Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Atreya Dande

Children Fantasy Thriller

5.0  

Atreya Dande

Children Fantasy Thriller

भुजंग!

भुजंग!

4 mins
2.9K


बन्या आणि त्याचे मित्र म्हणजे गोप्या, तन्या, अव्या एकत्र मिळून आज एका जबरदस्त मोहिमेची आखणी करत होते. शाळेच्या पटांगणावर खेळायचे सोडून भारीच कुजबुज करीत बसले होते. "तर मग ठरल. आज रात्री आपण सगळे महादेवाच्या तलावाकडे जायच." अस तन्या निर्धारात म्हणाला. तशी सर्वांनी होकारार्थी मान डोलाविली. सगळे वर्गात परत गेले. आता रात्रीची वाट पहात होते सगळे.


शाळेतून घरी आल्यावर बन्याचे मन काही लागत नव्हते. आज दप्तर थेट स्वयंपाकघरात मांडले होते. गणवेश खिडकीत वारा खात बसला होता. आज वारी टॉवेलवरच ह्या खोलीतून त्या खोलीत, त्या खोलीतून ह्या खोलीत चालली होती. तेवढ्यात आई ओरडली. "तेवढ बाहेर वाळायला ठेवलेली पापड आत घे बघ. अरे, घे की आत." मग घरातली खुर्चीवरची कापड बाहेर अंगणात वाळत घातली गेली. "आज ह्या पोराच काही लक्षच नाहीये." अस पुटपूटत आईनेच पापडान्ना घरचा कोपरा दाखवला. बन्या मात्र सरळ आतल्या खोलीत जाउन निपचीत पलंगावर पहुडला.


त्याला शाळेजवळचे ते महादेवाचे मंदिर दिसू लागले होते. पुरातन मंदिर, सभामंडपातली ती घन्टा, तो महानंदी, गर्भग्रूहातली महादेवाची पिंड, आणि मन्दिरामागचे ते तळे. ह्या नयनरम्य दृष्यात तळ्याजवळ आल्यावर बन्याची भीतीने गाळनच उडाली. तसा तो पलंगावरून घामाने ओलाचिंब होऊन उठला. आपण अजुन घरातच आहोत, हे ध्यानी आल्यावर, त्याने हळूच घाम पुसला आणि पाणी पीले. इतक्यात बाहेरून आवाज आला. "बन्या, खेळ्याला चल रे." "हो, आलो." अस म्हणून बन्याने आईकडे पाहिले. आईने डोळ्यानेच बर अस खुणविले. पाय घराबाहेर टाकत बन्या म्हणाला, "आज उशीर होईल यायला. महादेवाच्या मंदिराला चाललोय." "उशीर कशाला?" आई खेकसली. बन्याने मागे न वळताच थेट बाहेर असलेल्या मित्रांसोबत तेथून पाय काढला. 


