Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Navanath Repe

Tragedy

0.8  

Navanath Repe

Tragedy

शिवरायच अनधिकृत अन् सरकार

शिवरायच अनधिकृत अन् सरकार

4 mins
1.6K



बाळासाहेब ठाकरे यांचे वडील प्रबोधनकार म्हणतात की, नुसते शिवरायांचे नाव जरी उच्चारले तरी हिंदूच्या तेहत्तीस कोटी देवांची फलटन बाद होते,आज त्या छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात शिवरायांचाच पुतळा बसवणे अनधिकृत अन् डान्सबार , देशी दारूची दुकाने अधिकृत होताना दिसत आहे ही फार मोठी शोकांतिका आहे.
सत्तेवरील संघप्रणित भाजप - सेना सरकार याच शिवरायांचे नाव घेऊन सत्तेत आले. निवडणूकीपुर्वी याच सन्माननीय पंतप्रधान व मुख्यमंत्री महोदयांनी एक नारा दिला होता तो म्हणजे 'शिवछत्रपतीका आर्शिर्वाद अन् चलो चले मोदी के साथ' तर मग प्रश्न पडतो की हा नारा प्रश्न निवडणूक जिंकण्यापुरताच मर्यादीत होता का ? तसे नसेल तर मग जे तुम्ही निवडणूकीपुर्वी बोलला होतात की, जगात एक नबंरचे असे शिवरायांचे अश्वारूढ शिवस्मारक उभारू मग कुठे आहे ते शिवस्मारक. व ते कधीपर्यत पुर्ण होईल. मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष अँड. पुरूषोत्तम खेडेकर हे मागिल अनेक दिवसापासून लोककल्याणकारी जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराजांचे शिवस्मारक मुंबईतील राजभवनात उभारा. ते समुद्रात उभारू नका अशी मागणी करताहेत मात्र या मागणीकडे सरकारने कानाडोळा करत आमच्याच काही मनुवादी विचाराने चालणा-या काही बांडगुळांना अध्यक्षपदावर बसवून मुबंई महानगरपालिका निवडणूका तोंडावर हे समुद्रात शिवस्मारकाच्या भुमिपुजन केले पण नंतर त्या कामाचे काय ? हा प्रश्न आमचे तरूण या सरकारला व त्यांच्या प्रतिनिधींना का विचारत नाहीत. सरकारने शिवस्मारक बांधले तर नाहीच परंतू गरीब जनतेने स्वतःच्या पैशातून बुलढाणा जिल्ह्यातील डोंगर खंडाळा येथिल गावकरी मंडळिंनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा डोंगरखंडाळा येथील बस स्टँडच्या समोर बुधवारी रात्री शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसवण्यात आला होता. परंतू या विरोधात आलेल्या तक्रारीनंतर सकाळी पोलिसांनी तो पुतळा अनधिकृत म्हणत जबरदस्ती करून तो पुतळा चुकिच्या पद्धतीने काढला. पुतळा हटविण्यास सुरुवात केली तेव्हा पुतळा खाली पडला. त्यामूळे शिवरायांचा पुतळा काही ठिकाणी तुटला गेला त्यानंतर तो पुतळा रस्त्यावर आणुन टाकला. अशा प्रकारे बुलढाणा जिल्ह्यात पोलिस प्रशासनाने छ. शिवाजी महाराजांची विटंबना केली व त्याला गावातील गावकरी मंडळींकडून विरोध केला असता त्याना अमानुषपणे मारहाण केली गेली.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याच्या वृत्तानंतर बुलडाणा तालुक्यातील डोंगरखंडाळा गावात प्रचंड तणाव निर्माण झाला होता. या घटनेनंतर गावात संचारबंदी लागू केली.
आता प्रश्न नेमका पडतो की, महाराष्ट्रात जे छ. शिवरायांचे 'शिवस्मारक' उभारण्याचे काम या सरकारला पाच वर्षातही करता आले नाही, तसेच काम बुलढाणा जिल्ह्यातील डोंगरखंडाळा गावातील नागरीकांनी आपल्या स्वतःच्या पैशाने शिवरांयाचा पुतळा उभा करून या कामचुकार सरकारला दाखवत असतील तर ते या मनुवादी प्रशासनाला कसे जमेल. या पोलिस प्रशासनाला जर शिवरायांचा उभारलेला पुतळा अनधिकृत वाटत असेल तर हेच सरकार याच छ. शिवरायांचे नाव घेऊन सत्तेत आले तर ते सरकार अधिकृत कसे ? जर 'शिवराय अनधिकृत असतील तर सरकार अधिकृत कसे' मग प्रशासकीय अधिकारी शिवरायांचा उभारलेला पुतळा अनधिकृत म्हणून काढत असतील तर ते या सरकारला पण बरखास्त करतील का ?
महाराष्ट्राची अस्मिता म्हणून ओळखले जाणारे छ. शिवराय व छ. संभाजी महाराज यांची बदनामी या महाराष्ट्रात सततच होताना दिसते आहे. काल परवाच आर एस एस च्या बाबू गंजेवार या मनुवादी विक्रुतीच्या व्यक्तीने छ. संभाजी महाराजांचे व्यगंचित्र काढून त्याखाली 'इतिहासाची पुनरावृत्ती म्हणत ... संभाजी राजे पुन्हा एकदा मोगलांच्या तंबूत दाखल !' असे लिहून संभाजी महाराजांची बदनामी केली. यापुर्वीही काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या पाठ्यपुस्तकातून काही मनुवादी विचारसरणींच्या लेखकांनी लेखनीच्या माध्यमातून छ. शिवरायांची, छ. संभाजी महाराजांची तसेच शिवरायांना अध्यात्माची प्रेरणा देणारे त्यांचे गुरू जगद्गुरु तुकोबाराय यांची बदनामी केली होती तर निकीता पब्लिकेश, लातूर यांनी इयत्ता अकरावीच्या संस्कृत विषयाच्या 'संस्कृत सारिका' या पुस्तकात ज्या मातेने या स्वराज्याला दोन छत्रपती दिले त्या राष्ट्रमाता जिजाऊबद्दल अक्षेपार्य लिखाण केले होते. तर पुरंदरे यांनी इतिहासाचे विक्रुतीकरण केले त्यांना याच सरकारने पुरस्काराने सन्मानित केले आहे. याविषयी मराठ्यांचे दासीपुत्र अर्थात पायपोस किंमतीचे पेशवे या पुस्तकात लेखक रामचंद्र नारायण लाड हे लिहतात की, 'पेशवे आणि पेशवाई' म्हणजे स्वराज्याचा प्राण घेणारी जोडगोळी ... मराठ्यांच्या उज्ज्वल इतिहासावर, इमानावर व इभ्रतीवर डांबर फासणारी ही सैतानी शक्ती !" हे आता आमच्या तरूणांनी समजून घेतले पाहिजे.
आतातरी स्वतःला शिवप्रेमी म्हणून घेणारांनी पेटुन उठले पाहिजे. आमच्या छ. शिवाजी राजांच्या नावावर सत्ता मिळवलेल्या मनुवादी विचारसरणीच्या लोकांना एवढा सत्तेचा माज चढला आहे की त्यांच्यासाठी शिवराय व आमचे महाषुरूष ह्या गोष्टी म्हणजे खूपच साहजिकच वाटायला लागल्यात का ? हे दाखवून देण्याची वेळ आली आहे हे आता तरी लक्षात घ्या माझ्या बहुनजन समाज बांधवांनो आपली अस्मिता म्हणजे शिवराय आणि त्यांच्या बद्दल कोणत्याच नीच राजकारण्यांना आणि नेत्यांना घेणं देणं नाही त्यांना फक्त सत्ता हवी आहे. ते सत्तेचे लालची आहेत हे वारंवार सिध्द होत आहे.
डाँ. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची राज्यघटना लिहताना त्यांनी छ. शिवरायांचे स्वराज्य डोळ्यासमोर ठेवून या देशाची राज्यघटना लिहली. ती राज्यघना दि. ०९ आँगस्ट २०१८ रोजी दिल्ली येथे काही मनुवादी लोकांनी जाळण्याच काम केलं. हा दिवस म्हणजेच आमच्या बहूजनांसाठी काळा दिवस होता. ज्या लोकांना बुध्द, शिव, फुले, शाहू, आंबेडकर यांचे विचार चालत नाहीत त्यांच्याच हातात सत्तेची सुत्रे आहेत त्यामुळेच आपल्या महाषुरूषांची बदनामी होताना दिसते. मात्र ही झालेली बदनामी विसरून चालणार नाही त्यासाठी तरुणांनी एकत्र येऊन या मनुवादी सरकारला व त्यांच्या प्रशासनाला सुरूंग लावण्याचे काम करावे लागेल अन्यथा खरोखरच आजतरी असं वाटतंय की मनुवाद्यांच राज्य या महाराष्ट्रासह भारतावर येऊ लागलं आहे.



Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy