vinit Dhanawade

Abstract


3.4  

vinit Dhanawade

Abstract


" खूनी कोण ? " (भाग दुसरा )

" खूनी कोण ? " (भाग दुसरा )

23 mins 1.2K 23 mins 1.2K

        पुढच्या दिवशी, सगळी टीम शेवटच्या स्पॉटवर गेली. तिथे सुद्धा जवळपास तसच होतं. बोटांचे ठसे, एक कार सापडली होती. चोरीचा कोणताच उद्देश नाही. अभिने ते सगळं महेशला बघायला सांगितलं. तो watchman ला शोधत होता. "मंदार देशपांडे" ला कोणी पाहिलं होतं का ते शोधत होता तो. वर महेश, त्या स्पॉटवर काही शोधत होता. inspector म्हात्रे खाली अभी सोबत होता. म्हणून Sub - inspector कदम, महेश ला माहिती सांगत होते."हे यशवंत पवार म्हणजे कालच्या स्पॉटचे , त्यांचा मुलगा आणि सून… " महेश ऐकतच सगळीकडे बघत होता. 


       मोठी सोसायटी होती. एकंदर तीन गेट होते सोसायटीला. प्रत्येक गेटसमोर watchman होता. तीन गेटमुळे inspector अभिषेकच जरा गोंधळाला. त्याने रात्रीच्या watchman ला बोलावून घेतलं होतं, तसे ते सगळे आलेले होते. शिवाय सोसायटीचा सेक्रेटरीही हजर झाला होता. 

" रात्री झाले ना खून… त्यावेळी कोणी आलेलं का… " अभीने तिन्ही watchman ला विचारलं. 

" हा सर… त्यावेळी म्हणजे ९ वाजता एक जण आलेला… " अभीने लगेच तिन्ही स्केचेस मागवली. त्यातलं एक watchman ने ओळखलं. 

" हा सर… हाच आलेला… ",

"आणि किती वाजता गेला ? ", 

" ते माहित नाही मला…. म्हणजे आम्ही ती नोंद करत नाही ना… ",

"असा का ….?",

"सर, इथे ३ गेट आहेत… आलेले पाहुणे, कोणत्याही गेटने बाहेर जातात… मग आमचीच पंचाईत होते. म्हणून ती नोंद नाही करत.",

"ok, आणि काही सांगू शकता का ?",

"हा… त्याच्या हातात एक छोटी bag होती… जरा घाईतच होता तो. ",

"मग तुम्ही असं direct आत सोडता का कोणालाही… " ,

"नाही सर, आम्ही आधी call करतो ,ज्या घरी पाहुण्यांना जायचे असते…. जर त्यांनी सांगितलं तरच आम्ही त्यांना वर सोडतो.",

" इकडेही सांगितलं का तुम्हाला त्यांनी… ",

"हो….मीच सांगितलं कि मंदार देशपांडे आले आहेत… तर ते बोलले कि लगेच पाठवून दे वर… " अभी पुन्हा विचारात पडला. 


         सगळे पोलिस स्टेशनला आले. सर्व स्पॉट बघून झालेले होते आता. जे काही पुरावे मिळाले होते, ते सर्व समोर होते. तरी महेश काहीतरी शोधत होता. अजून थोडावेळ पोलिस स्टेशन मध्ये बसून महेश,अभी हॉटेलच्या रूमवर आले. अभी अजून विचारात होता. महेश त्याच्याकडे बघत होता. 

"कसला विचार चालू आहे एवढा ? ".

" हा… हो, मला वाटते काहीतरी मिसिंग आहे…. काय नक्की ते आठवत नाही… "अभी पुन्हा सगळं पाहू लागला. अचानक अभी ओरडला… " अरे हो… आपण बाकी सगळीकडे चेक केलं, पण सुरेश पवार…. त्याच्या घरी तर चेकच केलं नाही आपण काही… कारण तो तर हॉटेलवर होता ना. त्याची माहिती तर अपूर्ण राहिली. त्याच्या घरी जायला पाहिजे. तिथे काही माहिती मिळू शकते." अभी बोलला. 

" हा, उद्या जाऊया सकाळी." महेश जरा त्रासिक आवाजात म्हणाला. 

"काय रे… ?" अभीने विचारलं. 

"जरा अंग दुखते आहे रे… झोपतो मी… " ,

"हो… आणि आजारी पडू नकोस हा… मला मदत कोण करणार मग… ?" ,

"अरे …. आहे ना तो म्हात्रे… करेल ना तो मदत. ",

"तो कसला मदत करतोय… स्वतःच सैरभैर असतो… सगळी माहिती, आपण सांगितलं तेव्हा गोळा केली. पहिली केस असली म्हणून काय झालं, असं घाबरून चालते का पोलिसांनी… " ,

" पहिली केस म्हणजे ?", महेशने प्रश्न काढला. 

"अरे तो कदम सांगत होता, या म्हात्रेची पहिलीच केस आहे ते. नुकतीच बदली झाली इथे आणि लगेच हि केस समोर आली. मला वाटते म्हणून असा बावरला आहे तो. " अभी म्हणाला. 

"कमाल आहे यार… एवढी मोठी केस, कोणत्यातरी अनुभवी ऑफिसरला देयाची ना…. म्हणून तर, त्याला अजून कळत नाही, कोणत्या प्रसंगाला काय करायचे ते." महेश बोलला. 

" जाऊदे ते… तू झोप जा आणि उद्या तयार रहा. आपण दोघेच जाऊ, त्याच्या रूमवर. " म्हणत अभी त्याच्या रूम मध्ये आला.


           सकाळीच दोघे जण "सुरेश पवार" यांच्या राहत्या घरी, काही माहिती मिळते का ते बघायला गेले. मोठ्ठा flat होता. दरवाजाची बेल वाजवताच नोकराने दार उघडलं. या दोघांबरोबर दोन हवालदार आणखी आलेले होते. महेशने त्या दोघांना सोबत घेऊन लगेचच तपासाला सुरुवात केली. अभी असाच इकडे तिकडे पाहत होता. एका भिंतीवर त्याला एक फोटो दिसला. जवळ जाऊन बघतो तर सुरेश पवार यांचा लग्नातला फोटो, त्यांच्या पत्नी बरोबर. अभिने हाताने खूण करूनच नोकराला बोलावलं. 

" या कोण ? ",

"या madam आमच्या… ", 

" मग ,त्या दिसल्या नाहीत ते एवढे दिवसात…. त्यांना माहित आहे ना, इकडे काय चाललय ते…कूठे बाहेर गावी असतात का त्या ? " अभीने विचारलं. 

" नाही साहेब… त्या या जगात नाही आता.",

"म्हणजे काय नक्की ? " अभी आश्चर्यचकित झाला. 

" अहो साहेब…. माहित नाही का तुम्हाला… तुमच्याच पोलिस स्टेशन मध्ये तर complaint नोंदवली आहे कि, त्यांनी आत्महत्या केली ना…. " अभिला हे माहितच नव्हतं. तितक्यात महेश बाहेर आला. 

" काय झालं अभी ? " महेशने अभिला tension मध्ये बघून विचारलं. 

" अरे याचं लग्न झालेलं… ",

" हो… ते कळलं मला, आत फोटो सापडले काही…. ", 

" हा, मग त्याच्या बायकोने आत्महत्या केलेली ते कळलं का तुला ? " महेशने नकारार्थी मान हलवली. " तेच तर… आणि हा सांगतो कि आपल्याच पोलीस स्टेशन मध्ये complaint नोंदवली आहे …. म्हात्रे कूठे काय बोलला या बाबत आपल्याला. " अभी म्हणाला. 

" हा म्हात्रे पण ना…. काय करावं त्याचं कळत नाही." महेशही बोलला शेवटी. 

" साहेब मी बोलू का ?" एका हवालदाराने मधेच तोंड उघडलं. 

" हम्म … बोल " अभी म्हणाला. 

" म्हात्रे सर तर आताच रुजू झाले आहेत ना त्यामुळे त्यांना माहिती नसेल या केसची… ",

" हा मग , कोणीतरी handle करत असेल ना हि केस…",

" हो सर , आधीचे सर होते ना, त्यांच्याकडे होती हि केस… सावंत सरांना माहिती आहे ते. " अभीला राग आला होता, त्याने दाखवला नाही तो. " ठीक आहे चला पोलिस स्टेशन मध्ये. तिकडे बघू काय ते." तसे सगळे निघाले. 


       पोलिस स्टेशन मध्ये आले तर inspector म्हात्रे आणि sub inspector कदम दोघेही नव्हते. ते बघून अभीचा पारा अजून चढला. sub inspector सावंत तेवढे जागेवर होते. " सावंत केबिनमध्ये या लवकर." अभी जरा रागातच म्हणाला. महेशने सावंतला हळूच सांगितलं कि अभी रागात आहे ते. जरा सांभाळून घे. सावंत जरा भीतभीतच केबिनमध्ये गेले. हाताने खूण करून त्याने बसायला सांगितलं सावंतला.

" inspector म्हात्रे आणि कदम कूठे आहेत ? " पहिला प्रश्न. 

" मला वाटते ते एखाद्या स्पॉटवर गेले असतील." सावंत म्हणाले. 

" वाटते म्हणजे तुम्हाला माहित नाही का ? ", 

" नाही सर. मी आत्ताच आलो ना, मी येण्याआधीच ते निघाले होते. " अभी तर रागाने लालबुंद झाला होता. 

" आताच्या आता त्यांना call करा आणि विचारा कूठे आहेत ते… आणि तुम्हीही लगेच या पुन्हा केबिनमध्ये…. "

" हो हो सर… " म्हणत सावंत लगबगीने बाहेर गेले. 


महेश ऐकत होता ते सगळं बाहेरून. सावंत बाहेर गेल्यावर तो केबिनमध्ये गेला. 

" कशाला रागावतोस एवढा… शांत हो जरा, काही कामासाठीच गेले असतील ना… " महेश त्याला समजावत म्हणाला. 

" हो, ठीक आहे, पण कुणालाच माहित नाही कूठे आहेत ते दोघे… म्हणजे एवढं काम असताना, कोणी कुणाचच follow up ठेवत नाही, याला काय अर्थ आहे. " अभी म्हणाला. तोपर्यंत सावंत पुन्हा केबिनमध्ये आले.

" सर ते म्हात्रे सर, त्या हॉटेलमध्ये आहेत… काही तपासासाठी. जिथे सुरेश पवार यांचा खून झाला होता. आणि sub inspector कदम, ते गाड्या मिळाल्या ना त्यांची आणखी चोकशी करायला गेले आहेत. " ,

" म्हात्रेला कोणी सांगितलं त्या हॉटेलवर जायला." महेश म्हणाला. 

" या म्हात्रेचं काय चालू असते ना, त्यालाच माहिती…. जाऊदे तो… " अभी त्रासिक आवाजात म्हणाला. आता त्याने सावंत कडे लक्ष दिलं. 

" सावंत… सुरेश पवार यांच्या पत्नी लक्ष्मी पवार यांनी आत्महत्या केली… हे तुम्हाला माहित होतं… " ,

" हो सर",

" मग सांगितलं नाही ते मला तुम्ही…. मी जेव्हा पवार कुटुंबाचे कोणी नातेवाईक आहेत का ते बघा असं सांगितलं. तेव्हाही तुम्ही मला सांगितलं नाही हे…. :",

" हा सर, सांगणार होतो… ",

" कधी ते… आणि या म्हात्रेला तरी माहिती आहे का हि केस ? ",

" नाही सर, ते आले, त्याच्या दुसऱ्या दिवसापासूनच हे सगळे खून सुरु झालेले." अभी आता रागाने येरझाऱ्या घालत होता.


" किती वर्ष झाली तुम्हाला सावंत इथे ?", 

" २ वर्ष सर ",

" आणि कदमला ? ",

" त्यालाही २ वर्ष झाली. ",

" मग एवढी अक्कल नाही का तुम्हाला, एखादी केस कशी handle करायची ते… " अभी ओरडला सावंत वर. सावंत मान खाली सगळं ऐकत होता. महेशच मध्ये पडला मग. 

" अभी… शांत हो रे… तो पण tension मधेच असतो ना… cool यार…" महेशने अभिला एका बाजूला जाऊन बसायला सांगितलं. तसा अभी शेजारी जाऊन बसला. सावंत तसेच बसून होते. " सावंत, तो जरा तापला आहे. म्हणून ओरडला. त्याला असं कामाविषयी केलेलं आवडत नाही. म्हणून ओरडला. मनावर घेऊ नको… " , महेश म्हणाला.

" हो सर, तरी माझीच चूक होती… मला आधीच सांगायला पाहिजे होतं. तुम्हाला पण आणि म्हात्रे सरला सुद्धा… sorry. " सावंत हळू आवाजात म्हणाला. 

" ते जाऊ दे आता, मी काय विचारतो ते सांग आता. " म्हणत महेश सावंतच्या बाजूला जाऊन बसला. 


" हे , आत्महत्या चे प्रकरण कधी झालं… " महेशचा पहिला प्रश्न.

" आतापासून २ महिन्यापूर्वी…. लक्ष्मी पवार यांनी गळफास लावून आत्महत्या केलेली.",

" ok, मग ती केस कोण handle करत होतं.",

" पहिले सर होते ना, पटवर्धन सर… त्यांच्याकडे होती केस. ",

" मग केस चा निकाल काय लागला ? ",

" चालू होती केस… ",

" मग ते पटवर्धन सर कूठे आहेत… त्यांची कूठे बदली झाली… ?",

" तेच तर कळत नाही. मीच त्यांना या केसमध्ये मदत करत होतो आणि केसही चांगली चालू होती.… काय झालं काय माहित, एका रात्री, मला call आला त्यांच्या. म्हणाले कि मी बदली करून घेतली आहे, माझ्या ऐवजी दुसरा inspector येईल, त्याला ही केस दे.",

" मग ? " , अभी दुरूनच ते सगळं ऐकत होता, त्यानेच प्रश्न केला. 

" मग दुसऱ्यादिवशी यासाठीच मी त्याच्या घरी गेलो तर घर बंद. watchman ने सांगितलं कि रात्रीच सगळं सामान घेऊन ते निघून गेले." सावंत म्हणाले. 

" आणि त्या केसचे पेपर्स ? ",

" ते सुद्धा बरोबर घेऊन गेले ते. त्यानंतर २ दिवसांनी हे म्हात्रे सर आले, त्यांची बदली म्हणून.… त्यांना या केसचं सांगणार होतो तर हे सगळं सुरु झालं.",

" बऱ, ठीक आहे…. तू आता बाहेर जाऊन बस. " अभिने सावंतला बाहेर पाठवलं. 


" हे जरा विचित्र आहे ना रे… " अभी महेशला म्हणाला. 

" हम्म… inspector पटवर्धनच नक्की काहीतरी झालं असेल, म्हणूनच ते तडकाफडकी निघून गेले. मला वाटते ना आपल्याला या केसची details काढायला पाहिजे." महेश बोलला. 

" हो, एक काम करूया… तू त्या inspector पटवर्धनची माहिती मिळवं. मी लक्ष्मी पवार यांची अधिक माहिती मिळते का ते बघतो." अभी विचार करून महेशला बोलला. तसे दोघे झटपट कामाला लागले. 


        महेशने लगेच inspector पटवर्धन ची माहिती जमवायला सुरुवात केली. अभी ,लक्ष्मी पवार यांची माहिती साठी फिरू लागला. पवार कुटुंबाचे तर कोणीच राहिले नव्हते, त्यामुळे लक्ष्मी पवार बाबत माहिती मिळणे कठीणच होते. बाकी सर्व टीमला अभीने त्या खुनांच्या स्पॉटवर लक्ष केंद्रित करायला सांगितले होते. तसही ती केस पुढे जाण्यास काहीच नव्हते हातात. त्यामुळे अभी सुद्धा महेशला मदत करायला लागला. प्रथम ते त्याच्या राहत्या घरी गेले. सोबत sub-inspector सावंत होतेच. सगळे त्यांच्या घरी पोहोचले. 

" तुम्ही किती वर्ष एकत्र काम केलंत ? तुम्ही आणि पटवर्धननी… " अभीने सावंतला विचारलं. 

" आम्ही, एकच वर्ष एकत्र होतो सर… ",

"आणि स्वभावाला कसे होते ते ? ",

" शांत… कोणाला असे कधी ओरडले नाहीत ते…. शिवाय काम सुद्धा चोख…. त्यामुळे तसे ते सगळ्यांना आवडायचे. ",

" मग अचानक जाण्याचे कारण काय असेल ? " अभी विचार करत म्हणाला. महेश होता सोबतच. नोकर होता बाजूला. पटवर्धन गेल्यापासून त्यांचे घर बंदच होते. चावी त्याच्याकडे होती, त्यामूळे त्याला बोलावून घेतलं. आता अभीने नोकराला विचारायला सुरुवात केली. 

" जाताना काही म्हणाले का तुला पटवर्धन सर ? ", अभिचा पहिला प्रश्न. 

" नाही, काही सांगितलंच नाही.… अचानक बोलले कि सामान भरायला लाग, इवढंच बोलणं आमचं." ,

" पण काही अंदाज आहे का ते कूठे गेले असतील ? " ,अभिचा दुसरा प्रश्न. 

" मला वाटते ते त्यांच्या कुटुंबाकडे गेले असतील… ",

" म्हणजे त्यांची family इकडे नसते का ?",

" नाही, इथे ते एकटेच राहायचे. त्यांची family तिथे नागपूरला असते.",

" ok, कळलं, फक्त नोकरीसाठी ते इथे राहायचे. पण असं काय झालं नक्की कि ते अचानक निघून गेले." अभीने पुन्हा विचारलं. " त्या दिवशी काय झालं नक्की, सांगशिल का मला.",

" हा, त्यारात्री मी नेहमीप्रमाणे माझं काम संपवून झोपायला गेलो. ",

" म्हणजे इकडेच राहतोस का तू ?". 

" हो, गेटजवळच खोली आहे ना, तिथेच राहतो मी.",

" ok, पुढे मग… " ,

" मी झोपायला आलो तेव्हा रात्रीचे ११ वाजले होते. आणि झोपणार तर लगेच सरांनी बोलावून घेतलं. लगेच सामानाची बांधा-बांधा सुरु करायला सांगितली. तसं मी बांधून दिलं. आणि ते दोघे निघून गेले. ",

" एक मिनिट…. एक मिनिट, दोघे म्हणजे कोण ?",

" त्यादिवशी एक साहेब आलेले…", 

"कोण… किती वाजता ? " ,

" ते कोण होते ते माहित नाही मला…. आणि मला वाटते कि मी झोपायला आलो तेव्हाच ते आले असतील. ",

" मग एकत्रच गेले ते… त्यांचा चेहरा वगैरे पाहिलास का तू ? ",

" नाही, मी सामान बांधत होतो ना म्हणून…",

" हम्म, ठीक आहे, पटवर्धन सरांचा नागपूरचा पत्ता आहे का तुझाकडे ? " ,

" माझ्याकडे नाही आहे सर, पण नागपूरच्या main branch मध्ये मिळेल तुम्हाला.".

