Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Akash Kokate

Comedy

5.0  

Akash Kokate

Comedy

टीव्ही आणि बरंच काही..!

टीव्ही आणि बरंच काही..!

2 mins
9.6K


सुट्टीचा दिवस होता..मी आरामात टीव्ही पाहत सोफ्यावर पडलो होतो('पसरलो होतो' म्हणा हवं तर)..बायको माहेरी गेल्यामुळे रिमोट माझ्याच हातात होता..एरवी सुद्धा रिमोट माझ्याकडेच असतो पण 'कंट्रोल' बायकोकडे असतो..आणि त्यामुळेच टीव्ही ला पण "सास बहू" च्या रडक्या सिरीयल्स पासून सुटका मिळाली होती..त्यामुळेच की काय टीव्ही मधून आनंदाश्रू निघाल्याचे मला दिसले..मी पण चकित झालो..नंतर थोड्या वेळात कळले की आमचा फ्लॅट सगळ्यात वरच्या मजल्यावर असल्यामुळे ते पाणी terrace वरून झिरपत होते आणि एक एक थेंब टिव्हीवर पडत होता..मनातच हसलो..उठून जाऊन त्या टिव्हीवर पाणी पडू नये म्हणून एखादा पडदा लावावा असे बुद्धीने सुचवले पण मनाला ते अमूल्य क्षण गमवायचे नव्हते..शेवटी मी न उठता ह्या 'विचारावरच' पडदा टाकला..आमचे terrace लीक होतंय हे टीव्ही वाल्यांना कसं कळलं कुणास ठाऊक..त्या जाहिरातीत एक म्हातारा माणूस "घर बनाते समय सिमेंट में Dr.Fixit जरूर मिलाये" असं म्हणताना इतके वेळेस हालत होता की त्यालाच Fix करण्याची गरज होती.. ती जाहिरात संपली की लगेच दुसरी जाहिरात 'अनाहूत पाहुण्यासारखी' नको असताना झळकते.."बांगर सिमेंट शशता नही शबसे अच्छा" असा म्हणत दुसरा म्हातारा आपल्याला दिसतो.. एकूण लोकसंख्येच्या ६५ टक्के पेक्षा जास्त तरुण असलेल्या आपल्या देशात ह्या म्हातार्यांना कशी काय संधी मिळते हे मला न उलगडलेलं कोडं आहे..मग एक असा पण विचार मनात डोकावून गेला की कदाचित त्यांनी जास्त उन्हाळे "पावसाळे" बघितल्यामुळे त्यांना संधी दिली असेल..(जास्त पावसाळे पाहिल्यामुळे terrace मधून लीक होणाऱ्या पाण्याची त्यांना जास्त माहिती असणे स्वाभाविक च होते😂)..

ह्या बांगर सिमेंटच्या जाहिरातीमुळे 'संजय बांगर' सोबतच भिंतीला दिल्या जाणाऱ्या रंगाच्या जाहिरातीची आठवण झाली..त्या जाहिरातीच्या शेवटी "दिवारे बोल उठेंगी" असा तो रंग देणारा आरोळी ठोकतो..आजपर्यंत भिंतींना पण कान असतात असं ऐकलं होतं.. पण या जाहिरातीमुळे 'भिंती बोलू पण शकतात' हा नवीन शोध लागला..आणि नजरेआड एकमेकांची कुरबुर करणाऱ्या लोकांनी ह्या कंपनीच्या रंगाला तीव्र विरोधही दर्शवला होता..

"तारक मेहता का उलटा चष्मा" ह्या SAB TV वरच्या मालिकेचे मी Repeat Telecast एवढ्या वेळेस पाहिलेत की मलाच "चष्मा" लागण्याची भीती वाटू लागली होती..SAB TV चॅनल वाले दिवसभर ती मालिका प्रक्षेपित करतात..माझ्यासारख्या संवेदनशील प्रेक्षकाला जेठालाल वर वारंवार येणारी संकटे पाहून त्याची "दया" आल्याशिवाय राहत नाही..बिच्चारा..आणि त्याला गंडवणारा त्याचा मेव्हणा बघितला की आपला मेव्हणा कित्ती 'सुंदर' आहे ह्या गोष्टीचं विलक्षण समाधान मिळतं..

कित्तीही हिंदी चॅनेल्स नजरेखालून घातले तरी माझं मन शेवटी स्थिर होतं ते 'मराठी चित्रपटांच्या' चॅनल वरंच. आमच्या बालपणी शनिवारी संध्याकाळी ३:३० वाजता आणि रविवारी संध्याकाळी ४:०० वाजता मराठी चित्रपट सह्याद्रीवर लागायचे.. आत्ता तर खास मराठी चित्रपटासाठी 'स्वतंत्र चॅनल्स' आहेत ही गोष्ट मनाला खूप आनंद देऊन जाणारी आहे. थोडक्यात 'मराठी पाऊल पडते पुढे' असं म्हणायला काही हरकत नाही😊.

जुने मराठी चित्रपट पाहिले की मन परत लहानपणीच्या चित्र दुनियेत जाऊन येतं..

टीव्ही ला काहीजण 'इडीयट बॉक्स' म्हणत असले तरी ते कलाकाराचा आणि प्रेक्षकांचा अप्रत्यक्षरीत्या भावनिक संवादाचे माध्यम आहे हे विसरून चालणार नाही..!!


Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy