Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Asmita Satkar

Inspirational

3.8  

Asmita Satkar

Inspirational

रजनीगंध

रजनीगंध

5 mins
23.3K


“मॅडम,आत येऊ?”

“हम्म,या!”

“काम झालं मॅडम,हा नंबर त्यांचा आणि हा पत्ता!”

“पत्ता नकोय सावंत,फोनवर विचारेल मी !”

खरं तर तो नंबर पाहुनच माझा आनंद गगनात मावत नव्हता,पण सध्या नंबर आणुन देणार्या सावंत ना थॅक्यु म्हणणं गरजेच होत;

म्हणुन त्यांना आवाज दिला,

“सावंत !”

“हा मॅम” सावंत दरवाज्यातुन पुन्हा आत येऊन उभे राहिले.

“थॅक्यु,थॅक्यु सो मच,तुम्ही हा नंबर शोधुन माझं खुप मोठं काम केलय!”

मॅम,प्लीज थॅक्यु म्हणु नका,तुम्ही इतकं करता आमच्यासाठी मी फक्त नंबर शोधलाय!!”

“तरी पण थॅक्यु!”

“वेलकम मॅम,येऊ मी??”

“हो निघा”

मी बर्याच वेळाने धीर एकवटुन तो नंबर डायल केला;बर्याच रिंग नंतर काॅल रिसिव्ह झाला!

“हॅलो” तोच आवाज, पण जरा मॅच्युअर वाटला ,

बहुदा सरलेल्या वर्षांमुळे आली असावी ही मॅच्युरिटी

“हॅलो,,,हॅलो,,,,” त्याच्या आवाजाने मी भानावर आले.

“हॅलो,अनिरूद्ध??”

“हो बोलतोय ,आपण????”

“ओळखल नाही की ओळखायचं नाही ??” मी प्रतिप्रश्न केला.

“रजनी...रात्री बारा वाजता झोपेत असतात माणसं,नाही ओळखता येत आवाज

कितीही ओळखीचा असला तरी!!”

“हो, माझा आवाज आताशा अनोळखी झालाच असेल तुला !” हे बोलताना माझा दुखावलेला स्वर लपत नव्हता.

“हो सतरा वर्षांनंतर ऐकलेला आवाज तसा अनोळखीच असतो रजनी!”

“अनि ,एवढ्या वर्षांनंतरही माझ्याविषयी तुझ्या मनात तिरस्कार आहेच का रे ?”

“प्रेम करणारे कधीच तिरस्कार नाही करत रजनी”

“पण,तुझ्या आवाजात जाणवतोय तो तिरस्कार,,अगदी स्पष्ट !” दाटुन आलेला आवांढा गिळत मी बोलत होते.

“रजनी ,तुझा प्रियकर,तुझा नवरा कधीच तुझा तिरस्कार नाही करत; पण तुझ्या मुलांचा बाप मात्र अजुनही तुझा तिरस्कार करतो,,,खरं तर त्यांना तुझी मुलं म्हणु तरी कशी????”

“मी जन्म दिलाय त्यांना...मुलं आपली आहेत अनिरूद्ध!!”

“तुला सतरा वर्षांनंतर जाणवाव की मुलं आपली आहेत??”

“मला रोज जाणवतं अनि,,तुला काय वाटतं मला काळीज नाही,भावना नाहीत??”

“असत्या भावना तर अशी चिठ्ठी,सहा महिन्याची दोन इवलीशी पोरं सोडुन तु गेली नसतीस कधी!”

“मी तुम्हाला सोडुन कधीच गेले नाही!”

“मग आपण आज असे फोनवर का बोलतोय??तेही थेट सतरा वर्षांनंतर??

“मला दादा आणि पप्पा जबरदस्ती धमकी देऊन घेऊन गेले”

“मग आता सुद्धा देतील धमकी ,की त्यांनी दिली तुला परवानगी १७ वर्षांनंतर?”

“पप्पा गेले ,कालच त्यांचे सगळे दिवस झाले,त्याबरोबर पप्पांना मी दिलेल वचनसुद्धा संपलं, म्हणुन मग आज काॅल केला.”

“रजनी, त्यांना दिलेल वचन त्यांच्या चितेवर जळुन गेल, पण त्या वचनाखातर तु आपलं आणि मुलांच आयुष्य का जाळलसं??” खरं तर आता त्याच्या आवाजात बरीच मार्दवता आली होती!

“आनि माझा नाईलाज होता, तुझा, मुलांचा जीव प्रिय होता मला “

“रजनी तु धमकीला घाबरून दुर गेलीस, तु इथे आमच्या जवळ असतीस तर कदाचित काहीच नसतं झालं, आणि झालं असतं तरी सगळ्यांना सोबत झालं असत ना,किमान सोबत तरी असतो आपण इथे काय किंवा स्वर्गात काय?” तो वातावरण हलकं करायचा प्रयत्न करत होता.

“अनि प्रभा आत्याचं घर जळताना मी पाहिलं होत, ते अपघाताने नव्हतं पेटल , ते पप्पांनी पेटवलं होतं, मला आपलं घर राख नव्हतं करायचं अनि!!”

“रजनी घर केव्हाचं राख झालय,,चार भिंती,एक छप्पर अंधार आणि मी एवढच शिल्लक आहे..घर केव्हाच राख झालयं!”

“अनि ,मुलं??मुलं कशी आहेत?”

“मुलं...आहेत ..अगदी आनंदात आहेत!!”

“मला भेटायचं आहे मुलांना !”

“हो भेट ना,येतेस उद्या,तुला पत्ता SMS करतो,सद्धया रत्नागिरीला आहे मी!”

“हो चालेल ना ,असंही उद्या मुलांचा वाढदिवस आहे,काय आणु त्यांना?काय आवडतं त्यांना ??रचना,अनिकेत फक्त सहा महिन्यांचे होते ,त्यानंतर पाहिलही नाही मी !”आता मात्र माझ्या आसवांचा बांध फुटला.

“रजनी आता रडु नको,यानं गेलेली वर्ष..ते क्षण परत येणार नाही,तु झोप,उद्या लवकरं निघाव लागेल ना ,तर पोहशील इथे लवकर!”

“अनि मला आत्ता बोलायच आहे मुलांशी”

“धीर धर ,उद्या बोल..खुप रात्र झालीये!”

“बरं ठीके ,गुड नाईट”

“हम्म गुड नाईट”

रात्रभर झोप आलीच नाही,मुलं, अनिकेत ,कोल्हापुर ते मुबंई पर्यंतचा प्रवास ,झेडपी अध्यक्ष ते मंत्रीपदापर्यंतची पप्पांची प्रगती ,मग माझा राजकारणातला प्रवेश,,ह्या सगळ्या घराणेशाहीत मागे सुटलेला माझा संसार!

अलार्म च्या आवाजाने मी तंद्रीतुन बाहेर आले, आवरून पहाटे ४ लाच घर सोडलं,,दादासाठी मॅसेज ड्राॅप केला,सावंतानाही सगळ्या मिटिंग cancel करण्याचा मॅसेज टाकुन गाडी स्टार्ट केली, हक्काच्या घरी परत जायची इतकी ओढ की मुंबई ते रत्नागिरी अंतर मी कुठेच न थांबता पार केल काही तासात!!!!

साधारण १२.३० च्या सुमारास गाडी एका वाड्यावजा कोकणी घरासमोर थांबवली.

घराचं नाव होत “रजनीगंध” अनिचं अजुनही माझ्यावर इतकं प्रेम होत,गेट उघडुन आत गेल्यावर दारावरची पाटी वाचुन काय वाटल हे सांगण अशक्यच!!

पाटी “ श्री व सौ. रजनी अनिरूद्ध देसाई” अशी होती

म्हणजे अनिच्या आयुष्यात रजनी आजपण होती !!!

मी कितीतरी अधिरतेने बेल वाजवली ,बेल वाजवताच माझ्या आवडीच्या गाण्याचं म्युझिक “सपनो मे मिलती है ओ कुडी मेरे सपनो में मिलती है”

अनिनं दार उघडताच मी त्याला घट्ट मिठी मारली,त्यानही मला कुशीत घेतलं,,आज माझ्या मुलांचा बाप नाही माझा प्रियकर माझा नवरा मला थोपटतं होता ,सतरा वर्षांचा दुरावा आज संपला होता.

जरा सावरले तशी घरभर नजर फिरवली,भल्या मोठ्या खिडक्या,कोपर्यात जाईची ,कुद्यांची फुलं,भारतीय बैठक अगदी मला हवं तसं होत घर !!

“अनि मुलं? माझ्या पिल्लांना भेटायचय रे मला !”

“चल आत” असं म्हणुन तो मला एका खोलीत घेऊन गेला.

“ती बघ मुलं”

मी मटकन खालीच बसले अवघ्या चार वर्षांच्या मुलांच्या फोटोवर सोनचाफ्याचा हार!!

“अनि मुलं??? हे....... हे काय?? कुठं आहेत मुलं???” हुंदक्यामुळे मला स्पष्ट बोलताही येत नव्हतं ,, मुलांच्या जन्माच्या वेळचा अनिचा उत्साह,, मोहरलेले ते क्षण, पहिल्याच वेळी जुळी मुलं “रचना,अनिकेत!”त्यांना सांभाळताना झालेली कसरत , सगळं काही आठवतं होतं.

“तुझ्या पप्पांमुळे !”अनिरूद्धच्या ह्या वाक्याने मी दचकले.

“म्हणजे???पप्पांचा काय संबंध?”

“तु गेल्यावर मी जमेल तसं सगळं सांभाळत होतो ,मुलं बालवाडीत जायला लागली होती ,मी रोज त्यांना सोडायला ,आणायला जायचो,,पण एक दिवस मी जायच्या आधीच कुणीतरी मुलांना घेऊन गेलं शाळेतुन ,मी खुप शोधल,४ दिवसांनी जंगलात सापडले त्यांचे निष्प्राण देह.....गळा दाबुन मारलं होत त्यांना ,मी पोलीसात गेलो पण कुणी साधी तक्रारपण घेतली नाही ,त्याच क्षणी मला समजलं हे कुणी केलयं!”हे बोलताना त्याला अश्रु आवरणं कठीण झालं होतं.

“पण..... पप्पांनी मला वचन दिलं होतं, म्हणुन गेले होते ना मी परत!”

“तुझ्या वडिलांना तु माझ्याकडे परत येण्याची सगळी कारणं संपवायची असावीत बहुदा,कारण त्यानंतर त्यांनी मला मारण्याचा एक प्रयत्न केला पण मी बचावलो,कोल्हापुर सोडलं ,रत्नागिरीत आलो, “रजनीगंध”उभ केलं, तुम्हा तिघांच्या आठवणीत जगत होतो !

“कोल्हापुर सोडल्यावर पुन्हा तुझ्या पप्पांचा त्रास झाला नाही एवढच सुख होतं बघ!”

“अनि मला माफ कर रे,हे सगळं माझ्यामुळे घडलं!”

“रजनी माफ केव्हाच केलयं,तुचं मला माफ कर ,काल मी तुला खुप बोललो,तुझी काहीच चुक नव्हती ,तु आमच्यासाठी गेलीस पण तरीही नाही सोडलं तुझ्या पप्पांनी मुलांना!”

“अनि”

“बोल ना !”

“मला नाही जायचं परत पप्पांच्या बंगल्यावर ,दादाच्या राज्यात..मला रजनीगंध मधे राहायचय,तुझ्यासोबत.. प्लीज मला इथे राहु दे!”

“रजनी,,घर आणि अनिरूद्ध तुझाच आहे,परवानगी नको मागु, दारावर तुझ्या नावाची पाटी वाचलीस ना??तरी परवानगी मागतेस??”

मी स्फुंदत त्याच्या मिठीत शिरले

“अनि एका वचनासाठी सतरा वनवास ,तरी मारलं मुलांना, काय साध्य झालं रे या सगळ्याने ?अश्रु,विरह..प्रेमाची एवढी किंमत का रे मोजावी लागली आपल्याला??”

“प्रेमाची किंमत नाही गं,श्रीमंताच्या मुलीने मध्यमवर्गीय मुलाच्या प्रेमात पडण्याची किंमत होती ही ,सत्ता,पैसा ,घराणं ह्याच्या पुढे तु प्रेम निवडलं, याची किंमत होती ही!”

“मग खुप वर्ष मोजली ही किंमत मी ,माझ्या जन्मदात्यासाठी,,,आता मात्र मला तुझ्यासाठी ,तुझ्यासोबत जगायचं आहे,अनिरूद्ध ची रजनी बनुन !!

स्फुंदतच त्याने मला मिठीत घेतलं,,,आज खर्या अर्थाने आमचं लग्न ,आमचं आयुष्य परिपुर्ण झालं !!

पण वचनाखातर जळालेल्या त्या सतरा वर्षांच काय ??काय दोष होता मुलांचां?? एवढचं चुकलं होत बहुदा आम्ही आमच्या मर्जीने संसार थाटला !

आपल्या मर्जीनं वागण हा गुन्हा होता ,ज्याची शिक्षा म्हणुन आपल्या आयुष्याचा निशिगंध पप्पांनी जाळला होता .

फक्त एवढाचं गुन्हा होता!!

खरचं हा आमचा गुन्हा होता ???

असे असंख्य प्रश्न मनात ठेऊन, कित्येक हुंदके उरात दाबुन रजनी अनिरूद्ध ने नवीन सुरवात केली !

आज खर्या अर्थाने रजनीगंध दरवळतं होत “प्रेमात”!!!


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational