Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Vasudev Patil

Others

2.5  

Vasudev Patil

Others

रसवंती

रसवंती

9 mins
1.0K



      भाग ::-- पाचवा


 शालू दुपारी भिंतीला लागून असलेल्या बबनशेठच्या दुकानात शिरली. दिड चौकडीचं काऊंटर व अर्ध्या चौकडीची माआगच्या भागात जाण्यासाठी वाट.या ठिकाणी वेगवेळ्या जिन्नसाचे पोते डबे हारीनं मांडलेले तर भिंतीलाही काहीबाही टांगलेलं. बबनशेठ दुपारी गिऱ्हाईकाची गर्दी नसल्यानं खुर्चीवर पायाची आढी टाकून पायाचा पंजा हलवत बसलेला. दुकानात राॅकेलपासून सुंठ, हिंग,सडलेले महू अशा सर्व जिन्नसाचा एकत्रीत वास नाकात शिरत होता.

 "या वहिनी मी तुमचीच वाट पाहत होतो",बबनशेठ.

"शेठजी काय सांगत‌ होते" शालूनं मिठाच्या पोत्याला किंचीत टेकून उभी राहत विचारलं.

"वहिनी दुकानात उंदीर, घुसा खूप झाल्यात, रात्री दुकानात अतोनात नुकसान करतात.आता तर तुमच्या घरातही घुसू पाहतात".

"व्हय जी,आमच्या घरातही येतात, रिकामी डबडी खुळबुळ वाजवत पाडत फिरतात."

"म्हणून एक मदत करा .मी बेसन पीठ, तेल व उंदीर, घुसा मारण्याच्या औषधाच्या पुड्या ही देतो. ते कालवून तेवढे रात्री भजे काढून द्या.रात्री बिळातच ठेवतो"

"चालेल जी देते काढून त्यात काय एवढं"

बबनशेठनं उठत सर्व वस्तू काढून दिल्या.शालू त्या घेऊन निघणार तोच तिला थांबवत

 "वहिनी, गजा व तुमची परिस्थीतीची मला पूर्ण जाणीव अाहे.तरी पण आता वेळच अशी आली की मला सांगणं भाग आहे"बबनशेठ सांगू लागला.

"शेठची, जे काही असेल ते मोकळं सांगा."

"वहिनी रसवंतीच्या लोनचे हफ्ते थकलेत.त्यांचा तगादा चालू आहे.शिवाय दवाखान्यासाठी कर्ज दिलंय ते ही सारखे मागे लागलेत"बबनशेठ जडावलेल्या स्वरांनी सांगू लागला.

"व्हय शेठजी मला जाणीव आहे,करते काही तरी"शालूच्या पोटातला खड्डा आता वाढायला लागला.

"वहिनी गैरसमज करू नका.मला मी दिलेले किंवा माझी दुकानाची उधारी भले नका देऊ पण निदान दुसऱ्याकडून उचलून दिलेले तरी."

"शेठजी तुमच्या पैशाची ही जाणीव आहे मला.पण आता या घडीला काय करावं?नी कसे फेडावेत ? यावर मी काय सांगू?औषध खायला ही दमडी नाही माझ्याकडं"शालूचा रोखून धरलेला धीर आता सुटू पाहत होता.

"वहिनी ते मला कळतंय पण राग मानणार नसाल तर एक उपाय सूचवेन मी यावर!पटला तर बघा!"

सांगा शेठजी.कर्जदार माणसानं राग करून कसं चालेल! शिवाय तुम्ही आम्हाला अडचणीत मदत करत आहात,तुमचा तर मुळीच नाही."ती आशेनं शेठकडं पाहू लागली.

"वहिनी काय असतं कधी कधी माणसानं परिस्थती पाहून वागायचं असतं.आपल्या निष्ठा, आपली ध्येयं, आपली तत्वे यांना तिलांजली ही द्यावी .भले परिस्थीती सुधारली की ती पुन्हा स्विकारावी"बबनशेठ तिरक्या नजरेनं अदमास घेत म्हणाला.

"व्हय शेठजी ,मी स्वाभिमान,मानी स्वभाव, मान तर केव्हाच गुंडाळून ठेवलाय"शालूनं निरागस अगतिकतेने दुजोरा दिला.

"तेच म्हणतोय मी वहिनी. लोक जर आपल्याला मदत करत असतील तर त्याच्या ही काही अपेक्षा असतात आपल्याकडून,त्या आपण दुसऱ्या मार्गानं पुऱ्या करायच्या असतात."

