SWATI WAKTE

Inspirational


4.6  

SWATI WAKTE

Inspirational


बंधन

बंधन

2 mins 1.3K 2 mins 1.3K

समिधा एक तिशीतली स्त्री. लग्नाआधी खूप स्वप्न रंगवणारी खूप आशावादी अशी होती. आयुष्यापासून तिच्या खूप अपेक्षा होत्या. तिने graduation पूर्ण केले. नन्तर स्वतःला स्पर्धात्मक परीक्षेत घोकून दिले. पण यश आले नाही. घरकामात पण खूप हुशार, सर्व गोष्टीत रस घेणारी नवीन गोष्टी शिकण्याची आवड असणारी होती.


वयाच्या पंचविसाव्या वर्षी तिचे आईवडिलांनी लग्न करण्याचे ठरविले. एक चांगली नौकरी असणारा स्थिर झालेला राहुल सोबत तिचे लग्न ठरविले. जोडीदार तिला योग्य होता. त्याने तिला तिच्या स्वतःच्या पसंदीचे मंगळसूत्र निवडण्याचा अधिकार दिला. तिने स्वतः एक सुंदर सोन्याची साखळी आणि मध्ये हृदयाच्या आकाराच्या वाट्या असलेले मंगळसूत्र निवडले. पण तिला माहिती नव्हते की हे मंगळसूत्र म्हणजेच बंधन.सोन्याची साखळी म्हणजे गळ्यात तिच्या बांधलेली दोरी आणि हृदयाच्या आकाराच्या वाट्या म्हणजे जणू कुलूपच. लग्नानंतर लगेच वर्षाच्या आत मूल झाले. पूर्ण वेळ लग्नानंतर सासरच्या लोकांना सिद्ध करण्यात आणि मुलात अडकून गेली.स्वतःच्या आवडी निवडी जपायला वेळच मिळायचा नाही. आपण शिकलेलो आहे हेही विसरून geli..मूल सांभाळायला घरी कुणी नसल्याने घराच्या बाहेरही पडता येत नव्हते. राहुलजवळ चर्चा केली तर तो म्हणायचा तुला काय पाहिजे ते सांग मी सर्व आणून देतो पण मुलाची, घराची हेळसांड करू नको.तुला पाहिजे ते आणून देतो.


पण समिधाला भौतिक गोष्टीत काही रुची नव्हती.तिला स्वतःला सिद्ध करायचे होते. स्वतःचे अस्तित्व निर्माण करायचे होते. असे करता करता लग्नाला चार वर्ष होऊन गेले. मुलगाही तीन वर्षाचा झाला. मुलाचे आजारपण, आल्यागेल्याची सरबराई करण्यात स्वतःला काही सिद्ध करता येत नाही ह्या विचारात स्वतःची हेळसांड होत गेली. परिणामी समिधा डिप्रेशन मध्ये गेली. आणि तिचा जगण्यातला रस हळूहळू निघून गेला. लग्नाआधी सर्व गोष्टीत आनंद मानणारी समिधा खिन्न झाली जगातील कुठल्याही चांगल्या गोष्टीतून तिचा रस निघून गेला. तिचे वजन दहा किलोने कमी झाले. ह्याच स्थितीत जवळपास एक वर्ष ती होती. पण हळूहळू तिच्याच लक्षात आले की आपल्या स्वार्थामुळे मुलाची हेळसांड होत ahe.मूल चार वर्षाचे होते शाळेत जात hote.मग तिने मुलाच्या त्याच शाळेत प्री स्कूल मध्ये नौकरी मिळवली. व त्या बंधनात राहून स्वतःचा मार्ग स्वतः शोधून काढला. छोट्या मुलांमध्ये आनंद शोधू लागली व एक वर्ष नौकरी केल्यांनतर स्वतःचेच प्री स्कूल सुरु केले.


आता हळू हळू समिधा मंगळसूत्र रुपी कुलूप न तोडता त्यातच आनंदाने राहू लागली...Rate this content
Log in