Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Rashmi Nair

Abstract Inspirational

4.2  

Rashmi Nair

Abstract Inspirational

संदेश

संदेश

2 mins
995


संध्याकाळी बसस्थानकावर पल्लवीच्या घरी जाण्यासाठी बसची वाट पाहत होती. पण, बस मध्ये एवढी गर्दी होती की दारावर पण यात्री लोंबकळत प्रवास करत होते .एवढंच नव्हे तर वाहनचालक बसला स्थानकावर थांबवतच नव्हते. आधी बस थांबवायचे नाही तर खूप पुढे नेऊन थांबवायचे. एकतर खूप वेळानंतर बस यायची ती पण गर्दीने पॅक झालेली आणि स्टॉपर न थांबता निघून जायची .

      दोन तास हे घडत होते. काळोख देखील दाट झाला. ती विचार करू लागली की घरी कसे पोहोचणार ? दूरवरुन एक बस येताना पाहिली, तिला वाटले की जर ती थांबली तर कसंही करुन बसमध्ये चढण्याचा प्रयत्न करावाच लागेल. नाहीतर  घरी पोहचताच दुहेरी बोलणी खावी लागतील. सासू तर बोलतच राहते; पतिदेवाला पण बोलण्याची संधी मिळेल. पण या दोघांनाही समजत नाही की बस माझ्या माहेरुन तर येत नाही.


      बस थांबताच ती कसंबसं बसमध्ये चढली . तिकीट घोऊन ती पुढे  लेडीज, सीटपर्यंत पोहचली . सीटवरील हँडल पकडून ती तिथे उभी राहिली. बसमध्ये असा बराच गोंधळ माजला होता. बायका थोडासा धक्का बसल्यावर आपापसात भांडायलाच लागल्या. पुरुषपण मारा-मारी करायला पण कमी करत नव्हते. कंडक्टरनी आपली कामे करावीत की गर्दीत तडजोड करावी. इतका आवाज झाला की काहीही ऐकूच येत नव्हते.


ड्रायव्हर आपले काम करत होता. पल्लवीने जवळ बसलेल्या महिलेच्या मांडीवर बसलेल्या चार वर्षांच्या चिमुरडीकडे पाहिले. बेफिकार ही मुलगी स्वतःच्या हाताने डोळे झाकून बसल्या जागीच लुकाछुपी खेळत होती, कधी ती डोळे मिटत होती तर कधी डोळे उघडत होती. ती आपल्याच नादात खेळत होती .पण तिचे लक्ष याकडे नव्हते की , बसमध्ये काय चालले आहे? तिच्या निरागस मुखमंडलावर हास्य उमटले होते.


पल्लवी त्यामुली कडे खेचली जात होती. तिला ती मुलगी खूप आवडली. तिने त्या मुलीच्या गालाला हळूवार स्पर्श केला. मुलगी तिला पाहून हसली .त्या मुलीच्या बाललीला पाहण्यात वेळ कसा गेला हे पल्लवीला कळलेच नाही. पुढच्या स्टॉपवर उतरण्यासाठी त्या मुलीची आई उभी राहिली. ती जागा रिकामी झाली तेव्हा पल्लवी तिथेच बसली. बस थांबल्यावर ते दोघे निघून गेले. पल्लवी विचारात राहिली, ही मुले किती निष्पाप, निरागस आहेत. मोठी माणसंपण जर कोणत्याही परिस्थितीमध्ये लहान मुलांप्रमाणे निरागस राहिली असती तर जगात खूप भांडण-तंटा किंवा मारामारी झालीच नसती. तिला वाटले की त्या मुलीचे स्मित हास्य फारच मोलाचा संदेश देत आहेत.


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract