Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Supriya Powle

Fantasy Others

5.0  

Supriya Powle

Fantasy Others

"आपुले मरण पाहीले म्या डोळा"

"आपुले मरण पाहीले म्या डोळा"

4 mins
1.2K


आज राहुलच्या शाळेत आंतरराष्ट्रीय निबंध स्पर्धा होती.विषय होता "पर्यावरण".त्याने शाळेत जायची तयारी केली आणि त्याच्या लक्षात आलं की त्याचा ऑक्सिजन सिलेंडर कालच संपलाय.त्याने आईला हाक मारली आणि म्हणाला आई माझा ऑक्सिजन सिलिंडर संपलाय दुसरा काढून देतेस का?आई म्हणाली , अरे सिलेंडरची नोंदणी केली आहे परंतु अजुन आले नाहीत .तु असं कर माझा ऑक्सिजन सिलेंडर घेऊन जा, तसंही मी आज कुठे बाहेर जाणार नाही . राहुल म्हणाला नाही कसं, तु विसरलीस का ?आज तुला तपासणीसाठी डॉक्टरकडे जायचं आहे ना! अरे हो! मी विसरलेच की,पण ठीक आहे डॉक्टरकडे मी नंतर केंव्हातरी जाईन , तुझी स्पर्धा महत्त्वाची आहे, म्हणून तु माझा सिलिंडर घेउन जा.बाबांना मी येताना नोंदणी केलेल्या सिलिंडरची चौकशी करून यायला सांगितलं आहे. राहुलला वाईट वाटलं, आपल्यामुळे आज आईला डॉक्टरकडे जाता येणार नाही.. पण निबंधस्पर्धेला जाणं पण महत्वाच होत.शाळेचा प्रतिनिधी म्हणून राहुलला निवडलं गेलं होतं. आईला नमस्कार करुन राहुलने पाठीवर ऑक्सिजन सिलिंडर अडकवला , तोंडावर मास्क लावला व घराबाहेर पडला.शाळेत जाताना, नोंदणी केलेल्या ऑक्सिजन सिलिंडरची चौकशी करायला त्यांच्या कार्यालयात गेला ,परंतु पुरेसा ऑक्सिजन निर्माण होत नसल्याने सगळीकडेच सिलिंडर दोन दिवस उशिरा येणार असल्याच कळलं. राहुल शाळेत पोहोचला.पर्यवेक्षकांनी (सुपरवायझर) पेपरवाटप केले व लिहायला सुरूवात करण्यास सांगितले."पर्यावरण" हा राहुलचा आवडता विषय असल्याने पेपर हातात पडताच त्यांने भरभर लिहायला सुरुवात केली.  

"नाक दाबले की तोंड की तोंड उघडते". दोन्ही बंद केले की जीव गुदमरतो, कारण हवेतील ऑक्सिजन वायू आपल्याला मिळत नाही. एरवी तो फुकट मिळतो म्हणून त्याची आपल्याला पर्वा नसते. परंतु तो आपल्यासाठी ‘प्राणवायू’ असतो, हे अशा आणीबाणीच्या परिस्थितीत कळते. 

तसे त्याचे हवेतील प्रमाण बऱ्यापकी म्हणजे २१% पर्यंत असते. परंतु वातावरणातील वाढत्या प्रदूषणामुळे, तो शुद्ध स्वरूपात मिळणे कठीण होऊ लागले आहे. तरी एक बरे आहे की निसर्गातल्या वनस्पती आपल्या ‘प्रकाश संश्लेषण’ या प्रक्रियेद्वारा हवेतला कार्बन डायऑक्साइड अन्न तयार करण्यासठी वापरतात आणि ऑक्सिजन वायू वातावरणात मुक्त करतात. त्यामुळे, सजीवांना सातत्याने प्राणवायूचा पुरवठा होत राहिला आहे.  

ऑक्सिजन एका अणूच्या रूपात स्थिर राहू शकत नाही, म्हणून त्याचे दोन अणू रासायनिक बंधनाने एकत्र जोडून रेणू (ड2) तयार होतो. तो सहजगत्या हवेत वावरतो. जेव्हा वीज चमकते, तेव्हा या वायूचे तीन अणू एकत्र येतात व ओझोन (ड3) वायू तयार होतो. हा ओझोन वातावरणात वर वर जाऊन एक संरक्षक कवच तयार करतो. हे कवच सूर्यकिरणातील प्रखर उष्णतेला थोपवून ठेवतो व पृथ्वीला अति तापण्यापासून वाचवितो. ओझोन हा देखील हरितगृह वायू आहे.  

ज्वलनासाठी ऑक्सिजनची नितांत गरज असते; मग ती कारखान्याच्या भट्टीतील आग असो, चुलीतली प्रखर ज्वाला असो किंवा शरीरपेशीतील मंद ज्वलन असो. कारण या वायूशिवाय ज्वलनक्रिया बहुधा शक्यच नसते. ओलसर धातूंना गंजविण्याचे कामदेखील हा वायू करीत असतो. गंजण्याने धातूचा टणक पृष्ठभाग ठिसूळ बनतो. तिथे त्याचे ऑक्साइड संयुग तयार झालेले असते. त्यासाठी धातूपृष्ठांचे या वायूपासून रक्षण करावे लागते.  

ऑक्सिजन अल्प प्रमाणात पाण्यात विरघळतो व तिथल्या जलचरांना जगवितो. वातावरणात जसे वर जावे तसे वातावरण विरळ होत जाते.परिणामी या वायूचे प्रमाण तेथे कमी असते. म्हणूनच तर गिर्यारोहकांना पाठीवर ऑक्सिजन वायूची नळकांडी घेऊन जावे लागते. निबंध लिहीत असताना राहुलला एकदम अस्वस्थ वाटू लागले .त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला.सुपरवायझर त्याच्या जवळ गेले.त्यांनी पाहीले तर त्याचा ऑक्सिजन सिलेंडर संपत आल्याचा सिग्नल देत होता.दुसरा सिलेंडर शाळेतही उपलब्ध नव्हता कारण साठा करण्याइतके सिलिंडर बाजारातच उपलब्ध नव्हते. राहुलची अवस्था खुपच अत्यवस्थ झाली.त्याला दरदरुन घाम फुटला होता.त्यांने डोळे मिटले आणि मान टाकली.

आई, आई अशी राहुलची जोरात मारलेली हाक कानी पडली आई धावत राहुलच्या बेडरुममध्ये मध्ये गेली पहाते तर काय राहुलचा चेहरा घामाने डबडबला होता व त्याच अंग थरथर कापत होत.राहुल काय झाल?राहुलने आईला घट्ट मिठी मारली.आईने राहुलच्या तोंडावर पाण्याचा शिडकावा केला आणि राहुल भानावर आला.त्याला कळलं की त्याला पडलेल ते भयानक स्वप्न होत.

आईने राहुलला विचारलं "अरे बाळा काय झालं ? राहुलने स्वप्नात घडलेलं सगळं जसच्या तसं आईला सांगितलं. आई म्हणाली, तु जे स्वप्न पाहीलंस ते स्वप्न असलं तरी ते सत्यात उतरायला वेळ लागणार नाही,आणि या परीस्थीतीला पुर्णपणे आपणच जबाबदार आहोत.पृथ्वीवर सर्वात बुद्धिमान कोण असेल तर तो मानव.त्यामुळे त्याने आपल्या बुद्धिमत्तेचा वापर करुन पर्यावरणाकडून जसा पाहीजे तसा आपला विकास साधून घेतला.मात्र परतफेड करण्याचे साफ विसरला.एखाद्या व्यक्तीकडून वा समाजाकडून जेंव्हा आपण मदत घेतो तेंव्हा त्याच्या प्रती कृतज्ञ रहातो.कधीही कृतघ्न होत नाही.

"मनुष्याची कृतघ्नता" मग ती विषम विचारांची असो,नैसर्गिक तत्वांना बाधा आणणारी असो,योग्य नियंत्रण न ठेवणारी आणि परीणाम म्हणून वेदनांना निमंत्रण देणारी कृती असो.परीणाम ठरलेला, नाश!

आजकाल वेगळेच वातावरण अनुभवायला येते.पावसाळ्यात सुद्धा उकाडा जाणवतो.थंडीच्या दिवसात तर कडाक्याची थंडी केंव्हा आली आणि गेली कळतसुद्धा नाही.उन्हाळा हा बारमाही असतो.आपले पर्यावरण निसर्गनियमांचे काटेकोर पालन करण्यावर अवलंबून आहे.संवर्धन की संहार यावरच पर्यावरणाचे संरक्षण अधोरेखित आहे.प्रदूषणाचे प्रमाण असेच वाढत राहिले, तर काही काळाने शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळावा ,म्हणून सामान्य माणसालाही गिर्यारोहकांप्रमाणे पाठीवर ऑक्सिजन वायूची नळकांडी घेऊन फिरावे लागेल.


Rate this content
Log in

Similar marathi story from Fantasy