Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Suresh Kulkarni

Others

2.0  

Suresh Kulkarni

Others

तुपाचा दिवा !

तुपाचा दिवा !

3 mins
1.1K


नाना झिपऱ्याने आपला हेकटपणा सोडलानाही. झाडावर लटकणारे प्रेत खांद्यावर टाकून त्याने स्मशानाचा रस्ता धरला. 

"झिपऱ्या तू ना त्या शांताबाई सारखा आहेस. उद्देश चांगला असलातरी मार्ग चुकीचा निवडतोस, असे मला वाटते. आता तू शांताबाई कोण? असे विचारशील. पण तू अजिबात तोंड उघडू नकोस, कारण तुझे मौन मोडले तर मी निघून जाईल! आणि तुझी मेहनत वाया जाईल." नेहमी प्रमाणे प्रेतात, वेताळाने प्रवेश केला होता. 

" तर आटपाट नगर होते. येउ दे! त्यापेक्षा मी तुला शांताबाई आणि तिचा नवरा मंचाकराव, यांचा सध्या चालू असलेला संवादच एकवतोना. लक्ष पूर्वक ऐक? कारण, माझ्या शंका मी नन्तर तुला विचारीन. तुला ठाऊक असून हि तू त्या शंकांचे निरसन केले नाहीस तर, तुझ्या डोक्याची शंभर छकलें होऊन तुझ्याच पायाशी पडतील ! ok. तर मग ऐक." असे म्हणत, वेताळाने आपला थंडगार हात झिपऱ्याचा कानावर ठेवला. 

नान्या ऐकू लागला. 

' आज काय तूप कढवलंस काय? खमंग वास येतोय. असेल तर, वाढ थेंबभर भाकरीवर. तेवढेच दोन घास ज्यास्त जातील. '

'तूप? कसलं तूप? बायपास झालियय. डॉक्टर काय म्हणाले विसरलात काय? कोलेस्ट्रॉल वाढत तुपाने! तूप -बीप काही नाही.!'

'आग, बायपासला दहा वर्ष होऊन गेली. परवाच्या रिपोर्ट मध्ये कोलेस्ट्रॉल नॉर्मल आहे. आता थोडं तूप खाल्लं तर हरकत नाही.'

' तुम्हाला, तुमच्या तब्बेतीची काळजी नाही, मलाच ती करावी लागते. तेव्हा 'नो' तूप .! ' 

'बर, तुपाचं राहूदे, किमान वाटीभर ताक तर दे. कोरडी भाकरी गिळत नाही, भिजून खाईन. '

' सदा खोकता, ताक काय खाताय? डॉक्टर आंबट खाऊ नका म्हणालेत ना? आणि तस हि, ताक नाहियय!'

'का?, काय झालं?'

'काय झालं? काय? तुम्हाला ठाऊकच आहे, मी ताक नेहमी कडी पत्त्याच्या झाडाला टाकते. अन, काय हो कशाला दूध, तूप, ताक खाता? तुम्हाला काही झालेतर, कोण करणार आहे तुमचं? पोर लांब आहेत, आता मलाही होत नाही.'


तर पाहिलंत ना असे आहेत आमचे 'हे '. तुम्हाला म्हणून सांगते, महागाई कोण वाढलीय बाई?, हद्द झाली ! अन 'यांना ' दूध -तूप पाहिजे! तरी बर मी काटकसरीने संसार करणारी बाई आहे. बाकी बायकांसारखी उधळ मधाळ करत नाही! आता दूधाचंच बघाना? चाळीस रुपय लिटर! महिना बाराशे! पण कमीत कमी लिटरभर तर लागतच हो! तसे 'हे ' दूध-दही खात नाहित, म्हणजे मीच देत देत नाही, कफ होतो ना! अन मला ना, मेलीला, का कोण जाणे लहानपणा पासूनच दूध आवडत नाही! पण ना, एक लिटर पेक्ष्या कमी दुधाच्या विरजणावर, लोणी पडत नाही बघा! म्हणून एक लिटरचा वरवा चालूच ठेवलाय. चार सहा दिवसांनी, गळवट गंज भर लोण्याचा गोळा निघतो. तरी मेला दूधवाला, दूध म्हणून -काळपाणी -घालतो. पैसा मात्र खरा करतो! तर काय सांगत होते? - लोणी! - छान पैकी नागवेलीच् पान टाकून कढवायला ठेवलंकी कॉलनी भर वास सुटतो, हो! 'काय काकू? आज पुन्हा तूप कढवताय काय? मस्त वास दरवळतोय! ' मेले, आमच्या कॉलोनीतले, वासवरच असतात! सदा दुसऱ्याचाच घरावर यांचं लक्ष्य! काम ना धंदा हरी गोविंदा! ते जाऊ देत, तर काय सांगत होते - तूप - असं कढवलेलं साजूक तूप, कडकड उन्हात कोरड केलेल्या डब्यात भरून ठेवते. कशाला काय? मला रोज लागत ना! देवा, पुढे निरंजन लावायला!

देवा पुढे निरंजन लावून, दोन्ही हात जोडून, मी देवाला रोज प्रार्थना करते. 

' देवा, परमेश्वरा, आम्ही दोघे एकटेच, या गावात रहातोय! कृपा असू दे रे बाबा! लेकरं, त्यांच्या संसारात रमलेत! त्यांनाही सुखी ठेव! माझी अन यांची प्रकृती कमी ज्यास्त होते, पण आता वय झालाय.!चालायचंच! तरी कृपा असुदे! सांभाळ रे बाबा! हीच माझी हात जोडून प्रार्थना! असाच, रोज साजूक तुपाचा दिवा तुझ्या पुढे लावीन!'


'आता सांग झिपऱ्या, नवऱ्याला 'उपाशी ' ठेवणाऱ्या शांताबाईचा, देवा पुढे ठेवण्याचा मार्ग तुला बरोबर वाटतो का?" 

"'वेताळा, हा काय चावट पणा आहे? बेकूफ, तुला काय दुसरं घर नाही मिळाल? माझ्याच घरची गोष्ट मलाच सांगतोस! "

" झिपऱ्या तुझं मौन भंगलंय, मी निघालो! पुन्हा भेटूच, Bye! "


Rate this content
Log in