मंदिराच्या आवारात बराच वेळ पोर खेळू लागले. रात्रीचे ०८:०० वाज़ता आरती करण्यात आली. आरती संपली तसे पोर मन्दिरा मागे जाउन लपली. हळू हळू मंदिरातले इतर भाविक दर्शन,आरती, व प्रसाद घेऊन, आपापल्या घरी निघाले. पूजार्यांनी गरभागृहाला टाळा लावला. ते सुद्धा दिवे मावळून घराकडे निघाले. आता रात्रीचे ०८:३० होऊन गेले होते. उरले होते ती चार पोर. पोर्णिमेच्या चंद्राच्या प्रकाशाने तळ्यावर सुंदर चांदीची चादर पांघरली होती. रात-किडे आपल्या स्वरात गुणगुणत होते. मंदिर तळ्यापासून थोडे उंचावर होते. मागच्या भिंतीजवळून हे चौघ, तळ्याकडे एक टक बघत होते. ०९:०० वाजून गेले, तशी मच्छारांची एक टोळी भुणभुण करत त्यांच्यावर तुटून पडली. तसे हातांचे चापटीचे वार मच्छरांवर पडू लागले. असह्य होऊन अव्याने विचारले, "ए, दिसतय का ते?" "नाही ना.", गोप्या वसकला. "ए गप्प बसा की जरा.", तन्याने दटावले. रातकिड्यांचा आवाज़ अधीकच वाढला होता. त्यात बगलच्या रस्त्यावरची कुत्री भो करून भूंकत होती. त्या भुंकण्यांने दचकलेल्या पोरांचा धीर आता खचत चालला होता. तरी एक टक तळ्यावर नज़र रोखून होते सगळे. इतक्यात तळ्याच्या मधोमध बुड्बुडे दिसत होती. ते बुड्बुडे वाढत चालले होते. हळू हळू ते बुड्बुडे पुढ सरकत होते. सगळ्यांची नज़र त्यांच्यावर खीळली. तसा गोप्या म्हणाला, "मला नाई पाहायचा, मी चाललो." त्याची त-त-प-प सुरू झाली. "आपण सगळ्यान्नी ठरवलय ना, मग सोबत राहू." परत तन्याने थरथरतच दटावले. तशी ती बुड्बूडे आता जवळ येत होती. "राम...राम...राम...राम", अव्याने रामाचे आवाहन सुरू केले. तसा गोप्या, "भिमरूपी महरुद्र..." कथन करत बसला. बघता बघता कधी बन्या त्यांच्या थोडा पुढे जाउन बसला, हे लक्षातच आले नाही. तो थोडा पुढे गेलाय, ह्याचे भान देखील नव्हते कुणाला. बुड्बूडे आता वेगाने काठाजवळ येत होती. वारा सुसाट सुटला होता. मंदिराच्या फटींमधूंन वार्‍याचा आवाज घुमत होता. तसा खळखळ पाण्याचा आवाज वाढला. वजनदार काहीतरी पाण्याबाहेर डोकावत असल्याचे, बन्याला भासले. बन्याची उत्कंठा आता शिगेला पोहोचली होती. जोराचा वारा धूळ उडवू लागला. झाडांची पान उडू लागली. झाडांवरच्या फांद्या तुटून तळ्यात पडत होत्या. मंदिरातली घण्टा टणटण करत घुमत होती. इतक्यात त्या तळ्याबाहेर मोठ्याने आवाज आला. "डराव...डराव." अन्न भली मोठी १०-१२ बेडक बाहेर पडली. बन्या तिथेच पोटधरून हसू लागला. "अरे, बेडक हाईत ती, बेडक." अस म्हणून, त्याने मागे पाहीले, तर सगळे आधीच पसार झाले होते. थोड्यावेळात हासणे थांबले. तशी त्याला जाणीव झाली की त्या रात्रीत, या बेडकांसमवेत तो एकटाच उभा होता.


रात्रीचे ०९:३० वाजले होते. आता घरी परतायचे होते. बन्या हळू हळू मन्दिराबाहेर चालू लागला. रस्त्याने शाळेजवळून, मग मारुती मन्दिराजवळून, मग वस्तिन्मधून वाट काढत एकटाच चालू लागला. त्याला तेहतीस कोटी देव आणि संत-सज्जनांचे महत्त्व आज पटले होते. त्याला ते सगळेच आठवत होते. त्या त्या देवाची आरती, मंत्र, ओवी, म्हणत तो कसाबसा घराजवळ आला. घरात पाउल ठेवल्याबरोब्बर बाबांनी दारातच खणकावले, "कुठे होतास इतका वेळ?" आता काय सांगणार. बेडक दिसत होती बन्याला. तसा तो स्वताहाला सावरत म्हणाला, "भुजंग पाहायला गेलो होतो, भुजंग!." आणि आतल्या खोलीकडे पळत सुटला. आईजवळ जाउन तेहतीस कोटी देव, संतसज्जनांचे आभार मानून, तिला घट्ट मिठी मारुन, निदराधीन झाला.


सकाळी शाळेत गेल्यावर मधल्या सुट्टीत परत बैठक भरली. सगळीच पोर बन्या बोलण्याची वाट पाहत होती. तसा बन्या, कृष्णानी जसे कालिया मर्दन केले होते, त्याच आवेषात आपल्या अन भूजंगच्या भेटीची कहाणीच सांगू लागला.


तर अशी ही गोष्ट. अश्या बर्‍याच खोड्या आपल्याही आठवणीत असतीलच की. त्यानाच उजाळा दिलाय, असा समजा.


Rate this content
Log in

Similar marathi story from Children