Aditya Kulkarni

Inspirational


2.0  

Aditya Kulkarni

Inspirational


भेट -5

भेट -5

2 mins 16K 2 mins 16K

मुंबईत पोहचेपर्यंत आम्हा दोघांना एकमेकांच्या ब-याचशा आवडी -निवडी कळल्या होत्या . वाचन, cooking, आणि प्रवासाची आवड 100% जुळली होती . जसजसे दिवस पुढे जात होते तसतसं मेसेजींगचं प्रमाणही वाढत गेलं. दिवसभरात कोणत्याही वेळी एकमेकांना मेसेज करण्याएवढं नातं तयार होणं माझ्या दृष्टीने प्रेम या कल्पनेची पहिली पायरी होती .  

त्यात नांदेडच्या स्पर्धेचे फोटो मिळाल्यावर मी जाम खुश होतो, कारणही तेवढंच महत्वाचं होतं. त्या पत्रकाराने पेपरात माझा आणि तिचा फोटो बाजूबाजूला ठेवला होता. तिच्याशी भरपूर बोलायला मिळावं म्हणून इतरांना मेसेज पाठवणं बंद केलं कारण दिवसाला 200 मेसेजची असणारी मर्यादा .

पिल्लू, बाबू, शोना वगैरे कधीच करावंस वाटलं नाही किंबहुना केलं ही नाही पण आज तुला खूप miss केलं एवढ्या छोट्या मेसेज मधूनही हवा तो संदेश पोहचत होता . 

डिसेंबर उजाडला आणि स्पर्धांचा मौसम पुन्हा जोमाने सुरू झाला. नागपूरच्या रखरखीत उन्हात स्पर्धा करण्याबरोबरच कधीतरी पुण्या - मुंबईच्या स्पर्धेतही आपलं दर्शन घडावं, या मेसेज ला तू फक्त स्पर्धा सांग मी पोहचेन या मेसेजला मी तिला 5-6 स्पर्धांच्या details लगेचच दिल्या होत्या. पुण्याच्या एका वादस्पर्धेत भेटण्याचं ठरलं तेव्हा आदि, आपण दोघं पार्टनर होऊया का स्पर्धेत? " या तिच्या प्रश्नावर मी स्पर्धा संयोजकांना फोन करून दुसऱ्या महाविद्यालयाचा पार्टनर निवडला तर चालेल का हे विचारून मोकळा ही झालो. दुर्दैवाने नियम आड आले आणि स्वप्न स्वप्नंच राहिलं .  

15 डिसेंबरचा दिवस होता. रत्नागिरीला एका स्पर्धेत होतो. फोन वाजला, तिचा मेसेज आला होता .

8 -10 फळांची नावं होती आणि प्रत्येक फळासमोर एक तिच्याबद्दल मला काय वाटतं असा एका ओळीचा संदेशही होता .

For example

Orange - you are beautiful . I like your smile.

Blackberry - you are kind .

Watermelon - you need to improve your personality .

Mango - I love you.

Reply asap असं खाली लिहिलं होतं.

पुढची पाच मिनिटं माझ्या दृष्टीने म्हणजे उत्स्फुर्त फेरीत आपल्याला आवडणारा , पट्टीतला विषय यावा पण आयत्यावेळी आपण ब्लॅन्क व्हावं अशी काहीशी होती . पण मी धीर करून रिप्लाय केला आणि

क्रमशः 

© आदित्य शेखर कुलकर्णी .


Rate this content
Log in