उंदराचं छोटसं पिलू नव्या पोत्याला कुरतडत शेंगदाणे खाण्याच्या बेतात शालूला दिसला.

"म्हणजे?"शालुच्या स्वरातली अगतिकता कमी होत मानीपणा डोकावला.

"वहिनी रसवंतीच्या वेळेस मी जे लोन काढून दिलंय ते मुळी बॅंकेतलं नव्हतच.शिवाय दवाखान्याच्या वेळचे कर्जही . तर ते एका दात्यानं दिलंय.त्याला बदल्यात आता तुमच्याकडं पैसे नसतील तरी त्याची हरकत नाही पण त्याला तुमच्याकडून काही अपेक्षा आहेत त्या तुम्ही काही वेळपावेतो तत्वं बाजूला ठेवत पुऱ्या कराव्यात" बबनशेठला आता घाम फुटत होता व तो शालूचा ठाव घेत होता.

शालूला आता कळलं. तिच्या मनात आग धगधगू लागली.पण तरी त्यावर ती राखेचा थर चढवत लपवत बबन्याचा मनातलं जहर काढू लागली.

"तुम्ही केलंत ते आमच्या भल्यासाठीच केलंत शेठजी.पण तो देवमाणूस कोण व त्यांना काय हवंय माझ्याकडून?"

आता बबनशेठला थोडं हायसं वाटलं.

"तो कोण हे कळेलच वहिनी.व त्याच्या अपेक्षा काय ही तुमच्या दृष्टीनं फार मोठ्या नाहीत.फक्त तुम्ही तुमचं मन मोठं करा.मग तर कर्जच काय पण ते गजाला चांगला दवाखानाही करणार, व तुमचं सारं जिवन बदलेल इतकं भरभरून देणार"बबनशेठ मासोळी जाळ्याच्या आसपास फिरतेय म्हणून चारा अडकवलेला गळ समोर धरू लागला.

शालूला तो उदार दाता कोण हे कळालंच होतं पण हा बबन्या त्याची फक्त दलाली करतोय की हा पण...?हे पाहण्यासाठी तीही जाळ्यात घुसण्याचं नाटक करू लागली.

"शेठजी तुम्ही सांगाल तसं वागेन मी"

बबनशेठ एकदम फुलला.

"शेठजी उद्या आमच्या गिट्टूचा वाढदिवस आहे.गोडधोड करायचंय पण घरात काहीच नाही हो"

बबनशेठ उठला व एक खाली थैली घेत त्यानं साखर तेल....बऱ्याच जिन्नसा भरुन दिल्या. त्या थैलीचं ओझं पेलतांना शालूस आपण आपलच मढं उचलल्याचा भास झाला.

ती घरी आली थैली कोपऱ्यात फेकली व सायंकाळ पर्यंत रिकाम्या घराच्या आढ्याकडं पाहत अगतिकतेने रडत बसली.

लोनच्या हफ्त्याबाबत विचारायला गेलेली शालू उलट पैसे नसतांना थैली भरून परतली यानं गजाला शंकेच्या इंगळ्या डसू लागल्या.लहाना गिट्टू मात्र थैली उपसून खाण्याच्या वस्तुवर तुटुन पडला. एरवी स्वत: कमवून आणलेल्या कमाईतून या जिनसा आणल्या असत्या तर गिट्टूला खातांना पाहून कोण आनंद झाला असता शालूला! पण आता गिट्टूला अधाशासारखं खातांना तिला प्रचंड चीड आली.परंतू ही चीड कोणावर होती,स्वत:वर?गजावर?गिट्टूवर? परिस्थिती वर?की..‌?तिला कळेना.

 संध्याकाळी शालूनं औषध कालवून थाळीभर भजे काढले.उरलेल्या औषधाच्या पुढ्या तिनं मागच्या घरात ठेवल्याचं गजा पडून पडून पाहत असल्याचं तिला कळालंच नाही.गजाच्या मनात इंगळ्या डसतच होत्या .तो संतापात जेवलाच नाही.

शालू भज्यांची थाळी उचलत दुकानात गेली.बबनशेठला भज्यांचा केव्हाचा वास येत असल्यानं त्यानं आज लवकर दुकान बंद केलं होतं.शालूनं दार वाजवताच मागच्या टप्प्याचा लाईट बंद करत त्यानं दार उघडलं.

शालू घरातून निघताच इकडं गजानं पांगुळगाडी एका हातानं ढकलत नेत पोट दरवाज्याला डोळे व कान लावले.पण बबननं मागचा लाईट बंद केल्यानं त्याला फारसं दिसत नव्हतं पण तरी तो कान लावून प्राणप्रणानं सासूल घेत होता.

 दार उघडून बबनशेठनं हसतच शालूला आत घेतलं.

"वहिनी मागच्या टप्प्यात जास्त उंदराची बीळं आहेत .तुमच्या हातानं ठेवा भजे" बबनशेठ मनात धुमारे फुलवत धडधडत्या छातीनं बोलला.

शालू शांणपणे मागं गेली व अंधारात चाचपडत मातीच्या ढिगारा जाणवताच भजे ठेवू लागली.तोच पुसट अंधारात बबन्याची मिठी मागुन पडली.शालू थरथरू लागली.तो घाणेरडा स्पर्श जाणवताच गंगेच्या निर्मळ पाण्यात गावच्या गटारीची घाण मिसळणार या भितीनं, संतापानं थाळी खाली सोडत ती विनवू लागली.

"भावजी आज नको उद्या त्या उपकारकर्त्याला ही बोलवा मग त्याचे व तुमचेही जन्माचे ॠण चुकवते"

"शाले तो आल्यावर माझ्या सारखे किरकोळ खातेदार दुर्लक्षित होतात गं"

शालूनं हाताची मिठी सोडवत "कशाला होतील दुर्लक्षित?पण उद्या त्यांनाही बोलवाच नक्की" सांगत शालू परतली.

पण तो पावेतो गजाच्या बुरुजाचा चिरा नं चिरा शालूच्या बोलरूपी तोफेच्या गोळ्यांनी उडाल्यांनी तो हताशपणे भिंतीला डोकं आपटून आक्रंदू लागला.तर शालूला बबन्याच्या पापी मनाची पुरती खात्री झाल्यानं ती खदखदू लागली.ती पुढच्या टप्प्यात खांबाला टेकून बसत परिस्थीतीनं लुटू पाहत असलेली इज्जतीनं उध्वस्त होत रडू लागली.तर मागच्या टप्प्यात गजा आपली इज्जत लुटतांना पाहतांना काळजात तप्त सुरे शालूच खुपसतेय यानं जीव ठेवून उपयोग नाही.पण आधी गिट्टू, शालू साऱ्यांना झोपवत यातुन सुटका करून घ्यावी हे त्याला श्रेयस्कर वाटू लागलं.त्यानं पक्का निश्चय करत मनात आखणी केली.

शालू तर लगेच स्वत:ला संपवत होती.पण आपल्या नंतर गजा व आपल्या गिट्टूचं काय?म्हणून आधी यांची सोय करायची मग आपल्या उपकार कर्त्या विक्रांत,बबन्याची सोय करत आपण निघावं असं तिनंही ठरवलं व ती तळमळत झोपण्याचा प्रयत्न करू लागली.

 सकाळ होताच शालूनं स्नान करत लग्नाची ठेवणीची पैठणी संदूकमधून बाहेर काढत नेसली.अंगणात पाणी शिंपडून सडा मारत रांगोळी काढली.रसवंतीची तयारी केली.मग गजाची तयारी केली.गिट्टूला उठवत अंघोळ घातली.व गोडधोड जेवणाच्या तयारीला लागली.शालूकडं पाहताच गजाला पायाच्या जखमाच्या वेदनेपेक्षा ही काळजात जास्त वेदना झाल्या.शालू इतकी झटपट बदलेल याची त्यानं कल्पनाच केली नव्हती.

"शालू, आज पैठणी का घातली गं?"

"अहो,हे काय विचारणं झालं!आज गिट्टूचा वाढदिवस विसरलात का?"शालू लाडात येत म्हणाली.

गजा तिला लाडात येतांना पाहताच आतल्या आत संतापला.

दुपारी शालूनं गजाला व गिट्टूला आग्रह करकरून खाऊ घातलं कदाचित यांना आपल्या हातून शेवटचं गोड जेवण या जाणीवेन तिला गलबलून आलं.पण तिनं दाटून येणारा हुंडूक आतच दाबला.

शालूला सकाळपासून पैठणीत पाहतांना बबन्यास आज आपण विक्रांतला बोलवून मओठी चूक केल्याचं जाणवलं.तरी तो रात्र होण्याची आतुरतेनं वाट पाहू लागली.

तीन वाजताज शालू रसवंतीसाठीऊस टाकायला किसन पाटलाला सांगण्याचं निमीत्त सांगत घराबाहेर पडली.तिनं किसन पाटलाचं खळं गाठलं.खळ्यात कापसाला मारायच्या औषधांचे डबे पडलेले असतात हेतिनं पाहिलेलं होतं.ती खळ्यात गेली तेव्हा कोणीच नव्हतं.शालूनं कानोसा घेत कोपरा गाठला.पुठ्याच्या खोक्यात ती शोधू लागली.तिच्या सुदैवानं की दुर्दैवानं रोगारचा अर्धा उरलेला डबा सापडलाच .तिनं तो घेत घर गाठलं.इकडं तो पावेतो गजानं काल शालूनं ठेवलेल्या उंदीर, घुसा मारायच्या काही पुड्या काढून आपल्या बिन बाहीच्या बंडीच्या खिशात ठेवून घेतल्या.

"शालू, आज भजे खाऊ वाटतात गं!कालच्या वासानं खायची इच्छा होतेय" परतलेल्या शालूस गजा सांगू लागला.

"तुमची पण कमालच आहे! दुपारी तर चांगलं गोडधोड खाल्लंय आणि पुन्हा आणखी भजे?"शालू बोलली पण आणखी मनात खोलवर तिचं आतडं तुटलं.मरणाऱ्या माणसाची शेवटची इच्छा पुरी करावीच नाही तर उगाच ...

तिला भडभडून आलं.

"बरं संध्याकाळी उंदरांसाठी काढायच्याच आहेत ,एक वेगळा घाण आधी काढते तुमच्या साठी".

मध्यंतरी ती अंगणात बबन्याला दिसू या रितीनं उभी राहत छानसं हास्य देऊन रात्री तयार रहा असा गर्भित इशारा देऊन आली.बबन्या त्यानं पुरता बावचळला.पण तो इशारा कसा होता हे शालूलाच माहित होतं.

संध्याकाळी रसवंतीजवळ शालूनं पुन्हा पाणी मारलं.

उशिरानं ती भज्यांचं पीठ फेणू लागली.गजा जवळच बसुन तिच्याकडं पाहू लागला.गजानं तिला अंगणात खेळणाऱ्या गिट्टूला बोलवायला पाठवलं.ती उष्ट्या हातानं बाहेर जाऊन गिट्टूला हाका मारू लागली तोच गजानं पिठात खिशातलं उंदीर मारण्याचं औषध मिसळून पटापट उलथनीनं ढवळलं.शालू गिट्टूला घेऊन परत आली व त्या पिठाच्या भज्या काढू लागली.गरमा गरम भजे गजा भराभर खाऊ लागला.व जवळच गिट्टूला बसवत खाऊ घालतांना अंधारात दिसणार नाही असं गदगदा रडू लागला.

"शालू तू पण खा ना गं भजे!छान बनलेत बघ!"गजा विनवू लागला.

"अहो तुम्ही व गिट्टू तर खा आधी पोट भरून! मग मी पण खाते"शालूही त्यांना अधाशीपणानं खातांना धूराच्या निमीत्त करत रडू लागली.त्यातील काही भजे ती बबनला देऊन आली.मागच्या टप्प्यात बबन्याच्या पलंगावर कुणीतरी बसलेलं तिला जाणवलं. तो पावेतो दहा वाजले. नंतर शालूनं रसवंती सुरू करत पाच सहा ग्लास रस काढला.त्यात किसन पाटलाच्या खळ्यातून आणलेलं रोगार टाकलं.

 शेतातील तणावर तणनाशक मारल्यावर कोवळ्या गवतानं आधी डोकी टाकावी तसंच गिट्टूला भजे आधी लागले.त्याला पाणी प्यावसं वाटू लागलं.तो ताव साधत शालूनं आपल्या हातानं गिट्टूला ऊसाचा रस दिला .गजाला ही ऊसाचा रस पाजू लागताच "शालू आधी तू ही भजे खा ना गं!तू तशीच मागं राहुन जाशील!"तो विनवू लागला.

"खातेच आता ,आधी रस घ्या बघू तुम्ही"म्हणत गजालाही रस पाजला.उरलेल्या रसाचे तीन ग्लास उचलत ती दुकानात गेली.लाडात येत बबनला एक पाजला.

"शालू मागं जा कोण बसलंय बघ"बबन म्हणाला.

"होय माहितीय मला म्हणून तर तीन ग्लास आणलेत"शालू लाडात म्हणाली व मागे जाऊ लागली.विक्रांत तिला येतांना पाहताच खुशीनं उठत तिला जवळ बोलवत "शाले आधीच कबुल झाली असती तर नाहक गजा...."

"आधी रस घ्या बघू.त्या कडवट आठवणी नकोच आता"

"आधी तू घे"विक्रांत प्रेम दाखवत सावध झाला.

शालूनं एक ग्लास उचलत घटाघटा प्याली व दुसरा विक्रांतला देऊन तो पिण्याची वाट पाहू लागली.विक्रांतनं ग्लास हातात घेतला तोच...

गिट्टू बबन्यानं बंद केलेलं दुकानाच दार जोरजोरात ठोकत "माय मला पाणी पाज गं!तू रस पाजला पण गळ्यातली आग जास्तच वाढतेय बघ!घशात नुसती आग होतेय बघ!पाज ना गं पाणी!बबन काका दार उघडा नं माझ्या मायला सोडा नं!" गयावया करू लागला.गजाच्या घशातही आग उठली व तोंडातून फेस निघू लागला.तो घरात पाणी शोधू लागला.पांगूळगाडी माठाकडं नेऊ लागला.एका हातानं माठ त्यानं ओढताच माचीवरून माठ खाली पडला व फुटला घरात पाणीच पाणी होऊनही त्याला पाणी मिळालं नाही.तोच त्यानं नंदाळ्यात तोंड खुपसत घटाघट पाणी घोटलं.बबन्यानं गिट्टूचं बोलणं ऐकताच व घशातली खवखव जाणवताच बोंबलतच तो ही मागच्या टप्प्यात पळाला.

"विक्रांत सालीनं फसवलं आपल्याला!रसात विष टाकलंय रे मेलो आपण! म्हणतच खाली कोलमडू लागला.

विक्रांतच्या पायाखालची मातीच खसकली.त्यानं झटक्यात ग्लास दूर फेकला.

"शाले, मला मारता मारता तूच मरशील बघ आता!"तो रागानं फुत्कारू लागला.

"कुत्र्या हरामी मी मरूनही तुला जिवंत सोडणारच नाही"म्हणत शालू त्याला पकडण्यासाठी त्याच्या अंगावर धावली.पण तो पावेतो त्यानं झटका देत पळ काढली.

हा गेला निदान बबन्या तरी जायला नको.तो जर बोंबलत अंगणात निघाला तर लोक धावतील व वाचवतील म्हणून शालूनं सारी शक्ती एकवटत बबन्याच्या तोंडात जवळच्याच पोत्यातून तांदूळ कोंबून तोंड बांधलं व त्याला फरफटत नेत मागच्या आडात टाकला.ती झुकांड्या देत गिट्टूकडं आली.गिट्टूनं दार उघडून माय येत नाही म्हणून होणाऱ्या आगीनं अंगणातील रसवंतीच्या पाण्यात तोंड खुपसलं होतं.शालूनं त्याला जवळ घेतलं .

"गिट्टू बाळा खूप त्रास होतोय का रे!"रडतच शालू बोबड्या बोलात विचारू लागली.

"माय घघशात आआआग होहोततेय.."

"थोडी कळ सोस बाळा!"म्हणत शालूनं त्याला गट्ट आवळलं.तसं गिट्टू पायाच्या टाचा घासू लागला.

मग ती घरात आली तर गजा नंदाळ्यात तोंड खूपसून पडलेला.

"अहो ऐकलंत का?मी शाबूत आहे अजून!इज्जत तशीच ठेवलीय मी!पण तो हरामी सुटलाय याचंच दु:ख होतंय!नी मी पण तुमच्या सोबतच येतेय बरं का!" म्हणत ती पाणी शोधू लागली.पण पाणी मिळत नाही म्हटल्यावर ती मागच्या आडात खुदली. आवाज ऐकताच गजानंही खुशीनं नंदाळ्यात दम तोडला.......

.

.

.

...

नारूला सारं आठवून झोपेतच ओक्साबोक्सी रडू कोसळलं.

शालूचा बदला कोण व कसा घेणार? या विचारानं तो उठून अंथरुणात बसला पण सना तयार झाली होती हे त्या बिचाऱ्या नारुला माहितीच नव्हतं.


क्रमश:



Rate this content
Log in