Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Tejashree Pawar

Romance Tragedy

3  

Tejashree Pawar

Romance Tragedy

तो आणि ती (भाग २)

तो आणि ती (भाग २)

4 mins
15.7K


ठरल्याप्रमाणे सर्व तयारी करून सुधा निघाली. हरीही ठरलेल्या वेळेत घरातून निघाला होता. दोघेही तळ्याकाठी आले. त्यांच्या नेहमीच्या जागी. हीच ती जागा जिथे ही प्रेमकहाणी सुरु झाली होती. दोघांच्याही चेहयावर विलक्षण आनंद दिसत होता. पुढील आयुष्याच्या स्वप्नांनी डोळे भरून आले होते. दोघेही तेथून निघाले. कोठे जायचे माहित नव्हते. पुढचे काहीच ठरलेले नव्हते. फक्त एकमेकांची साथ तेवढी निश्चित होती आणि त्या जोरावर पुढचे आयुष्य काढण्याची त्यांची तयारी होती.

काहीही करून लवकरात लवकर गाव सोडायचे हे त्यांनी ठरवले. दिवसभराची धावपळ झाल्यावर कुठल्यातरी एका गावात पोहोचले. भरपूर विचारणा केल्यावर रात्रीच्या राहण्याची सोया झाली. वडापाव खाऊन दोघेही शांत झोपले; एक अंतरिक समाधान घेऊन.... पण बरोबरच एक भीती , जिची जाण दोघांनाही तितकीच होती. इकडे गावाकडे दोघांच्याही घरांत गोंधळ मजला. रात्र होऊन गेली तरी सुधाचा काही पत्ता नाही, त्यामुळे आई वडील बेचैन होते. इकडे हरीच्या घरीही तीच परिस्थिती. सर्वत्र शोधाशोध झाली; पण दोघांचाही कुठेच थांग नाही. दोघांच्याही घरी चिंतेचे वातावरण होते. दुसरा दिवस उजाडला आणि दोघानांही आधल्या दिवशी तळ्याकाठी एकत्र पाहिल्याची बातमी समजली. हरीही कालपासून घरी नसल्याचे समजले. दोघेही सोबत पळून गेल्याचा अंदाज आला. हे ऐकूनच सुधाच्या आईच्या काळजात धस्स झाले. पुढील परिणामणाची तिला जाणीव होती.

पाहता पाहता बातमी वाऱ्यासारखी गावभर पसरली. प्रत्येकाच्या मुखात तीच चर्चा..... गावातील जेष्टांची मत मतांतरे झाली. आणि शोधमोहिमेला अधिकच जोर चढला. गावाबाहेरही शोध सुरु झाले. दिवसांमागून दिवस जाऊ लागले तरीही काहीच शोध लागेना. इकडे हरी आणि सुधा यांनी आपल्या नवीन आयुष्याला सुरवात केली होती. एक आठवड्यापूर्वीच मंदिरात जाऊन दोघांनीही विवाह केला होता. आपल्या नव्या खुराड्यात त्यांचा संसार सुरु झाला होता. त्यांच्यासाठी स्वर्गच होता तो.... हरीला नवीन कामही मिळाले होते. दिवस छान चालू होते. आणि एके दिवशी त्या गावात कसल्यातरी कामासाठी आलेल्या सख्याने एका खोलीबाहेर सुधाला पहिले. तडक गावात जाऊन ही बातमी त्याने सांगितली. आत्तापर्यंत हा विषय गावाच्या अब्रूचा विषय झाला होता. बातमी कळताच गावातले 'कर्ते' पुरुष एकत्र जमले. ह्या बाबतीत काय करायचे ह्याचा निर्णय देखील झाला. दोघांच्याही घरच्यांपर्यंत ही बातमी पोहोचली, पण त्याचा काहीएक उपयोग नव्हता. ते आता काहीही करू शकत नव्हते.

संध्याकाळ पर्यंत सर्वजण त्या जागी पोहोचले. दरवाजा वाजवला. सुधाने दरवाजा उघडला. त्या क्षणाला दोघांवरही झेप घालून त्यांना पकड्ण्यात आले. त्यांना काही कळायच्या आत त्यांना पकडून गावी आणण्यात आले..... पंचायत भरली. सर्व गाव जमले. निर्णयही झाला. त्यासाठी जास्ती वेळ दवडण्याची त्यांना जरुरत वाटली नाही. संपूर्ण गावासमोर दोघांनाही फासावर लट्कवण्याची शिक्षा ठोठावण्यात आले होती. कुठलाही विचार न करता दोन व्यक्तींच्या आयुष्याचा निकाल लावून ही मंडळी मोकळी झाली होती. दोघांच्याही घरचे हे सर्व शांतपणे पाहत होते. सुधाच्या आईचे काळीज आतून तुटत होते. पण काही बोलण्याची हिम्मत नव्हती. बोलून उपयोगही नव्हता. ऐकणारं कोणी नव्हतं .

थोड्याच वेळात शिक्षेची तयारीही करण्यात आली. सुधा अन हरी शांत होते. कसला आक्रोश नाही की कसले दुःख नाही. डोळ्यात आसू नाहीत की चेहऱ्यावर कसली चिंता नाही. दोघेही एकमेकांकडे स्मित हास्य करत बघत होते. बघता बघता त्या दोन जीवांचा अंत करण्यात आला, अन सारा गाव फक्त बघत राहिला. इतके निर्घृण कृत्य केल्यावरही त्या मंडळींच्या चेहऱ्यावर आपण काही वाईट केल्याची पुसटशीही भावना नव्हती; पण आपण काहीतरी पराक्रम केल्याचा भाव धडधडीत दिसत होता.

आपल्या स्वप्नांच्या विश्वात वावरणाऱ्या , जगाची पर्वा नसणाऱ्या दोघांचा इथे अंत झाला होता. काय चूक होती दोघांची ? प्रेम केले ही ? नाही... त्याहूनही गंभीर 'गुन्हा' त्यांनी केला होता, आपल्या जातीबाहेर प्रेम करण्याचा. 'जात ' - भारतीय समाजाला लागलेला एक कलंक. ज्याचा वापर गल्लीपासून दिल्लीपर्यंत जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात जमेल त्या प्रकारे आणि अत्यंत सहजपणे केला जातो. काय आहे ही जात म्हणजे. ...चातुर्वर्ण व्यवस्थेच्या संमिश्रणातून अवतरलेला एक विचित्र प्रकार, ज्याने काळाच्या ओघात भारतीय समाजमनावर इतका प्रभाव दाखवला की त्यातून बाहेर पडण्याचे साहस करणाऱ्यास त्या त्या काळात समाजाने सहजतेने दडपून टाकले. ह्याचे इतके अवडंबर केले गेले की लोकांच्या जीवनावर हि व्यवस्था आजही निर्विवादपणे राज्य करत आहे. इतकी वर्षे उलटून गेल्यावरही समाजावर तिचा पगडा पाहता या व्यवस्थेची पाळेमुळे समाजात किती खोलवर रुतलेली आहेत याचा प्रत्यय येतो. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, महाराष्ट्र यांसारख्या राज्यांमध्ये तर सर्रास या व्यवस्थेचे स्तोम मजलेलले आहे. आजतायागयात ह्या व्यवस्थेने किती बळी घेतले आहेत याची गणती काळाकडेही नसेन.

यात आता हरी आणि सुधा यांचाही समावेश झाला होता. पोलिस नाही, न्यायव्यवस्था नाही. गावातील पुढारी लोकांनी हा निवाडा केला होता. आपल्या जातीबाहेरच्या मुला मुलीशी प्रेम करण्याचा गुन्हा या दोघांकडून झाला होता. गावाची इतक्या वर्षांची 'शिस्त' भंग झाली होती. आपली जात 'अशुद्ध' झाली होती. गावातील मुलामुलींमध्ये याविषयी उदाहरण निर्माण करणे गरजेचे होते. या अक्षम्य गुन्ह्याची शिक्षाही देऊन झाली होती. ते दोन जीव चावडीवर अशेच पडलेले होते . त्यांनतर पोलीस यंत्रणेला जाग आली, न्यायव्यवस्था खडबडून उठली. वृत्तपत्रात बातमी झळकली. रिकाम्या लोकांमध्ये थोडीफार चर्चा रंगली आणि दुसऱ्या दिवशी बातमी शिळीही झाली. वृत्तपत्रे बिनकामाची झाली, पडद्याआड गेली आणि ते दोघेही !!!


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance