपलं विश्व होतं. काही काही कळत नव्हतं, त्या विजेच्या लोळामध्ये सगळं काही जळून बेचिराख झाल्यागत दिसत होते, खरं म्हणजे आयुष्याचीच माती झाल्यासारखं होत. तू केवळ काही दिवसांचा सोबती आहेस, ह्या विचाराने वेडीपीशी होत होते मी..

पण एरवी हळवा असणारा तू, त्या प्रसंगाने कसला खंबीर झालास. त्यानंतर कित्येकदा चालता बोलता मी शून्यात हरवून जायची.. कसलं कशातच लक्ष लागत नसायचं.. पण तू मात्र काय शिताफीने मला सारं काही पटवून द्यायचास.. रात्र रात्रभर मांडीवर डोकं घेऊन हळुवार माझे केस कुरवाळत आपल्या स्वप्नांबद्दल बोलत बसायचास.. माझ्यानंतर आपल्या स्वप्नांचीही राख होण्यापेक्षा ती हळूहळू का होईना पण पुर्ण करण्यासाठी तुला आता खंबीर व्हावचं लागेल म्हणून ओरडायचास.

डोळ्यांतून टपटप पाणी टिपकत असतानाही मध्येच वेड्यासारखं हसवायचास.

आठवतंय का रे तुला? नेहमी बोलायचास.....

“तुला जेव्हा कधी गरज वाटेल नां, तेव्हा एकदा डोळे बंद करून मनापासून मला आवाज दे... जिथेही कुठे असेल तिथून तुझ्या एका हाकेसरशी मी धावत समोर येईन.” खर तर मला कसचं पटत नसायचं हे... केवळ माझी समजूत घालण्यासाठी काहीबाही बोलतोय करून ऐकत घेत राहायची. पण तू किती विचार करून गुढतेने बोलायचास हे आता कळतंय. तेव्हा कधी तुझ्या शब्दांच्या गुढतेत शिरताच नाही आले, पण तरी तू बोलायला लागलास की तुला कधी थांबवण्याची हिम्मत नाही व्हायची. तू बोलत राहायचास, आणि मी सारं भवतालं विसरून तुला साठवून घेत राहायची..

तू शब्दरुपाने वाहत रहायचास आणि मी त्यात चिंब चिंब नाहून निघायची...

तुला ऐकताना नं वेळेच भान उरायचं नां स्थळांची जाण....

फ़क़्त नि फ़क़्त तू आणि केवळ तूच.....

सारं अस्तित्व व्यापूनही पुन्हा तू उरूनच रहायचास...

नेहमी बोलायचास तू... “लक्षात ठेव, जेव्हा कधी मी हे शरीर सोडून जाईन आणि तुझ्याजवळ नसेल, तरीही तुझ्या अवतीभवती, सगळीकडेच असेन मी. सदानकदा रेंगाळत राहीन तुझ्या आसपास.. कधी आठवणींतून, कधी कवितेतून, कधी कथेतून तर कधी आपल्या स्वप्नांतून... डोकावत राहीन तुझ्या प्रत्येक क्षणांत, प्रत्येक प्रसंगात.. तुला एकटं मात्र कधीच सोडणार नाही...... फ़क़्त तुला डोळ्यांनी दिसत नसेल मी. जेव्हा कधी तुला एकटं वाटेल, तू शांतपणे डोळे मिटून मला आतून एक आवाज दे, आणि मग अनुभव घे माझ्या असण्याचा..., केवळ मी आणि मीच जाणवेल तुला.....

त्यामुळे, कधी समजू नकोसं की मी कुठेतरी दूर्रर्रर निघून जाणार आहे तुला कायमचं सोडून वगैरे.........”

म्हणूनच नां रे,, जेव्हा कधी खूप एकटं वाटतं, हजारोंच्या गर्दीतही सुनं सुनं वाटत, सारं काही जवळ असूनही कोणीच नसल्यासारखं जाणवतं तेव्हा डोळे घट्ट मिटून घेते नि एक आर्त साद देते,

पार्टन्न्न्नन्न्न्नर........

आणि मग जाणवत राहतं,

माझ्या कणाकणातील तुझ अस्तित्व..

मग फिरतं राहतं आठवणींच मोरपीस,

अंग प्रत्यांगावरून..

मी शहारत जाते,,,

मी पुन्हा एकदा वाहवत जाते,,

तुझ्या मध्ये,

तुझ्या असण्यामध्ये,

तुझ्या असूनही नसण्यामध्ये..

तुझ्या आठवणींमध्ये...

जाणवतं राहतं.. तू मला एकटं सोडलं नाहीस हे...

आणि पुन्हा एकदा....

सर्व काही व्यापून उरतोस तो तू आणि तुच

.© #मनमिलिंद...


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy