Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Tejashree Pawar

Others Romance

4  

Tejashree Pawar

Others Romance

दोन पाखरं (भाग १)

दोन पाखरं (भाग १)

3 mins
15.5K


रात्रीच्या वेळी एका अनोळखी व्यक्तीचा फोन. एका कामासाठी चौकशी. कामात मदत करण्यासाठी विचारणा आणि एकडूनही त्यास होकारार्थी उत्तर. व्यक्ती अनोळखी होती पण आवाज ओळखीचा वाटून गेला.... अल्लड पण तितकाच विनम्र, आल्हाददायक अन मला स्पर्शून जाणारा. पहिल्या एक दोन बोलण्यात कामाविषयी चर्चा झाली आणि कामाचाच निमित्ताने फोनही वाढले. गप्पांचे विषय हळूहळू बदलू लागले आणि बोलण्याची वेळही. मिनिटांचे तास झाले आणि दोघांनीही केव्हा एकमेकांच्या आयुष्यात प्रवेश केला कळूनही गेले नाही. या बोलण्याला विषयाची कमी नाही कधी. वेळेचा बंधन नाही कि जगाची फिकीर नाही.

आवडी निवडी, आशा आकांक्षा , चांद सगळेच जुळत होते. हळूहळू या गोष्टी कळायला लागल्या अन एकमेकांशी असलेले नाते अधिकच घट्ट होत गेले. कानावर येणाऱ्या प्रत्येक वाक्यानिशी ह्या व्यक्तीशी आपला काय संबंध असावा, हे कोडे अजूनच विस्तारत जात. अशी व्यक्ती जिच्याविषयी काहीच माहित, ना चेहरा , ना रंगरूप ..... त्या सगळ्याची गरज ही वाटली नाही. मनाचे नाते आता इतके पुढे गेले होते की ह्या बाह्य गोष्टी दुय्यम वाटू लागल्या होत्या. एकमेकांशी बोलण्यात वेळ कशी निघून जय काळातही नसे. घड्याळाचा हळूहळू राग यायला लागला होता. त्याचे ते प्रेमळ बोलणे, क्षणाक्षणाला हसणे, तो अल्लडपणा, मनमोकळेपणा आणि आयुष्य जगण्यातला खुळेपणा सगळंच तिला भावून गेला. खरंच खुला होता तो !!! आयुष्याविषयीच्या व्याख्याच वेगळ्या होत्या त्याच्या. स्वछंदी, हसरा अन मनमोकळा .

जीवन जगणे काय असते त्याच्याकडून शिकावे. ...पाण्याची उथळता त्याच्याकडे होती, तर समुद्राची खोलीही, वाऱ्याचे भिरभिरणे होते अन मंद झुळूक बनून समोरच्याला अलगद सुखावणेही होते. पर्वताची विशालताही होती अन झऱ्याची निखळताही. ह्या सगळ्याने ती भारावून एली होती. तिला भावणारा प्रत्येक गन त्याच्यात होता.

'ती' तशी शांतच. अल्लडपणा अंगी होता; पण कसलेतरी पांघरून ओढून. पण त्याने ते हेरले होते. त्याच्यापेक्षा लहान होती तशी; पण किती हे तिलाही माहित नाही. तिचे हसणे त्याला आस्वादायचे अन त्याची तुलना तो कुठल्यातरी अभिनेत्रीशी करे अन ते ऐकून ती दुप्पट हसे.

तिचा आवाज त्याला गोड़ वाटत होता. यावरून ती गाणे गात असणार असा अंदाज त्याने बांधला होता अन तो खराही ठरला होता. त्या दिवसापासून तिचे गाणे ऐकण्यासाठी हट्ट सुरु झाला. तिची मात्र कारणे अनेक.... फोन वर कुठे गाणे म्हणतात का , ह्या वेळेस कुठे, कधी तब्येत बरी नाही, तर कधी इचछा नाही. पण खरे कारण वेगळे होते . त्याचे लडिवाळपणे बोलणे, लहान मुलांगात हट्ट करणे, तिला भारी आवडायचे. तसाही तो स्वतःला लहानच म्हणवून घेत असे, अगदी समोरच्यांकडून ते वदवून घेत असे. वागायचाही तसाच. ती मात्र समजूतदारपणे वागत असे. तिचे ते सांभाळून घेणे त्याला आवडे. त्याच्या प्रत्येक चुकांवर ओरडणे, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत त्याला १०० सूचना करणे, त्याच्या जेवणाच्या वेळा सांभाळणे, झोपेतून उठवणे अन रात्री लवकर झोपवणे, आजारी पडल्यावर दिवसभर त्याची काळजी करत बसणे, सर्वकाही तिच्या आयुष्याचा ' अविभाज्य' भागच बनले होते. तोही तितकाच समजूतदार होता. तिची थट्टा करणे, अन तितकीच काळजीही... ऐकले नाही तर रागात बोले अन गरज पडल्यावर समजावूनही सांगे. अगदी लहान मुलाप्रमाणेच तिला वागवत असे. एकमेकांच्या गरजांनुसार हा लहान मोठेपणा बदलत राही. काही सांगायची कधी गरज पडत नसे. बळजबरीचे नव्हतेच ते नाते मुळी. एकमेकांच्या आवाजावरून सारंकाही कळून जात आणि पुढचे सारे आपोआपच होई.

हे नाते काही औरच होते. शब्दांत त्याला वर्णन नाही, जगाच्या बाजारात त्याला नाव नाही. कुठल्या व्याख्येत त्याची व्याप्ती नाही, अन प्रत्येकालाच समजेल असला तो प्रकार नाही. ते फक्त त्या दोघांना ठाऊक होते अन हळूहळू उलगडातही होते.


Rate this content
Log in