Raju Rote

Tragedy


0.8  

Raju Rote

Tragedy


पर्याय !

पर्याय !

5 mins 1.4K 5 mins 1.4K

मला तुझ्याशी बोलायच नाही. ती रागाने म्हणाली

पण का ?तो कळवळुन म्हणाला

तुला त्याच कारण देण्यास मी बांधिल नाही. तिचा राग तस्साच टिकुन होता.

पण माझी चुकी काय हे तरी सांगशिल का ?

चुकी तुझी नाही माझीच होती. मी तुला मित्र मानले

मित्र मानने ही चुकी होऊ शकत नाही.

ठीक आहे..मला जावु दे मला तुझ्याशी वाद घालायची इच्छा नाही....झाले ते पुरे झाले.

हे बघ अस चिडू नको. काही माझ्याकडुन काही चुकी झाली असल्यास त्याबद्दल साँरी..आणि माझा गुन्हा तरी काय ? मी तुझ्यावर मनापासून प्रेम करायला लागलो हाच ना

स्वप्निलचे डोळे भरुन आले.

स्वप्निल आणि आसावरी हे गेली दहा बारा वर्षापासुनचे मित्र होते.आसावरी आकर्षक होती. तिचा बोलण्यातला आत्मविश्वासाने स्वप्निलला तिने भुरळ घातली होती. स्वप्निलला तिला भेटावसं वाटायचं बोलावस वाटायचं. पण त्याला काही मर्यादा होत्या. स्वप्निल विवाहीत होता आणि आसावरीने वयाची तीसावी नेमकीच पार केली होती पण ती अविवाहीत होती. इच्छा असली तरी ते गणित सुटणार नव्हतं. सुरुवातीला वाटणारी मैत्री ही जास्तच फुलत गेली आणि एक क्षण असा आला की स्वप्निलला ती सतत आपल्या सोबत असावी असे वाटायला लागले

त म्हणाली..तुला काय रे काही बायकांच्या गोष्टी बायकांनाच कळतात

मान्य ! पण तु सोबत असलीस की मला काय होतय हेच कळत नाही. काय चुक अन काय बरोबर याच्या पलिकडे मी पोहचतो.

ती थांबली..दीर्घ विरामानंतर बोलली ती 

तु माझ्या प्रेमात पडलास !कीती सहज बोलली ती

त्याने तिच्याकडे चमकून पाहील

मला माहीत नाही याला काय म्हणावे ? प्रेम की आणखी काही..पण एवढे मात्र निश्चित की तुला सतत भेटावसं वाटत आपण काही नाही बोललो तरी तु सोबत असावीस..का खरच मी तुझ्या प्रेमात पडलोय. त्याने तिच्या डोळ्यात पाहीलं

ती डोळ्यात पहात म्हणाली पण हे बरोबर नाही. तुझ्यात अन माझ्यात फक्त मैत्रीचे नात असु शकते.

मलाही तसच वाटत ..पण जे वाटत ते आपल्या नियंत्रणाच्या पल्याड असतं. ठरवुन कोणी कोणाचा द्वेष करु शकत नाही आणि प्रेमही करु शकत नाही.

मला हे तुझे जड शब्द नाही कळत फक्त मला एकच कळते. आपल्यात फक्त मैत्री असावी त्या पलिकडे काही नाही आणि जर तस काही वाटल तर आपल्याला आपली मैत्री विसरावी लागेल. माझा प्रेमावर विश्वास नाही सर्व खोट असतं. फक्त बोलण्यापुरत असत ते

तुला एखादा वाईट अनुभव आला असेल

जावु दे चल आता निघु असं म्हणुण ती चालायला लागली तो तिथेच बसुन होता. तिने टँक्सीला हात दाखवला. टँक्सी थांबली तिने त्याच्याकडे पाहीलं तो तसाच बसुन होता. तिने त्याला आवाज दिला नाहि क्षणभर थांबुन ती टँक्सीत बसली आणि निघून गेली.स्वप्निल तिच्याकडे पहातच राहीला.तिच्या विचित्र वागण्याचा त्याला अर्थ लागेना.

आता आसावरी त्याच्याशी नीट वागत नव्हती. त्याचे फोन ती घेत नव्हती. पाठवलेले मँसेजचे उत्तर ती फक्त येस ..नो ...ओके असाच द्यायची. काय करावे त्याचा सुचत नव्हते त्याचा अस्वस्थपणा वाढला होता.

ती रागाने निघून गेल्यावर तो काही वेळ थांबला. मग बाजुच्या टपरीवर चहा घेण्यासाठी वळला. या टपरीवर आसावरी सोबत त्याने अनेकदा चहा घेतला होता. ते त्याला आठवले तसे तो अर्धा चहा तसाच ठेवुन पैसे ठेवुन निघाला. तिला डोक्यातुन काढुन टाकायचा तो प्रयत्न करायला लागला. तेवढयात चहावाल्या काकाने चहा बनवता बनवता विचारलेच काय साहेब आज एकटेच!

काय बोलाव ?स्वतःला नियंत्रित करीत तो म्हणाला.. हो..एकटाच आहे. मित्र कामात आहेत सगळे.

तिला भेटुन आठवडा झाला होता.असा एकही दिवस जात नव्हता ज्या दिवशी तिची आठवण येत नव्हती. अनेकदा तिला फोन करायची त्याला अनावर इच्छा व्हायची. पण तो मोठ्या कष्टाने टाळायचा.

त्याने फोन काढला आणि लावला. रिंग वाजत राहीली. तिने फोन उचलला नाही.फोन ती उचलणार नाही हे त्याला उमजले शेवटी त्याने व्हाटसअपवर मेसेज टाकला खुप बीझी आहेस का?फोन सुध्दा घेत नाही. त्यावरही तीने काहीच प्रतिक्रिया दीली नाही.आता त्याचा जळफळाट झाला.आपण असे इतके काय वाईट वागलोय ? ती अशी का वेड्यासारखी वागतेय ? तो चिडला होता आपण चुकीच्या व्यक्तीसोबत मैत्री केली याचा त्याला पश्चात्ताप झाला होता. त्याने निश्चय केला तिला आपली गरज नाही तर आपणही तिला फोन नाही करायचा. गेली उडत..तो वैतागून म्हणाला. दोन दिवस तिच्या विचारात गेले मात्र त्याने तिला फोन नाही केला. तिस-या दिवशी लोकलमधे प्रवास करताना त्याचा फोन वाजला त्याने नाव पाहीले आसावरी...त्याने फोन कट केला. त्याला समाधान वाटले. तिलाही कळेल फोन नाही उचलला तर कसं वाटत हा विचार त्याच्या डोक्यात आला होता. असे तिचे दोन तीन वेळा फोन आले त्याने कट केले. परळस्टेशनच्या बाहेर आला तसे त्याच्या डोक्यात विचार आला. ती जशी आपल्या सोबत तसेच आपणही वागावे हे योग्य नाही, तिचे काही महत्वाचे काम असु शकेल. त्याने तिला फोन लावला

फोन तिने उचलला...बोल ? ती म्हणाली

तु सांग तिचे बरेच काँल येवुन गेले 

फोन का उचलत नव्हतास

कामात होतो...आता बोल

तुला भेटायच आहे.

मला वेळ नाही

वेळ तर मलाही नाही पण भेटण महत्वाचे आहे.

हं..सांग कुठे भेटायचं ?

तु सांग..

सायंकाळी सिएसटी स्टेशनच्या बाहेर भेट मग ठरवुया पुढे कुठे जायचे ते!

सांयकाळी तो बराच वेळे पासुन आसावरीची वाट पहात होता. ती आली तशी त्याला साँरी म्हणाली. तिचा चेहरा गंभीर होता.

त्याने तिच्या डोळ्यात पाहील अन विचारलं. चहा घेवुया का?

नको!

मग असं करुया ..जवळच मरीन ड्राईव्ह आहे तिथे जावुन बसुया!

ठीक आहे ..ती म्हणाली आणि दोघे चालायला लागले. काय बोलाव दोघानाही सुचत नव्हत. या अगोदर अस कधी झाल नव्हतं. आता त्याला वाटल मैत्रीच ठीक होती. मस्त मनमोकळेपणे बोलण होयाच भांडण व्हायचं.पण हे कसं झालं ते त्यालाही कळलं नव्हतं.आता यातुन फक्त वेदनाच होत्या.

काहीतरी बोलणं भाग होतं म्हणुन तो बोलायला लागला आज खुप थकल्या सारख वाटतयं

मग आजची भेट उद्यावर टाकता आली आसती

अग आपली भेट म्हणजे आँफीशिअल मिटीग आहे का जी पोस्टपाँड केली असती.

यावर ती गालात हसली तसा ताण काहीसा निवळला.

ती बोलायला लागली तुझ कस आहे, तु खुप विचार करतो प्रत्येक गोष्टीला जास्त चघळतोस.

हो बरोबर आहे तुझं संवेदनशील माणसाचा तो एक प्राँब्लेम असतो.

हे बघ गोष्टी खुप सरळ असतात तु त्याला जास्त काँम्लीकेटेड करतोस.

मला कळल नाही.

अरे सरळ आहे मनात कुठलाही राग न ठेवता आपण नेहमी प्रेमाणे भेटायला हवे.बोलायला हवे.

अग मलाही तेच म्हणायचय

मग कुठे बिघडतय?

कळत नाही..कुणाचे चुकतय

मला वाटते माझच चुकतय.मला तुझ्या बद्दल प्रेम वाटायला नको होत.पण वाटलं.नाईलाज झाला.

तु मला पुर्ण ओळखत नाहीस.तुला वाटत तस माझ जिवन सोप आणि सरळ नाही.

तु कधी स्वता बद्दल बोललीस..?

नाही ! मला स्वताची दुख अशी वेशीवर टांगायला नाही आवडत आणि सागुन होणार काय ? जो कोणी ऐकेल तो क्षणभर हळहळेल. बाकी सगळ तर मलाच भोगणे आहे.

मान्य पण असावं कोण तरी ज्याच्या समोर आपल मन मोकळ करता येईल.

मला नाही कधी गरज पडली त्याची. 

आतापर्यंत भेटलेले सर्व सारखेच निघाले. मी प्रत्येकाला फक्त एक मैत्रीण म्हणुणच हवी होती. माझ्या बरोबर लग्न करावं अस कोणालाही नाही वाटलं, त्याच्या दृष्टीने मी एक टाईमपासच. दुसरं काय ?

यावर स्वप्निल गप्प झाला. कारण त्याला ती हवी होती मैत्रीण म्हणुण फिरायला गप्पा मारायला. बाकी इतर सर्व मानसन्मान कार्यक्रमात त्याची बायको होतीच. आपणही तिला एकप्रकारे फसवतच आहोत हा विचार आला तसा तो अस्वस्थ झाला.

काही वेळ ते दोघेही काहीच बोलले नाही मग ती म्हणाली "निघते मी !...आणि त्याच्या उत्तराची वाट न पहाता ती निघुन गेली.


Rate this content
Log in