URMILA DEVEN

Others


3  

URMILA DEVEN

Others


दुसरी आई...

दुसरी आई...

2 mins 1.2K 2 mins 1.2K

लहानपणी कारलं आवडत नाही म्हणून माझी आई माझ्यासाठी वडी बनवायची. बाहेर खेडायला वेळ झाला की, जेवणासाठी कितीतरी हाका मारायची, ताप आला की लाड पुरवायची, भरभरून कौतुक करायची, तिच्या रागावण्यातही प्रेम आणी काळजी असायची. कालांतराने हे सगळं कमी होत गेलं, आणि मीही बदलत गेली...... आता खाण्याचे लाड कुणीच पुरवत नाही, चुका जास्तच काढल्या जातात. जरा बरं नसलं की, किमान पाण्याचा ग्लासही हातात भेटत नाही. काळजी ऐवजी वॉर्निंग असते. प्रेमा पेक्षा रागावणं जास्त असतं.

आयुष्यात एकदाच आई भेटली, परत ते सुख भेटलच नाही.

हं, मी मात्र आता आई झाले. पण तशी आपुलकी, तसा लाड, ती काळजी, आता कधीच परत आयुष्यात येणार नाही, परत आईच प्रेम कधीच भेटणार नाही, हीच खंत वाटते.

मुलीच स्त्रीत रूपांतर होताहोता ती आयुष्यभरासाठी आईच होऊन राहते. आईच प्रेम स्त्रीच्या आयुष्यात फार कमी काळासाठी येतं, पण आयुष्य भऱ्याची छाप सोडून जातं.

लग्नांनंतर स्त्रीला प्रत्येक भूमिका करावी लागते. आणि, प्रत्येक भूमिकेची एक वेगडी डिमांड असते बरं का! सासू ही लग्नानंतर आईच्या रूपात स्त्रीच्या आयुष्यात येते. पण, ती फक्त नवऱ्याचीच आई होऊन राहते. सासू सुनेचे सम्बन्ध चांगले असू शकतात, पण सासू सुनेची आई मात्र होऊ शकत नाही.

पुरुषांचा तसं नसत बरं का, त्याच्या आयुष्यात आईची भूमिका कायम असते. ते निभावणाऱ्या नायिका मात्र बदलत राहतात. प्रियसी असोत वा पत्नी, काळजी मात्र असतेच. मुलांना सांभाळता सांभाळता आपला नवराही "ऍडिशनल बेबी" च असतो. आपणही लहान मुलांसारखे नवऱ्यावर प्रेम करतो, लाड पुरवतो. नवरा आजारी असला कि, बाळाप्रमाणे काळजी घेतो. म्हणूनच तर, “स्त्री ही क्षणभराची पत्नी आणी अनंत काळाची माता असते”.

बहीण मोठी असो वा लहान, भावासाठी ती आईची प्रतिमा असते. आई जगात नसली की, भावाला आईची माया देतेच की.

मुलगी ही कालांतराने म्हाताऱ्या आई वडिलांची आईच होते. ज्यांना मुली असतात त्यांचं म्हातारपण आनंदी असतं. म्हणूनच जुनी माणसे म्हणतात ना, “एक तरी लेक असावी”.

स्त्रीच्या आयुष्यात आई एकदाच यते, तिला दुसरी आई कधीच भेटत नाही. ती मात्र आयुष्य भर आईच असते.

स्त्रीच्या आयुष्यात दुसरी आई कधीच येत नाही.

सर्व स्त्रियांना समर्पित

नोट- कृपया, लेख आवडला असल्येस, लिंक शेअर करा, कॉपी पेस्ट करून व्हाट्स उप वर किंवा ग्रुपवर स्वतःच्या नावाने टाकू नका.

धन्यवाद!Rate this content
Originality
Flow
Language
Cover Design