Navanath Repe

Inspirational


3  

Navanath Repe

Inspirational


ग्रंथवेडे : बाबासाहेब आंबेडकर

ग्रंथवेडे : बाबासाहेब आंबेडकर

5 mins 1.3K 5 mins 1.3K

"आपली लेखणी आपल्या प्रश्नांपुरतीच बंदिस्त करू नका, तिचं तेज खेड्या - पाड्यांतील गडद अंधार दूर होईल असं प्रवर्तित करा"

'आजपर्यत देव कोणं पहायला नाही, देव पहायची वस्तू नाही. जर देवच माणायचं असेल तर भारतीय घटनेचे शिल्पकार डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांना देव माना' कारण, त्यांनी या देशाला राज्यघटना दिली असे गाडगेबाबा म्हणत. बाबासाहेबांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी झाला. त्यांचे संपुर्ण नाव डाँ. भिमराव रामजी आंबेडकर आहे तर, बाबासाहेब, बोधिसत्व, भिमा, भिवा, भिम ही त्यांची टोपणनावे आहेत.

बाबासाहेब भिमराव रामजी आंबेडकर यांना आपण दलितांचा सुर्य, दलितांची अस्मिता दलितोध्दारक म्हणूनच ओळखतो परंतू कायदेपंडीत, भारतीय घटनेचे शिल्पकार, मानवतेचे पुजारी, समतूचे पुरस्कर्ते तसेच भारतरत्न म्हणूनही त्यांचा लौकीक आहे. त्यापलीकडेही त्यांना ग्रंथवेडा असे म्हटले जाते.

बाबासाहेबांना पहिल्यापासूनच शाळेच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष करून इतर पुस्तके वाचण्याचे वेड (आवड) होती. त्यांचे ग्रंथावर खूप प्रेम होते. त्यांनी अनेक ग्रंथातील ज्ञान आत्मसात केले होते. ग्रंथ हेच गुरू आशी त्यांची धारणा होती. पण त्यांच्या वडीलांना ते पसंद नव्हते. त्यांच्या वडीलांनी त्यांच्याकडून तर्खडकरांची भाषातंर पाठमालेची तीन पुस्तके पाठ करून घेतली होती. तसेच योग्य शब्दांचा तोल तोलून उपयोग कसा करावा हे वडीलांनी त्यांना शिकवले होते त्याविषयी बाबासाहेब म्हणतात की, वडीलांनी मला जे शिकवले तसे इतर कोणत्याही मास्तरांनी शिकवले नाही.

बाबासाहेब वडीलांना नविन पुस्तके आणून देण्यासाठी हट्ट धरत तेव्हा त्यांचे वडील त्यांना हवं ते पुस्तक रात्रीपर्यत आणून देत. जर वडीलांकडे पुस्तक आणण्यासाठी पैसे नसले तर ते आपल्या विवाहीत मुली तुळसा किंवा मंजुळा च्या घरी जात आणि त्यांना तीन - चार रूपये मागायचे त्यावेळी बाबासाहेबांची बहीणी आपल्या वडीलांच्या हातात पैसे द्यायच्या परंतू त्यांच्याकडे पैसे नसतील तर त्या अंगावरील दागिने काढून वडीलांच्या हातात द्यायच्या मग ते दागिने घेवून वडील सोनाराकडे जायचे व सोने गहाण ठेवून मिळालेल्या पैसातून बाबासाहेबांसाठी पुस्तके खरेदी करायचे.

बाबासाहेबांचे एवढे वाचन होते की, एखाद्या पुस्तकात कोणतीही म्हत्वाची माहीती आहे हे टाचण न लिहता तात्काळ सांगत. तसेच कोणता संदर्भ कोठे आहे हे सर्व त्यांना माहित होते. या सवयीमुळे त्यांची स्मरणशक्ती अतिशय तल्लख झालेली होती.

बालपणापासूनच

आंबेडकर हे दहा - बारा वर्षाचे असताना त्यांच्या मनावर रामायण, महाभारत वाचून मोठा परिणाम झाला होता. त्यांचे वडील त्यांना सांगत की, "आपण गरीब असलो तरी भिण्याचे कारण नाही. तू विद्वान का होऊ शकत नाहीस ?" बाबासाहेब एक परिक्षा पास झाले त्यानंतर चाळीतील लोकांनी त्यांच्या वडीलांची इच्छा नसतानाही दादा केळुसकरांच्या मदतीने त्यांचा सत्कार करायचे ठरविले पण त्यांचे वडील म्हणत की, "नको सत्कार. मुलाचा सत्कार केला म्हणजे त्याला पुढारी झालो असे वाटेल." पण शेवटी सत्कार केला आणि दादा केळुसकरांनी बाबासाहेबांना एक बुध्दांच्या चरित्रांच पुस्तक बक्षीस दिलं. हे पुस्तक वाचल्यावर बाबासाहेबांवर काही निराळाच प्रकाश पडला आणि त्यातून त्यांना समजले की, जगाचे कल्याण फक्त बुध्द धर्मच करू शकतो. बक्षिस म्हणून भेटलेले बुद्धाचे चरित्र वाचल्यास त्यात उच्च - निचतेला स्थान नाही हे समजले त्यानंतर त्यांचा रामायण, महाभारत, ज्ञानेश्वरी या गंंथावरचा विश्वासच उडाला. म्हणून बाबासाहेबांनी पहिले गुरू बुद्धांना मानले. तसेच त्यांचे दुसरे गुरू कबीरसाहेब त्यांच्याकडेही भेदभाव नव्हता. कबीरांची एक उक्ती आहे - "मानस होना कठीण है ! तो साधू कैसा होत !!" आणि आंबेडकरांचे तिसरे गुरू ते म्हणजे महात्मा जोतिबा फुले हे होते. या तीन गुरूंच्या शिकवणुकीनेच त्यांचे जिवन घडले.

रात्रीचे जेवन झाल्यानंतर बाबासाहेबांचे वडील त्यांना संताचे अभंग आणि कबिरांचे दोहे म्हणायला लावत. त्यामुळे त्यांना तुकोबारायांची व संताची कवने तोंडपाठ झाली होती. तसेच वडील त्यांना रामायण - महाभारत वाचायला लावत त्यावेळी वडीलांना प्रश्न करत की, हे ग्रंथ वाचण्याची सक्ती का ? मग वडील त्यांना उत्तर देताना म्हणायचे की, "रामायण - महाभारत वाचल्यानंतर मनाचा न्यूनगंड दूर होतो." पण बाबासाहेब प्रतिप्रश्न करत म्हणायचे की, भक्तीमार्ग हा राष्ट्राला विघातक आहे.

बाबासाहेब शिक्षणासाठी परदेशात असताना त्यांच्याकडे पुस्तके खरेदी करण्याठी पैसे नसत त्याशिवाय तर अभ्यास कसा होणार ? नंतर मग ते दररोज ग्रंथालयात जात आणि ग्रंथालय जेवढा वेळ उघडे आहे तेवढा वेळ बाबासाहेब तिथेच बसून पुस्तक वाचत त्यामुळे मध्येच भूक लागायची त्यावेळेस ते स्वतः सोबत आणलेले पाव खायचे पण ही गोष्ट तेथिल ग्रंथपालांच्या निदर्शनास आली. त्यावेळी त्यांने बाबासाहेबांना ग्रंथालयाच्या नियमांचे पालन करा अन्यक्षा शिक्षा भोगावी लागेल ही ताकीद दिली. त्यावेळी बाबासाहेबांनी मान खाली घालून क्षमा करा. यानंतर येथे मी उपाशी बसूनच वाचन करेल असे सांगितले. तेव्हा बाबासाहेबांचे ग्रंथावरील हे अजोड प्रेम पाहून तो गोरा ग्रंथपाल भारावून गेला आणि उद्गारला की, "मिस्टर आंबेडकर, तुम्ही उद्यापासून माझ्याबरोबर जेवायचे. ही तुम्हाला शिक्षा आहे. मी तुमचे जेवन आणत जाईल."

गो-या ग्रंथपालाने दिलेली शिक्षा ऐकून बाबासाहेबांचे डोळे पाणावले. ते पुढे होऊन त्या ग्रंथपालाचे हात आपल्या हातात घेऊन बाबासाहेबांनी कृतज्ञता व्यक्त केली. असा हा ग्रंथवेडा बाबासाहेब आंबेडकर नावाचा विद्वान माणूस आपल्या तरूणांचा आदर्श पाहीजे.

बाबासाहेबांना वेगवेगळ्या ग्रंथाचे वाचन करण्याचे वेड होते. ते ग्रंथावर खूप प्रेम करत असत. त्यांनी अनेक ग्रंथामधून ज्ञान आत्मसात केले होते. 'ग्रंथ हेच गुरू' अशी त्यांची धारणा होती. मुंबई येथे दादर विभागात 'राजगृह' हे बाबासाहेबांचे घर होते. हे घर म्हणजे अनेकविध ग्रंथाचे भांडारच आहे. ही ग्रंथसपत्ती मिळवताना बाबासाहेबांना खूप कष्ट घ्यावी लागली प्रसंगी ते उपाशीदेखील राहीले. ग्रंथासाठी त्यांच्या मनाची तळमळ होत असे.

एकदा बाबासाहेब हे ग्रंथ खरेदी करण्यासाठी पत्नीचे दगिने गहाण ठेवून पुस्तकांचे गठ्ठे घेऊन आले त्यावेळी त्यांच्या वहीणी रागावताना म्हणतात, "तुम्ही पुस्तकांसाठी सर्व घराची राखरांगोळी करीत आहात, पुढे आपले कसे होणार ?" त्यावर बाबासाहेब उत्तर देत की, "मी माझ्या पुस्तकावर जेवढे प्रेम करतो, तेवढेच बायको व मुलगा यांचेवरही करतो." यावरून त्यांनी ग्रंथप्रेम व कौटुंबिक जबाबदा-या यांचे संतूलन साधल्याचेही दिसते.

नेपाळची राजधानी काठमांडू, ११ नोव्हेंबर १९५६ रोजी 'दि वर्ल्ड फेलोशिप आँफ बुद्धिस्ट कांन्फरन्सचे चवथे अधिवेशन आयोजित केले होते' त्यावेळी डाँ. माईसाहेबांसोबत गेले असताना बाबासाहेबांनी आपली 'रिव्हाँल्युशन अँड काँन्टर रिव्हाँल्युशन इन एंशियंट इंडिया' , 'बुद्ध आणि कार्ल मार्क्स' तसेच 'रिडल्स आँफ हिंदुइझम' ही अपुर्ण असलेली पुस्तके पुर्ण करण्यासाठी सोबत नेली होती.

बाबासाहेब आंबेडकर हे 'बहिष्कृत भारत, जनता, मूकनायक' या साप्ताहीकांचे संपादकही होते. जनता पत्रात येणारे बहूतांश संपादकीय लेख त्यांचेच होते.

आजही डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मरण आजच्या तरूणांना प्रेरणादायी ठरणारे आहे. त्यामुळे अशा महामनावाच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !

असलो मराठा जरी,

जय भीम बोलतो मी .

शिवबासमान बाबासाहेबांना जाणतो मी.

दोघांस लावू नका कोणती प्रजाती, सूर्यास नसते जात हे सत्य सांगतो मी...


Rate this content
Originality
Flow
Language
Cover Design