"चालेल…. " म्हणत अभी त्या घराबाहेर पडला. 


         तिथून ते ,"लक्ष्मी पवार" संबंधी माहिती गोळा करायला पुन्हा त्यांच्या राहत्या घरी गेले. खूप शोधलं त्यांनी. काहीच सापडलं नाही त्यांना. अभी तर वैतागला होता अगदी. महेशसुद्धा असाच विचार करत बसला होता. अभी विचार करत त्या रूममध्ये येरझाऱ्या घालत होता. बाजूलाच एक लग्नपत्रिका पडली होती. महेश ती उचलून वाचू लागला. 

"काय आहे ते ?" अभीने विचारलं. 

"अरे हि, या दोघांची लग्नपत्रिका आहे." महेश म्हणाला. "बघू." अभीने पत्रिका हातात घेतली. वाचून झाली तशी बाजूला ठेऊन दिली. "चल निघू. " महेश अभीला बोलला तसे सगळे निघाले. गाडीत येऊन बसले. तसं अभीला अचानक काहीतरी आठवलं. गाडीतून झटपट उतरला. पुन्हा त्या रूममध्ये गेला. महेश, बाकीचे हवालदार यांना काहीच कळेना. ५ मिनिटांनी अभी पुन्हा गाडीत येऊन बसला. हातात तीच लग्नपत्रिका. 

"आता हि लग्नपत्रिका कशाला ? ". महेशचा प्रश्न. 

"सांगतो." अभी म्हणाला. पत्रिका सावंतकडे देत म्हणाला." सावंत… हा लग्नाचा हॉल कुथे आहे ते माहित आहे का तुला ? ", सावंतानी पत्रिका वाचली. 

"हो सर… ",

" छान… मग आता या हॉलला जा आणि लक्ष्मी पवार यांचा माहेरचा पत्ता घेऊन ये." अभी सावंतला म्हणाला.

" मला सांगशील का , नक्की काय चाललाय ?" महेशने विचारलं. 

" तुला अजून कळलं नाही, अरे…. लग्न करण्याच्या वेळी, त्या हॉलवर दोन्हीकडचे , आपल्या राहत्या घरचा पत्ता नोंदवून ठेवतात. मग…. लक्ष्मी पवारच्या माहेरचा पत्ता नक्की असेल तिथे… " अभी म्हणाला. 

" क्या बात है… " महेशने अभिच्या पाठीवर शाबासकी दिली. 

" शाबासकी काय रे…. ते महत्त्वाचं आहे सध्या, चल लवकर…. पटवर्धनच्या घरी जायला पाहिजे… त्या आधी नागपूर main branch ला जायला पाहिजे. खूप कामं आहेत." पोलिस स्टेशनला येऊन सगळेच कामात गुंतले. सावंतनी लक्ष्मी पवारचा पत्ता आणला. तोही नागपूरचाच पत्ता… 

" बर झालं… म्हणजे जास्त पळापळ करावी लागणार नाही मला. " अभी म्हणाला. 

" मी येऊ का सोबत ?" महेशने विचारलं.

" नको…. एक काम करू… इकडे तसं पण कोणीतरी लक्ष देयालाच पाहिजे. असं करू, तू या सगळ्यांवर लक्ष ठेव आणि अजून काही त्या 'मंदार देशपांडे'च मिळते ते बघ. मी जाऊन येतो, हा. ",

" हो चालेल. "


         दुसऱ्या दिवशी, पहाटेच अभी नागपूरला निघाला. महेश सांगितल्याप्रमाणे, त्या केसची अधिक माहिती गोळा करत होता. अभी प्रथम, लक्ष्मी पवारच्या माहेरी पोहोचला. तिथे तर त्याला अपेक्षेप्रमाणे वेगळीच माहिती मिळाली. गांगरून गेला तो. योग्य ती माहिती मिळवून अभी तडक पटवर्धन यांच्या घरी निघाला. वेळेत पोहोचला. तिथून वेगळी माहिती, सर्वकाही अनपेक्षित माहिती त्याला मिळाली होती. finally, नागपूरच्या main branch ला जाऊन चौकशी केली. अभी अजून २ दिवस तिथे थांबला. तिसऱ्या दिवशी त्याला महेशचा फोन आला. 

" हेल्लो… आहेस कूठे ? ",

" इकडेच आहे अजून… ",

" आणि माहिती मिळाली का ?",

'' हो… खूप माहिती जमवली आहे मी.…. call का केलेला तू ",

"अरे हो, म्हात्रेला सुट्टी पाहिजे होती… त्याला गावाला जायचे आहे.… अर्जंट… घरी काहीतरी प्रोब्लेम झाला म्हणून… ",

" नको, नको… अजिबात नको… केस solve झाल्याशिवाय कोणालाच सुट्टी नाही… आणि त्याला कशाला सांगितलं , मी नागपूरला आहे ते…. ",

" नाही, मी फक्त बोललो, तू बाहेर गेला आहेस म्हणून …. ",

"ok, मी येतो २ दिवसात, सुट्टी कोणालाच नाही हा… " अभीने आपलं काम संपवलं आणि निघाला पुन्हा नाशिकला. 


नाशिकला आल्याबरोबर त्याने पुन्हा कामाला सुरुवात केली. त्यापूर्वी त्याने म्हात्रेला बोलावून घेतलं. 

" काय म्हात्रे… आधीच सांगितलं होतं ना, केस संपेपर्यंत कोणी सुट्टी घेयाची नाही म्हणून… ",

" हो सर, पण आईची तब्येत बिघडली म्हणून… " म्हात्रे बोलला. 

" ठीक आहे… आज रात्री एक मिटिंग घेऊ. ती मिटिंग झाली कि बघू , तुला सुट्टी देयाची कि नाही ते.",

" हो, चालेल सर,"

" आणि सावंत, आज सगळ्या टीमला सांगा, मिटिंगला यायला… माझ्या रूमवर मिटिंग घेऊ. आणि हो, आज सगळी हत्यारं, guns , revolver's… साफसफाई साठी जमा करा… म्हणजे उद्या पर्यंत मिळतील आपल्याला… तशी order आली आहे मोठ्या सरांची…. कळलं का सगळ्यांना… तर रात्री ठीक ८ वाजता, सगळ्यांनी माझ्या रूमवर यायचे… नॉर्मल ड्रेसिंग करून आलात तरी चालेल… uniform नसेल तरी चालेल. " म्हणत अभीने सगळे पेपर्स गोळा केले आणि त्यांच्या हॉटेलच्या रूमवर आला. 


सोबत महेश होताच. त्याला जरा हे विचित्र वाटलं. 

" अरे काय झालं नागपूरला… ते तर सांग आधी ." महेश उत्सुकतेने म्हणाला. 

" मी रात्री सांगेन ते… " अभी शांतपणे म्हणाला. 

" आणि हे काय मधेच… हत्यारांची साफसफाई… हे कूठून आलं मधेच… ",

" तसं पण मी बघितलं इकडच…. सगळी weapons जुनी आहेत…. साफ करायला होती ती , म्हणून मीच आपल्या सरांकडून परमिशन आणली. शिवाय या ब्रांचच्या संबंधी माहिती काढायला गेलेलो main branch ला… तिथूनही परमिशन मिळाली. " अभी म्हणाला. आणि दोघे रूमवर आले. 


            रात्री बरोबर ८ वाजता, सगळे अभिषेक राहत असलेल्या हॉटेलच्या रूमवर जमा झाले. महेश आधीच आलेला, सगळ्यांना आलेलं बघून अभी उभा राहिला. 

" अरे… या …. या सगळे, वेळेवर आलात हा… बसा, पटकन मिटिंग चालू करू. " तसं सगळ्यांनी आपापल्या जागा पकडून घेतल्या. " चला, बसले का सगळे. " अभी सगळ्यांकडे बघत म्हणाला. 

" हा रे… बसले सगळे… तू मिटिंग चालू कर… आणि आधी सांग, काय माहिती मिळाली ते… " महेश वैतागत म्हणाला. 

" हो रे… Cool Down… सांगतो रे. " अभी sub inspector सावंतकडे बघत म्हणाला. " सावंत, आता पहिल्यापासून सुरु करू… तू सांगतोस का माहिती. ",

" हो सर… सांगतो. " सावंत म्हणाला. " आठ खून झाले… एका मागोमाग एक असे, एकाच कुटुंबातले सगळे… आरोपीचे स्केच तयार आहेत, फिंगर प्रिंट्स सारखेच मिळाले, नाव मंदार देशपांडे…. त्याच्या नावाने मोबाईल नंबर होते, गाड्या भाड्याने घेतलेल्या… एवढी माहिती मिळाली सर… " सावंत थांबले बोलायचे. 

"very good…. तर आता तुम्हा सगळ्यांना विचारतो मी…तुम्हाला काय वाटते, हा मंदार देशपांडे खरा असेल का ? " अभी सगळ्याकडे पाहत म्हणाला. 


" काय प्रश्न आहे अभी तुझा…. साहजिकच तो खोटा असणार " महेश म्हणाला. 

"असो… मला खूप माहिती मिळाली,…. ती मी आता share करू इच्छितो… " अभी आता सर्वांसमोर बसला होता. " मलाही खूप प्रश्न पडले. चक्रावून टाकलं त्या आरोपीने. त्यात इकडचं व्यवस्थापन जरा ढिसाळच आहे… बरोबर ना… " अभी ,sub inspector कदम कडे पाहत म्हणाला. कदम गप्प होते. " त्यात नवीन माहिती मिळाली कि संजय पवार यांच्या पत्नी लक्ष्मी पवार यांनी आत्महत्या केली होती. ती केस काय झाली म्हात्रे ? " ,अभी inspector म्हात्रे कडे बघत म्हणाला.

" मला कसं ठावूक असणार ते …. मी तर नवीन… " म्हात्रे म्हणाला. 

" नवीन असला तरी मागच्या केसेची माहिती घेण्याचा एक प्रोटोकॉल असतो, तेही माहित नाही तुला… " म्हात्रे त्यावर काही बोलला नाही. " तुझी आधीची ब्रांच कोणती…? " तेव्हा ही म्हात्रे गप्पच. " असो… या आधी एक पटवर्धन नावाचे inspector हि केस handle करत होते. ते सुद्धा हि केस अर्धवट सोडून गेले. ते जरा नवलं वाटलं मला. त्यात मी लक्ष्मी पवार याच्या माहेरी जाऊन आलो. तिथे कळलं कि त्या अनाथ होत्या. एक मानलेला भाऊ होता , तो सुद्धा अनाथ… दोघेच राहायचे. त्याचा पत्ता तर मिळालाच नाही. तिचा भाऊ, फोटोग्राफर आणि मेकअपमन…. त्यानेच फोटो काढलेले लग्नातले …. काय करावे तेच कळत नव्हतं." अभी सांगत होता. 


सगळेच लक्ष देऊन ऐकत होते. फक्त कदमांची चलबिचल चालू होती. ते अभिच्या नजरेतून सुटलं नाही.

 " काय झालं कदम ? " ,

"क… काहीनाही, जरा अस्वत्थ वाटते आहे." कदम म्हणाले.

"अचानक…. काय झालं नक्की.",

" माहित नाही सर… ",

" घाबरू नकोस… आपल्याकडे डॉक्टर आहे…. महेश बघ जरा त्याला… " अभी म्हणाला. 

" न… नको सर… ठीक आहे, तुम्ही सुरु करा तुमचं. " कदम घाम पुसत म्हणाला. 

"sure ना…. " अभीने विचारलं. 

" हो " कदम म्हणाले. 

" तर मी पटवर्धनच्या घरी गेलो. तर तिथे कळलं कि ते घरी पोहोचलेच नाहीत. तिकडेच गडबड वाटली मला. मी लगेच नागपूरच्या main branch गाठली. तेव्हा तिथे सगळी माहिती मिळाली. " अभीने आता सगळे पेपर्स वगैरे बाजूला ठेवले आणि दरवाजासमोर जाऊन उभा राहिला. रूमचा दरवाजा बंद केला आणि म्हणाला. 

" सगळ्यांना 'मंदार देशपांडे' माहित असेल…. तीन वर्णन आहेत ना त्याची…. आतापर्यंत सगळ्यांना त्याचं वर्णन पाठ झालं असेल ना…. " सगळेच " हो " म्हणाले. " सगळ्यांना तो खोटा आहे असंच वाटत असेल ना… तर मी सांगतो आता… "मंदार देशपांडे" नावाचा व्यक्ती Actually अस्तित्वात आहे. " अभी म्हणाला. 

" काय ? "महेश मोठ्याने ओरडला. 

" हो, नागपूरला लक्ष्मी पवारांची माहिती काढताना मला हि माहिती मिळाली. पण हा मंदार देशपांडे वेगळाच आहे, त्याचा या खुनांशी काही एक संबंध नाही… मंदार, हा पवार कुटुंबाचा वकील आहे. त्यानेच तर ते लग्न लावून दिलं होतं. आता तो दिल्लीला आहे…. त्याला या खुनांविषयी काही माहितीच नाही… मी त्याला सांगितलं तसा तो लगेचच मला भेटायला आला… आरोपीने, त्याचं नाव वापरून खून केले."अभिने पूर्ण माहिती सांगितली. "असं होय, खरंच ग्रेट आहे तो खुनी… मानलं पाहिजे त्याला…. पण आता पुढे काय ? " महेशने प्रश्न केला. 


" पुढे म्हणजे कळलचं नाही तुम्हाला…. "मंदार देशपांडे" नावाचा व्यक्ती आहे, पण……. पण "म्हात्रे" नावाचा कोणी व्यक्तीच नाही इकडे अस्तित्वात…. " यावर सगळे चक्रावून inspector म्हात्रे कडे बघू लागले. 

" काय सर…. मस्करी करता काय गरीबाची…. " म्हात्रे हसत हसत उभा राहिला. अभी सुद्धा हसू लागला. तसे सगळेच हसू लागले. 

"तू पण ना अभी, एवढं सिरीयस वातावरण झालेलं…मस्करी कसली करतोस …. " महेश म्हणाला. 

"अरे असचं…. जरा relax केलं सगळ्यांना… " अभीने म्हात्रेला खाली बसायला सांगितलं. " चला… पुन्हा केस कडे येऊ…. नागपूर main branch ला गेलो तेव्हा कळलं, कि पटवर्धनची transfer झालीच नाही…आणि इकडे नाशिकला आल्यावर conform केलं मी ते…. जर inspector पटवर्धनची transfer झालीच नाही, तर…. तर मग म्हात्रे…. बदली inspector म्हणून कसा येऊ शकतो… " ते ऐकून म्हात्रे पटकन उभा राहिला आणि पळू लागला. अभिने चपळाई करून त्याला घट्ट पकडलं. " पकडा रे याला… " अभी ओरडला, तसे बाकीच्यांनी म्हात्रेला पकडलं. आणि पकडून खुर्चीवर बसवलं. महेशला अजून कळत नव्हतं कि नक्की काय चालू आहे ते.

 "अभी… पुन्हा मस्करी करतो आहेस ना तू…. " महेश बोलला. 

" नाही, यावेळी मस्करी नाही, खर बोलतो आहे मी.…. म्हात्रे नावाचा कोणी inspector च नाही आहे , ज्याची बदली या ब्रांचला झाली आहे…. बरोबर ना…. म्हात्रे उर्फ राकेश पवार… " अभी, म्हात्रे कडे बघत म्हणाला. म्हात्रे स्वतःला सोडवायचा प्रयन्त करत होता. पण त्याला ते जमलं नाही…. महेश, अजून प्रश्नार्थक… इतर जमलेले सुद्धा… 

" सांगतो, मी लक्ष्मी पवारांच्या माहेरी गेलो होतो तेव्हा कळलं कि माहेरचं आडनाव सुद्धा 'पवारच'… लक्ष्मी अनाथ… त्यांचा फक्त एक मानलेला भाऊ…. लग्नात त्यानेच फोटो काढलेले, त्यामुळे त्याचा स्वतःचा असा फोटो नव्हता कूठे, पण एका फोटोत, जो family फोटो होता…. सगळ्या पवारांचा family फोटो, त्यात त्याचा सापडला. तो फोटो बघूनच सगळं कळलं मला. तो दुसरा- तिसरा कोणी नसून, इतके दिवस आपल्या सोबत inspector म्हात्रे म्हणून वावरणारा राकेश पवारच आहे… हा बघा फोटो. " सगळे फोटो बघून अवाक झाले. 


" अरे पण आपण याला का पकडतो आहे…. " महेशने विचारलं. 

" याला का पकडलं ते हाच सांगेल… काय मिस्टर राकेश उर्फ inspector म्हात्रे…. आणि उर्फ मंदार देशपांडे…. " आता सगळेच अभीकडे पाहू लागले. 

" म्हणजे यांनी खून केलेत सगळे…. " sub inspector सावंत म्हणाले. 

" हो… मला अगदी पहिल्या दिवसापासूनच गडबड वाटत होती. आम्ही दोघे आलो तेव्हा म्हात्रे सुट्टीवर होता… म्हणजे एवढे खून झाले आणि याने सुट्टी घेतली होती. त्यानंतर एकाही केसची व्यवस्थित तपासणी नाही, कि पुरावे गोळा करणे नाही… सगळा अजागळपणा… एका inspector ला मी एवढा अव्यवस्थित कधीच पाहिला नाही. त्यात त्यादिवशी, कोणालाही न विचारता, हॉटेलवर चौकशी करायला गेलेला. तेव्हाच actually फसला हा. कारण मीच सांगितलं होतं, कि कोणालाच माझ्या permission शिवाय त्या रूममध्ये सोडू नये… तेव्हा वाटलं, यात नक्की काहीतरी गडबड आहे…. आणि सर्वात महत्त्वाचं, सावंत… " अभी सावंतकडे बघत म्हणाला. " तुला तरी माहित आहे ना…. एखाद्या senior inspector ची बदली होत असेल तर त्याला किती कालावधी लागतो ? ",

" हो सर, १५ दिवस तरी लागतात कमीत कमी, बदलीला…. त्यानंतर नवीन अधिकारी येतात. " sub inspector सावंत म्हणाले. :

" तेच तर… कमीत कमी १५ दिवस आणि तू म्हणाला होतास कि , पटवर्धन गेल्यानंतर दोन दिवसांनी म्हात्रे आलेला…. मग नक्की झालं कि म्हात्रे खोटं बोलत आहे ते. त्याची माहिती काढली आणि आता ती सगळी समोर आहे. " अभी राकेश कडे बघत म्हणाला. " राकेश… आता तू inspector नाहीस, त्यामुळे तुला म्हात्रे बोलणार नाही मी… तर तू सांगतोस का हे काय आहे सगळं आणि का केलंस ? " अभी थांबला बोलायचा. 


राकेश शांत होता. स्वतःला सोडवायचा प्रयन्त त्याने कधीच थांबवला होता. थोड्यावेळाने का होईना, तो बोलू लागला… 

" मीच लक्ष्मीचा मानलेला भाऊ आणि मीच त्या सगळ्यांना मारलं…. " राकेश म्हणाला. 

" बरं, आणि का असं केलंस ते पण सांगशील तर बरं होईल. " महेश म्हणाला. 

" आणि हो, पटवर्धनचं काय केलंस ते सुद्धा सांग. " अभी म्हणाला. 

" म्हणजे? पटवर्धन…. " कदम म्हणाला. 

" हो, पटवर्धन च्या घरी पुन्हा गेलेलो मी, त्याच्या नोकराने नाही पाहिलं त्याला, पण त्याच्या watchman ने राकेशला बघितलं होतं , ओळखला त्याने फोटो राकेशचा. म्हणजे त्या रात्री हा होता त्याच्या घरी. सांग राकेश, पटवर्धनच काय केलंस .?" अभी मोठ्या आवाजात म्हणाला. 

" त्या पटवर्धनला पण मारलं मी, ऐकतच नव्हता…. " राकेश रागातच म्हणाला. 

" अरे पण का मारलं त्यांना ? " सावंत म्हणाले. 

" माझ्या बहिणीची केस handle करत होता… मला मदतच करत नव्हता… म्हणून मारून टाकलं त्याला." राकेश बोलतच होता. 

" सविस्तर सांग, तुझ्या बहिणीने आत्महत्या केली होती ना… " अभी म्हणाला. 

" आत्महत्या…. छे… तो खून होता, खून… एवढं छळायाचे तिला, रोज मला फोन करून सांगायची…. मारतात, त्रास देतात. सगळं त्या पैशासाठी…. हुंडा पाहिजे होता त्यांना…. लग्नात तर काही बोलले नाहीत, लग्न झाल्यानंतर तिला त्रास देयाला सुरुवात केली… एवढे मोठे लोकं, श्रीमंत… तरी त्यांना हुंडा पाहिजे होता… किती पैसे दिले तरी कमीच त्यांना, लक्ष्मीचा नवरा संजय बोलला, बिजनेस साठी ५ लाख दे नाहीतर बहिणीला घरी घेऊन जा. कसेबसे जमवले… पुन्हा तेच… वर ३ लाख अजून दिले, माझं घर गहाण ठेऊन…. तरी तिचा त्रास चालूच होता. " राकेश शांतपणे सांगत होता.  


" शेवटी तीच बोलली…. मला त्रास झाला तरी चालेल, पण तुला पुन्हा त्रास होऊ देणार नाही… तेच शेवटचं बोलणं…. गळफास लावून घेतला तिने आणि त्यांनी आत्महत्या नावं दिलं त्याला.…. सांगितलं कि तिच्या डोक्यावर परिणाम झालेला म्हणून तिने गळफास लावला.… मी किती सांगायचा प्रयत्न केला त्या पटवर्धनला…. तो पण आमच्याच गावाचा…. तिला होणारा त्रास मी त्याला सांगितला , तरी ऎकेना , शेवटी केस बंद करणार होता…. तेव्हा मीच ठरवलं, याचीच केस close करायची… त्याला धमकावलं, त्याच्या कुटुंबाला त्रास देऊन त्याच्याकडून सगळी कागदपत्र गोळा केली. transfer चं खोटा सांगायला सांगितलं त्याला मी…. त्याला नागपूरला परत घेऊन येण्याचे म्हणून त्याच्या सोबत निघालो आणि वाटेतच त्याला संपवलं. त्याच्याकडूनच मला पवार कुटुंबाचे पत्ते मिळाले सगळे.… एकेकाला वेळ मिळाला तसं मारलं. " ,

" पण मंदार देशपांडे हे नाव का घेतलंस तू ? " , महेश मधेच म्हणाला. 

" त्यालाही मारणार होतो मी, पहिला नंबर त्याचाच होता, त्याच्यामुळे हे लग्न झालं आणि माझी बहिण दूर गेली…. पण ऐनवेळी तो दिल्लीला गेला म्हणून वाचला. मग मी इकडे येण्यासाठी पटवर्धन च्या जागी बदली inspector म्हणून दाखल झालो… या कोणालाच कळलं नाही ते. मग प्रत्येकाला "मंदार देशपांडे" च्या नावाने call केले, त्यांचाच वकील ना तो, जवळचा अगदी…family मधला अगदी, त्यामुळे त्याला त्यांच्या घरी कधीही सहजच entry होती…. त्याचाच फायदा झाला मला.… सगळ्यांना संपवलं…. खूप आनंद वाटतो आहे आता… " ,

" त्यांना मारलस कसं ? " , अभीने विचारलं. 

" मी सोबत काहीतरी घेऊनच जायचो, खाण्यासाठी…. त्यातच गुंगीचे औषध मिसळलं होतं मी…. मंदारच्या ऐवजी मी कसा आलो, हा प्रश्न सगळ्यांना पडायचा…. पण लक्ष्मीचा भाऊ भेटायला आला म्हणून ते मी दिलेले खायचे, मूर्ख लोकं…" राकेश हसला. " हळूहळू शुद्ध हरपली कि माझं काम सोप्पं होयाचे… एक सुरा घेतला होता मी खास या कामासाठीच…. " राकेश पुन्हा हसला. 


किती विकृत होता तो. अगदी सहज सांगत होता. तरी अभीने पुन्हा विचारलं त्याला, 

" पण तू तर मेकअप करून जायचा ना… मग ते कसे ओळखायचे तुला…. आणि तुझी उंची कमी -जास्त कशी व्हायची मग… " ,

" मी मेकअपमन सुद्धा आहे , विसरलास वाटते inspector अभिषेक…. खोटी दाढी आणि केस काढायला किती वेळ लागतो… प्रत्येकाच्या घरात प्रवेश करताना तेच करायचो मी…. आणि माझं काम झालं कि पुन्हा आरामात बसून मेकअप करायचो. …आणि माझ्या उंचीच…. ते तर अगदी सोप्पं… पायात स्टिक लावल्या कि झालं… पाहिजे तितकी उंची वाढवता येते.…. confused केलं ना सगळ्यांना…. मला तसंच confused करायचं होतं पोलिसांना…. म्हणून माझा चेहरा लक्षात राहावा म्हणून मुद्दाम कोणाबरोबर तरी वादावादी करायचो…. मला वाटलचं नव्हतं कि मी कधी पकडला जाईन…. पण inspector अभिषेक…. hats off to you…कसला हुशार निघालास तू …. great ". राकेश उत्साहात म्हणाला.


शांतता,… राकेशचं बोलणं संपलं. महेशला अजून काही प्रश्न होते. 

" पण अभी, तुला कसं कळलं कि म्हात्रे ऊर्फ राकेशच खुनी आहे ते… " महेशने लगेच प्रश्न केला. 

" शेवटचा स्पॉट आठवतो ना तुला…. मोठी सोसायटी, ३ गेट… " ,

" हो, त्याचं काय ? ",

" तिथे मीच confused झालो होतो… राकेशचं सुद्धा तेच झालं , त्याने entry एका गेटमधून केली. पण जाताना, मला वाटते तो गोंधळाला असेल… ३ नंबर गेट मधून तो बाहेर गेला.…. त्यात भर म्हणून शेवटचा खून केल्याच्या आनंदात तो दाढी लावायचा विसरला बहुदा. " अभी म्हणाला. 

" हे तुला कसं कळलं ? ", 

" त्या watchman ने मला त्याच दिवशी सांगितलं होतं, जेव्हा आपण चौकशीला गेलो होतो. तेव्हा त्याने म्हात्रे उर्फ राकेशला ओळखलं होतं. मला खूप नंतर त्या watchman ने सांगितलं कि म्हात्रे सर त्या रात्री आले होते. तेव्हा मला वाटलं कि त्याचं काही चुकते आहे, पण नंतर जेव्हा राकेश बद्दल कळलं तेव्हा मी सुद्धा काही शोध घेतला…. हा राकेश उर्फ म्हात्रे जेव्हा खून व्हायचे तेव्हा पोलिस स्टेशन असो वा त्याचं पोलिस क्वार्टस मधली रूम , दोन्ही ठिकाणी नसायचा. हे मी शोधून काढलं. शिवाय या गाड्या ,ज्या याने सोडल्या होत्या… त्यातली एक गाडी घेताना हा म्हात्रेच्या मेकअप मध्ये म्हणजे जसा त्याच्या नॉर्मल लुक आहे तसा गेला होता. मी तिथेच नक्की केलं कि हे सगळं म्हात्रे उर्फ राकेशच हे करत आहे. खोटा पोलिस अधिकारी बनून आला आणि खून करून जाणार होता. इतक्यात आपण इथे आलो. ते कोणाला माहित नव्हतं म्हणून बरं झालं… नाहीतर हा कधीच पसार झाला असता…. आपण आलो म्हणून राकेश अडकला आणि स्वतःच केलेल्या खुनात आपल्याला मदत करायला लागला. आताही मी इथे नाही बघून पळत होता, आईच कारण सांगून …. पण मला खरं कळलं होतं, म्हणून हि मिटिंग घेतली. त्यासाठी आपल्या पिस्तुल, गन्स… ची साफसफाई च नाटकं केलं. राकेश मला ह्त्याराशिवाय पाहिजे होता समोर, नाहीतर इतरांच्या जीवाला धोका निर्माण झाला असता. " अभी राकेशकडे पाहत म्हणाला. " राकेश, planning खूप चांगलं होतं. पण आरोपी असाच लपून राहत नाही… कळलं. " राकेश हसतच होता, 

" आता मला कोणतीही शिक्षा करा…मला पर्वा नाही त्याची… मी माझ्या ताईला न्याय मिळवून दिला… " आणि राकेश मोठयाने हसू लागला. 


         अभिने " त्याला घेऊन जा " असं सांगितलं. सावंतला त्याची केस फाईल बनवायला सांगितलं. अभी, महेश सोडून बाकीचे सगळे पोलिस स्टेशनला परतले. दुसऱ्या दिवशी सकाळी, सगळे पुन्हा पोलिस स्टेशनमध्ये जमले. एका नवीन पोलिस अधिकारीची तत्काळ नियुक्ती त्या ब्रांचवर करण्यात आली. योग्य ते पेपर्स आणि माहिती गोळा करून राकेशच्या नावावर केस उभी केली गेली. संध्याकाळ पर्यंत अभी, महेश मोकळे झाले. आता मुंबई जाण्यास मोकळे दोघेही… अभी त्याचं सामान भरून तयार होता. हॉटेलच्या गेट जवळ महेशची वाट बघत होता. ५ मिनिटांनी महेश आला. आता दोघेही त्यांना घेऊन जाणाऱ्या गाडीची वाट बघू लागले. दोघेही गप्पगप्पच होते. 


महेशने विषय काढला. 

" किती किळसवाणा प्रकार ना… फक्त त्याच्या बहिणीची केस बंद केली म्हणून पटवर्धन सहित पूर्ण कुटुंबाला संपवलं त्याने… ",

" ह्म्म्म…. actually, हे मी सांगितलं नाही कोणासमोर, तुला सांगतो… राकेश काय बोलला आपल्याला, त्याच्या बहिणीला मानसिक आजार होता असं ठरवून ती केस close करत होते ना… " ,

" हो , बरोबर… " महेश उत्तरला. 

" पण राकेशच मानसिक रोगी होता… " त्यावर महेश चाट पडला. " हो, मी जेव्हा त्याच्या नागपूरच्या घरी गेलो होतो ना, तेव्हा मला त्याच्या शेजाऱ्याकडून हि माहिती मिळाली. शिवाय गेली दोन वर्ष ,तिथे त्याची treatment चालू आहे. तो सुधारत होता… इतक्यात त्याच्या बहिणीनी आत्महत्या केली. ज्याची या जगात फक्त एक बहिणचं होती… त्याला ती सोडून गेल्यावर काय वाटलं असेल…. या पवार कुटुंबाचे सुद्धा कळलं मला…. राकेशने किती पैसे दिले होते त्यांना, हुंडा म्हणून… मग त्याचा हा राग स्वाभाविकच होता, फक्त मार्ग चुकीचा निवडला त्याने.… पटवर्धनचं वाईट वाटते…. हकनाक त्याचा बळी गेला यात. " अभीने बोलणं पूर्ण केलं. 

" हो, हुंडाबळी अश्याच असतात…. दोन्ही घरं उद्ध्वस्त होतात. " महेश म्हणाला. तितक्यात गाडी आली. 

" चलो, खूप डोकं फिरवलं त्याने…. planning मस्त होती ना… " अभी गाडीत बसत म्हणाला. 

" planning perfect होती…. पण तुझ्यासमोर कसं चालणार त्याचं… hats off to you, inspector अभिषेक… " महेश हसत म्हणाला… अभीही हसू लागला ते ऐकून. आणि गाडी सुरु झाली , दोघे निघाले पुन्हा मुंबईच्या वाटेवर.


--------------- The End --------------


Rate this content
Log in