Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Vgshjsksldv Gshshshs

Crime Drama Tragedy

5.0  

Vgshjsksldv Gshshshs

Crime Drama Tragedy

थांबलेली चूक

थांबलेली चूक

9 mins
9.8K





१० वी ची परिक्षा मी पास झालो, अभिमानाचीच गोष्ट ४०% पडले. आनंदच वेगळा असतो हा. मला तर बोर्डात आल्यासारखच वाटत होत. कुणाला खात्री नव्हती माझी पास व्हायची. पाटीलसरांनी तर वर्गात माझी इज्जत काढली. मी पास होऊच शकत अशा सरांना मी पेढे घेऊन गेलो होतो. मला वाटल त्यांना वाईट वाटेल माझ्या पास होण्याच पण आज शिक्षकाच मन कळाल मी पास झालो म्हणून स्वतःच्या खिशात हात घालून मला ५० रुपये दिले. पास होणाऱ्या ९०% ते ९९% पाडणाऱ्यांना सरांनी एक रुपया दिला नव्हता आणि मला डायरेक्ट ५० रुपये मिळाले होते. मी डबल खूष. सरांनी घट्ट मिठीत घेतल आणि पुढच्या प्रगतीसाठी भरपूर शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले. पूर्ण १० वीच वर्षात सर कधीच प्रेमाने बोलले नाही सारखा अपमान करायचे. इच्छा व्हायची शाळा सुटल्यावर चोपाव त्यांना. पण आज त्या राग असणाऱ्या शिक्षकासमोर मी आदरातीर्थी पाया पडत होतो.
घरी भरपूर शिव्या पडल्या ४०% पडले म्हणून पण आईबाबांच्या शिव्या समजत नव्हत्या. कारण सरांची ५० रुपयाची नोट मिळाली होती. सरांची नोट मी खर्च केली नाही. ती तशीच ठेवली.
१० वी झाल्यावर शाळा सुटली आणि कॉलेज सुरु झाल. मी आर्टस् ला प्रवेश घेतला आणि आयुष्य सुंदर वाटू लागल कारण कॉलेजला येऊन मी प्रेमात पडलो होतो. सुवर्णा तीच नाव. सोन्यासारखी चककणारी जरपरी मला भेटली होती. मी वेडा झालो होतो. ती हसली की मी तिला बघून बेशुध्दच पडायचो. माझ्या वर्गात नव्हती ती हेच माझ खराब नशीब. ती कॉमर्सच्या विभागात होती.
११ वी झाली आमची
१२ वी झाली आमची
१२ वीला खूप प्रगती झाली. १० वी ४०% आणि १२ वीला ३८%
घरात परत शिव्यांचा पाऊस पडत होता. पण मी प्रेमाच्या छत्रीत होतो ते पण सुवर्णा सोबत. मग कसा पाऊस कळणार.
अभ्यासाच्या पुस्तकात ती, वह्यांच्या शेवटच्या पानांवर ती, प्रत्येक चित्रपटातल्या हिरोत मी हिरोईनीत ती, झोपताना स्वप्नात ती. वेडा झालो होतो मी तिच्यासाठी.
१३वी  १४वी तिला बघण्यात आणि स्वप्न सजवण्यात गेली. मी लग्न करणार तिच्यासोबत हॉलवर, तो ड्रेस घालणार, हनीमूनला कुलूमनालीला जाणार.
१५ वीला ठरवल तीला विचारायचंच तीला बसस्टॉपवर भेटायच ठरलं. आता राहवत नाही. मी तिला आज विचारणारच. ती आली समोरुन.
मीः सुवर्णा
सुवर्णाः हो, कोण तू?
मीः तुझ्या कॉलेजला आहे मी. आर्टस् ला शेवटच्या वर्षाला.

सुवर्णाः मग मी काय करु.

मीः मी ४ वर्षापासून तुझ्यावर प्रेम करतोय. मला तुझ्याशी काही झाल तरी लग्न करायचं आहे.

सुवर्णाः ये मजनू तुझ्यासारखे हजार भेटलेत. माझी वाट सोड नाही तर चप्पलीने मारेन इथ रस्त्यात.

मीः अग तू गैरसमज करु नकोस. शांत हो. मी खरचं तुझ्यावर खर प्रेम केलय. तुझ्यावाचून मी कुणाचा विचार करुच शकत नाही.

सुवर्णाः ये गप्प. मला तू आवडत नाहीस. तुझ्यासारखे भरपूर माझ्या मागे फिरतात. लाज वाटत नाही का कुत्र्यासारख शेपूट हलवत मागे फिरायला.

मीः तू माझ्या प्रेमाचा अपमान करतेस काहीही पण बोलून. तू विचार कर. वेळ घे. मी वाट पाहीन. पण माझ्या एवढ प्रेम करणारा मुलगा मिळणार नाही.

सुवर्णाः तू माझ्या समोरुन निघ. नाहीतर भावाला सांगेन आणि तो चोपेल तुला.

रागात तिथून निघून गेलो. माझ डोकच फिरवल होत तीने. माझ्या खऱ्या प्रेमाला कचऱ्याच्या डब्यात टाकल. माझी लाईकी काढली. मनात शिव्याच होत्या तिच्याबद्दल. ४ वर्ष प्रेम करुन सुध्दा एका क्षणात सगळी स्वप्न मातीमोळ झाली होती. दोन आठवडे उलटून गेले. तीच हसण आता मनात राग निर्माण करत. आता रागच राग येतो. घरात पण तिच्यामुळे चिडचिड होत होती. सर्वांशी घरात भांडण होत होती. तीच्या बद्दल रागामुळे बदल्याची भावना निर्माण झालीय. सुंदरतेचा घमंड आलाय तिला. तीची जिरवलीच पाहिजे. ठरल मग. तिच्या सोन्याच्या तोंडावर ॲसिड फेकायच. आयुष्यभर तडपली पाहिजे. सुंदरताच हरवून टाकायची तिची. कुत्रा बोलली मला. तिला दाखवायच कुत्रा चावतो तेव्हा कस वाटत ते.
तो दिवस उजाडला. सायन्स लँब मधून ॲसिडची बाटली चोरली. तोच बसस्टॉप ठरला. जिथे माझी लाईकी काढली तीथच तिला तडपडवयाच. मला ज्या वेदना तीने दिल्या त्याची तिला जाणीव करुन द्याची.
मी बसस्टॉपच्या मागे लपून बसलो. ती येताना दिसली. दप्परातून बाटली काढली. टोपण उघडल आणि कहरच झाला.
माझा पाय दगडावरुन सटकला आणि बाटली माझ्या हातातून सटकली. माझ्या हातावर ॲसिड पडल थोड. मी लांब टाकली बाटली. आणि हात झटकत बाहेर आलो. असंख्य वेदना झाल्या. मी तडपडललो. हात चणचण करायला लागला. हाताचा रंग बदलून क्षणातच सूज पकडली. एका क्षणातच नर्क यातना झाल्या.आणि तीने मला पाहिलं.

सुवर्णाः काय झालं रे.

मी रागात

मीः काय नाही.

सुवर्णाः दाखव हात. अरे बापरे हे काय झालं. चल दवाखान्यात.

मीः मला नाही जायाच.

सुवर्णाः तू चल नाय तर मार खाशील.

तीने  दवाखान्यात नेल. डॉक्टरांनी मलमपट्टी केली. आणि विचारपूस केली.

डॉक्टरः काय झाल रे. ॲसिड कस पडल हातावर.

मी गप्प. आणि वेदना सहन करत होतो.

सुवर्णाः डॉक्टर ते लँबमध्ये प्रयोग करताना धक्का लागून हातावर पडल.

डॉक्टरः जास्त काही झाल नाही. काही दिवस चणचणेल. मी लिहून देतो ते औषध लाव आणि गोळ्या घे आराम पडेल. हात काही दिवस भिजवू नको. काळजी घे. जपून प्रयोग करत जा.

मी गप्पच. तिला कळल असाव मी ॲसिड का आणल ती निघून गेली. मी पण घरी गेलो. घरी परत शिव्यांचा पाऊस. आणि आता पूर्ण भिजलो शिव्यांच्या पाऊसात.

तिच्या निघून जाण्यान मन विचारात पडल. रात्रभर झोप लागली नव्हती. झोपच येत नव्हती. दुखण जाणवत होत.

जीच्या जीवावर मी उठलो होतो. तीनेच मला मदत केली होती.

६ महिने उलटले.

आज १५ वीचा निकाल. मी पास झालो आता मात्र पहिल्यांदा अधोगती झाली. मला ७१% पडले. आनंद करु का दुखः तेच कळत नव्हत एवढा मी बदललो होतो.
मी त्याच बसस्टॉपवर थांबलो तीची वाट बघत. ती मैत्रीणीसोबत आली.
तिच्या हातात एक पत्र देऊन मी निघून गेलो.

माझ पत्र

सुवर्णा,
तुम्हाला प्रिय बोलण्यासाठी मी पात्रच राहिलो  नाही. हे पत्र तुम्हाला त्रास देण्याचे हेतूने बिलकूल लिहले नाही. पहिल्यांदा तुम्ही १५ वी पास झाला त्याबद्दल तुमच अभिनंदन. मी पण पास झालो. पण पास झालो तरी मी खूश नाही आहे म्हणून तुम्हाला पत्र लिहायच ठरवल. माझी चुकी मला मान्य करायची आहे.
ते ॲसिड मी तुमच्यावरच फेकायला आणल होत. तुमच्या नकाराने माझ्या एकतर्फी प्रेमाने एका मानसिक विकृतीची जागा घेतली होती. त्या दिवशी दवाखान्यातून तुम्ही काहीच न बोलता गेला तेव्हापासून मी बैचेनच झालो. माझी झोपच उडाली. कदाचित तुमची माफी मागून ती समाधानी झोप मिळेल.
ॲसिडच्या चार- पाच थेबांनी जाणीव करुन दिली कि ॲसिड फेकण किती सोप असत आणि त्याला सहण करण किती अवघड असत.
खूप विचार केल्यावर कळलं.
देवाने माणूस बनवला
स्री आणि पुरुष बनाला. दोघांना समान शक्ती दिली
आणि
स्रीला मातृत्व दिल ते पुरुषाला दिल नाही. पण स्रीला घमंड चढू नये म्हणून स्रीच्या मातृत्वाला पुरुषाला कारणीभूत ठरवल गेल.
आणि हे मातृत्व स्री पुरुषाच्या मिलनानंतर शक्य असेल अशी अट ठेवली.
या मिलनासाठी आकर्षण हा मार्ग ठेवला.
स्रीबद्दल पुरुषाच आकर्षक हे नैसर्गिकच आहे.

पण आज या आकर्षणाने एक मानसिक विकृतीची जागा घेतलीय हे मला जाणवल.
आज अश्लील चित्रफितींमुळे आकर्षणाने वेगळे रुप घेतले आहे. चित्रपट चांगला चालावा चित्रपटांनी चांगला पैसा कमवावा यासाठी स्रीच्या शरीराचा बाजार मांडला जातोय.

परदेशातून अंमली पदार्थाच सेवन करुन शरीर सबंधांच्या चित्रफिती काढल्या जाऊ लागल्या. स्रीच्या शरीरांच भयानक प्रदर्शन मांडल जाऊ लागल. स्री बद्दल चुकीच्या गोष्टी पसरवल्या जाऊ लागल्या. या सर्व चित्रफितीमुळे तरुणाची अवस्था पिसाळलेल्या लांडग्यासारखी करुन ठेवली.
सुंदर आकर्षणाला वासनेचा शाप लागला.
आकर्षण मानसिक विकृती बनू लागली. आणि मानसिक विकृतीमुळे अजून भयानक रुप घेतेय. आजची तरुण पिढीला भारतीय संस्कृतीतील स्रीतल आईच बहिणीच वहिनीच रुप विसरत चाललीय. आता या विकृतीने बलात्कार, विनयभंग, ॲसिड हल्ले, चाकू हल्ल्यांच रुप घेतलय.
आणि या सगळ्या विकृतीला मी बळी पडून तुमच्यावर ॲसिड हल्ला करायच ठरवल.
मी एवढ स्पष्टीकरण यासाठी दिल की मला माझी चुकी प्रामाणिकपणे मान्य करुन सर्व स्पष्ट बोलायच होत. प्रत्येक पुरुष हा वाईट नसतो त्याला अजूबाजूची परिस्थीती वाईट बनवते.
त्या परिस्थितीचा मी शिकार बनलो. पण परिस्थितीच कारण देऊन या विकृतीपासून मी पळाणार नाही एवढच ठरवल होत मी. दोनच गोष्टी करणार एकतर यातून बाहेर पडेन नाहीतर स्वतःला संपवेन.
कारण ही विकृती पिसाळलेल्या जनावरांसारखीच आहे.
स्वतः पिसाळून दुसऱ्याला जखमी करुन परत वाईट वाटून घेण्यापेक्षा स्वतःला मारणच सोप आहे.

पण मी यातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करणार अस ठरवल.
आठवडाभरानंतर स्वतःवर नियम टाकायला सुरवात केली

टच स्क्रीन मोबाईल विकला. साधा मोबाईल वापरायला सुरवात केली.

नंबर बदलला.

इंटरनेट बंद केल.

सर्व मुलींकडे पाहण बोलण बंद केल.

सर्व चित्रपट बघण बंद केल.

महान लोकांची पुस्तके, पेपर वाचायला सुरवात केली.

आणि सर्वात मोठी गोष्ट ध्यान सुरु केल.

ध्यान केल्याने धावणाऱ्या विचारांना शांती मिळाली. सर्व गोष्टी विचारपूर्वक करायला शिकलो.

माझी झुंज माझ्याच आतल्या राक्षसाशी चालू होती.

सुरवातीला हे नियम पाळण अश्यक्यच वाटल पण हळूहळू नियमांनी मनपरिवर्तन घडवल आणि ते मला जाणवल.

सर्वात मोठा परिणाम ध्यानामुळे झाला. मी स्वतंत्र स्वतःचे चांगले विचार करु लागलो, वागण्यात मोठेपण आल.

महान माणसांच्या पुस्तकांनी तर जादूच केली अस वाटत होत त्या मानसिक विकृतीने जखडलेल्या आजाराला या पुस्तकांतील देशप्रेम, स्री आदर, माणुसकीने मुक्त केल.

त्या ॲसिडच्या डागांनी सांगितले तुझ्या बहिणीवर जर कोणी अस ॲसिड टाकल अस तर तुला ॲसिड न टाकता पण डबल वेदना झाल्या असत्या.

मी करत होतो ते कृत्य माफी योग्य नाही पण जमल तर माफ करा. आता आपली भेट कधीच होणार नाही. तुम्हाला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा.

नंतर एक महिन्याने कॉलेजच्या कामासाठी गेलो होतो एकदा. तेव्हा बसस्टॉपच्या बाजूवाल्या टपरीवाल्या काकांनी मला बोलावल.
टपरीवाले काकाः जी मुलगी तुला बसस्टॉपवर ओरडली होती तिने तुला हे पत्र दिलय.

पत्र घेऊन पाहिल

प्रिय मित्रा,

तुला खूप शोधल पण तुझ नाव मला माहित नाही, तुझा पत्ता माहित नाही म्हणून हे पत्र या काकांना दिल. तुझ पत्र वाचून तुझ्याबद्दलचा आदर वाढला. विचार करुन नाती सांभाळून जगणारी माणस खूप कमी असतात. त्यातला तू आहेस.

चुका करणारे १००० असतात,
ते मान्य करणारे १०० च असतात
पण त्या दुरुस्त करणारे १० असतात.
त्या १० पैकी तू १ आहेस.
तुझा हा स्वभाव मला खूप आवडला.
मी तुला लग्नाच आश्वासन देऊ शकत नाही कारण मला माझ्या आई वडलांच्या संमतीने लग्न करायच आहे. मी माझा पत्ता खाली लिहलाय तु आईबाबांना भेटून बघ. नशीबात असेल तर भेटू. तुझ्यामुळे पुरुषातला वेगळा माणूस कळाला.  मी तुला माफ केलय. तुझ स्पष्टीकरण पटल. सगळ्यांनी तुझ्यासारखा विचार केला तर नक्कीच विनयभंग, बलात्कार, ॲसिड हल्ले, चाकू हल्ले बंद होतील. मला तुझा अभिमान वाटतो.

तुझी मैत्रीण
सुवर्णा

नंतर आयुष्य बदलत गेल.
माझ नोकरीच चांगल्या कंपनीत काम झाल
आई वडलांनी कपडे, बुट, घड्याळ घेतल होत. खरच आता जुने दिवस आठवल की खूप वाईट वाटत मी कस त्यांचाशी किती अपमानास्पद बोलायचो. घरातली काम न करणारा मी आईला, बाबांना जमेल तशी मदत करतो आता.
न थकणारी आई, आणि कुंटुबासाठी झटणारे बाबा माझ्यासाठी प्रेरणास्थान झालेत.
मी खरच आज किती बदललोय. मी नोकरी करत करत घरातली सर्व काम आवडीने करायला लागलोय.
कोणत्या पुस्तकात लिहल नाही की स्रीनेच झाडू मारावा, स्रीनेच भांडी घासावी, स्रीनेच घर स्वच्छ ठेवाव
आई २४ तास सर्वासाठी राबते मी तीला मदत करुन प्रयत्न करतो कि आईचा २४ तासातला १ तास कमी करुन तिला आराम मिळावा. २४ तास बिनपगारी काम करणाऱ्या आईला सर्व पगार देतो. पण तिच्या खर्चाला १००० रुपये वेगळे देतो. खर म्हणजे तिच्या २४ तास कामापुढे ही रक्कम खूप छोटीच आहे. पण फूल नाही तर फुलाची पाकळी. ती कधीच काय मागत नाही पण तिची इच्छा होत असेलच ना? बाबांच सर्व लोन माझ्या खात्यावर फिरवल. त्यांना एकच बोललो.
मीः बाबा आयुष्यभर घरासाठी झटला. आता स्वतःला आणि आईला वेळ द्या.
आई बाबांना मी भांडी घासलेल बिलकूल पटत नाही पण मी बाकीची घरातली काम करतो.
आता माझ्या लग्नाचा विषय घरात सुरु झाला. मला २५-३० स्थळांनी भाजलेल्या हाताकडे बघून नकार दिला. माझी एक चुकी मला आता आयुष्यभर एकट ठेवणार अस मला वाटत होत. पण मी त्यासाठी  तयार होतो. आपण पेरतो तेच उगवत.

आईबाबांची काळजी वाढत होती

आईः बाळा तुझ्या लग्नाच कस होणार. एवढ्या स्थळांनी तुला नकार दिला.

मीः आई सगळ नीट होईल ग.

आईः अरे आम्ही तुला आयुष्यभर पुरणार नाही.
अजून वय वाढत गेलतर मुली भेटणार नाहीत.

मीः आई असु दे. कोणी नको मला. ज्याने जन्म दिलाय तो परमेश्वर मला कधीच एकट सोडणार नाही. तुमच्यानंतर तोच माझी काळजी घेल. जे होत ते चांगल्यासाठीच होत. जी मुलगी मला हातासकट मला स्वीकारेल ती स्वच्छ मनाची आणि मला खूष ठेवणारीच असेल. आणि मनापासून सांग तुझी मुलगी असती तर तु अशा जळक्या हात असलेल्या मुलाला दिली असतीस का? नसती दिलीस. सर्वजण आपल्या जागी बरोबर असतात.

मला सुवर्णाने बोललेली गोष्ट आठवली. तिचा पत्ता शोधला.
आई बाबांना घेऊन सुवर्णाच्या घरी गेलो. तिच्या आईबाबांना सांगितल आम्ही एकाच कॉलेजमध्ये होतो. सुवर्णाने पण ओळख ठेवली.
पण तिच्या आई बाबांनी विचारल हाताला काय झाल. आणि मी खर बोलणार तेवढ्यात सुवर्णा बोलली.
जे डॉक्टरला सांगितले तेच आईबाबांना सांगितल. सुवर्णाच्या त्या बोलण्यावरुनच तिच प्रेम कळाल. आपल्या माणसाला आपणच सांभाळायच असत.
आमच लग्न झाल. सुवर्णा सोबत मी आता भरपूर खूष आहे. आणि सुवर्णाही माझ्यासोबत खूष आहे.

पण तो ॲसिडने जळलेला हात आजपण त्या भयानक चुकीची जाणीव करुन देतोच. ती चूक झाली असती तर सुवर्णाच्या अंधाऱ्या आयुष्याला मीच कारणीभूत ठरलो असतो.
अजून वाटत त्या भयानक विकृतीच्या काळ्या समुद्रातून कसाबसा मी बाहेर पडलो पण पुढे किती तरुण यात चुकतील, मुलींना त्रास देतील, पोलीसांचा मार खातील. समाजाच्या नजरेत पडतील कोण जाणे ?


Rate this content
Log in

Similar marathi story from Crime