Sanjay Raghunath Sonawane

Drama Inspirational


1.4  

Sanjay Raghunath Sonawane

Drama Inspirational


पाणी वाचवा,जीवन वाचवा -

पाणी वाचवा,जीवन वाचवा -

3 mins 11.1K 3 mins 11.1K

(पात्र-आदिती, प्रियंका, विजय, अजय, संजय, सविता, अनिता, महादेव दिपाली, ऋषिकेश)

आदिती:वाचवा, वाचवा, वाचवा!

प्रियंका:अंग काय झाले?काय वाचवा?

आदिती:अग, पाणी वाचवा. जसे आपले जीवन महत्त्वाचे आहे ,तेव्हढेच पाणी महत्त्वाचे आहे. पाणी म्हणजे जीवन.

विजय:होय,होय पाणी म्हणजे जीवन. जगातील कोणताही जीव पाण्याशिवाय जगूच शकत नाही.

अजय:अरे, आपल्या देशात पाण्यावाचून अनेक माणसे, जनावरे मरत आहे.लोकांचा जगण्याचा मार्ग अवघड आहे. पाणी नाही तर चारा नाही,अन्न नाही.सगळीकडे चिंतामय वातावरण आहे.

संजय:ते कसे काय?

अजय:अरे, पृथ्वीच्या पोटात भरपूर पाणी होते. त्यामुळे प्रत्येक जीव सुखी होता,आनंदी होता.पण आपला हव्यास वाढला, लोभ वाढला. पाण्याचा उपसा सुरु झाला.मोट गेली, इंजिन आले, तरी आम्हाला पाणी कमी पडू लागले. आधुनिक युगात वीज मोटार आली.त्यामुळे पाण्याचा उपसा अजून जोरात सुरु झाला. धरतीमाय ढसढसा रडू लागली. तरी आपल्याला तिची कीव येईना. किती निर्दयी आहोत आपण!

सविता:होय, होय आपण खूपच निर्दयी आहोत. सुखाच्या शोधात दुःख शोधले आहे.

अनिता:ते कसे काय?

सविता:हे बघ,झोपडी गेली, घर आले. कालांतराने बंगले झाले.गगनचुंबी इमारती उभ्या राहत आहेत. त्यामुळे विचार करायची वेळ आली आहे. अनेक ठिकाणी धरतीला छिद्र पाडण्यात आले. धरतीची चाळन केली. हव्यासाने एव्हढी सीमा गाठली की पृथ्वीच्या पोटात आग, आग होऊ लागली. आम्हाला सुख हवे आहे सुख!हे सुख नसून भावी पिढ्यांचा आक्रोश आहे,सर्वनाश आहे!डोळे उघडा, पृथ्वीला वाचवा, पाणी वाचवा, जीवन वाचवा.

महादेव:म्हणजे आपण आता नेमके करायचे काय?

सविता:हे पहा, ज्या हव्याशी लोकांनी हे काम सुरु केले आहे. त्यांच्यावर मायबाप सरकारने नियंत्रण ठेवले पाहिजे. पाणी वाचविण्यासाठी पाणी माफियांवर कारवाई झाली पाहिजे. आपले धंदे चालविण्यासाठी लाखो पिढ्यांचे नुकसान म्हणजे सजीव सृष्टीचेच नुकसान होय.

दिपाली:मग हे काम फक्त सरकारच करू शकते का?आपण नाही करू शकत?

सविता:होय मला तुझ्याकडून हेच अपेक्षित होते. तू अगदी माझ्या मनातले ओळखले. खेड्यातील, शहरातील माणसे पाण्यासाठी वाचवायची असतील तर लोक सहभाग फार महत्त्वाचा आहे. लोक शक्तीच हे कार्य जोमाने करू शकते. समाजसेवक, साहित्यिक, आदर्श नेते, वृत्तपत्र, प्रसारमाध्यम यांनी चांगली भूमिका बजावली आहे. तरी पण उठाव करने काळाची गरज आहे.

दिपाली:अगदी बरोबर, म्हणजे माणसाने पृथ्वीच्या पोटातील पाणी संपविण्याचा जणू विडाच उचललाआहे.

प्रियंका:अहो, ही माणसे एव्हढयावरच थांबली नाही , तर पृथ्वीवर असलेल्या पाण्यावरुन भांडण, मारामारी, खून करू लागली. निसर्गाने दिलेले फुकटचे पाणी विकत घ्यावे लागत आहेत. गरीबाना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहेत.

सविता:जे गोडे पाणी आहे, त्यात सुद्धा लोभी माणसाने अतिक्रमण केले आहे. मेलेली जनावरे, शव, रसायन, अनेक आजारानी ग्रासलेली माणसे पाण्याचे प्रदूषण वाढवत आहेत. त्यामुळे पवित्र नदया, तलाव आणि प्रसिद्ध सरोवर देखील यात प्रदूषित होत आहेत.

पृथ्वीतलावरचे जलचर, भूचर, उभयचर यांचे अस्तित्व नष्ट होत आहेत.आता आपल्याला निसर्ग काही काळांने

चित्रातच पहावा लागेल की काय अशी भीती निर्माण झाली आहे

ऋषिकेश:होय, होय अगदी बरोबर. पृथ्वीतलावरची सजीवांची ठिकाणे नष्ट होत आहेत. हजारो जाती नष्ट होत आहेत. अन्न, पाण्या अभावी त्यांचे भविष्य अंधारात आहेत. आपण त्यांच्यात आक्रमण केले. त्यांनी आपल्याला त्रास दिला नाही; पण तेही आता समजू लागले आहेत. आश्रयाची ठिकाणे म्हणून मानववस्ती शोधू लागले आहेत. अन्न म्हणून लहान मुलाना भक्ष्य करत आहे. त्यांनी सुद्धा मानवाविरुद्ध एल्गार उगारला आहे. आपला लढा तीव्र केला आहे. त्यांचे संरक्षण ते स्वतः करू लागले आहेत.

प्रियंका:आता पाणी वाचवा, अशी म्हणायची वेळ आली आहे. आपण सर्वानी आपल्या कुटुंबापासून पाणी वाचविण्याची मोहीम सुरु केली पाहिजे. पथ नाट्यातून,एकांकीकेतुन ,शाळा, कॉलेजमधून जनजागृती झाली पाहिजे.

सविता:जनजागृती म्हणजे काय?

प्रियंका:जन जागृती म्हणजे प्रत्यक्ष कृतीतून समजावने,माहितीतून समजावणे.आपण आपल्यापासूनच सुरुवात केली पाहिजे. शाळातील पाणी जपून वापरले पाहिजेत. विनाकारण पाणी वाया घालवू नये. पाणी वाया घालवणे म्हणजे पाप आहे. पाणी दुसऱ्यासाठी ्वाचवणे पुण्य आहे. हा समज समाजात पसरवणे.पाणी म्हणजेच मानव, सजीव सृष्टी होय.

अनिता:देशातील काही राज्यांमध्ये भीषण दुष्काळ पडतो तेव्हा आपल्या डोळ्या देखत अनेक जीवंत जनावरे पाण्यावाचून आक्रोश करून मरतात. चाऱ्या अभावी मालक जनावरे विकत आहेत. पाणी नाही तर पैसा नाही. शेतकरी व मजूर यांचे जीवन अवघड झाले आहे. कर्जा मुळे अस्वस्थ झालेली माणसे स्वतः च्या प्राणाची आहुती देत आहेत.,पृथ्वीच्या पोटातील पाणी संपलेले आहे. आपलीच माणसे पाण्यासाठी वणवण भटकत आहेत.


Rate this content
Originality
Flow
Language
Cover Design