Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Amrut Shivaji Dalvi

Children Comedy Inspirational

1.3  

Amrut Shivaji Dalvi

Children Comedy Inspirational

मिशन साखर कारखाना भाग २

मिशन साखर कारखाना भाग २

2 mins
2.4K


"नको ! लई लांब हाय कारखाना !" बारकूने नेहमी प्रमाणे वाकडा पाय घातला .

"घुम्पट फिरवत जाऊया!" अन्या मान डोलवत म्हणाला .

"शर्यत लावूया ! शेवटी पोहोचल तो जिंकणार !" बाळू आपली जागा सोडून उभा राहून म्हणाला .

"आणि मधीच तहान लागली तर ? मधी नुसती शेतीच हाय !" विकू बरोबर बोलत होता . दोन गावांमध्ये फक्त शेतीच होती . आणि मुख्य म्हणजे त्या मधले अंतर आमच्या लहानग्या पायांसाठी खूपच होतं .

" म्हणून सांगलोय नको जायला!" बारकूने पुन्हा आपली नकाराची रीघ ओढली .

"कुणा - कुणाला अर्काच्या गोळ्या पायजेत त्यानं यावं . नको त्यानं घरी जावं !" मी सगळ्यांना उद्देशून म्हणालो ... पण माझी नजर बारकू कडे होती . " सांगा ! कुणाला पायजे ?"

"मल्ला !!!" सगळ्यांनी एकंच घोषणा केली .

" आजी बाईचा किल्ला !" मा‍झ्या उत्तरावर सगळे हसू लागले ...

माझ्याकडचे आणि विक्कूकडचे असे मिळून एकूण दोन रूपयांची वर्गणी जमा झाली ...

एका रुपयात सोळा अर्काच्या गोळ्या येत होत्या .

"एका रुपयात सोळा गोळ्या, तर दोन रुपयात किती, सांगा बरं ? " मी विक्कूला विचारलं .

" दोन सोळा !" विक्कू रूबाबात म्हणाला . विक्कूला पाढे पाठ होत नसत ... त्यामुळे त्याने स्वत:चे पाढे तयार केले होते . अकराच्या पुढचे पाढे तो असंच पाठ करत असे . " १२ एके १२ , १२ दुणे दोन १२ ,१२ त्रिक तीन १२...” आम्ही त्याच्या या पद्धतीला सात-बाराचा उतारा म्हणत होतो ... विक्कूला विचार करणं म्हणजे काय हे ठाऊकच नव्हतं . पण पठ्याकडं प्रत्येक गोष्टीचा निवाडा होता . प्रत्येक समस्येवर उत्तर होतं . एखादी गोष्ट आपल्याला जमत नाही म्हणून हिरमुसणे , या गावाचा तो नव्हताच .

आम्ही जवळच्या टक्केकरच्या दुकानात गेलो . सुध्या बसला होता आपल्या नेहमीच्या जाग्यावर . आम्ही त्याच्या कडनं अर्काच्या गोळ्या घेतल्या ... " सुध्या ! दिवसभर नुसतंच बसून कट्टाळा इत असलं नई ?" मी सुध्याची चेष्टा करत त्याला विचारलं .

" व्हय मग ! शाळा सुरु असली कि डी. एड. च्या पोरी बगून तरी वेळ जातोय ! " विक्कू मिष्कीलपणे म्हणत जोर-जोरात हसू लागला .

"पोरी बगतोय व्हय मी लेका ?" सुध्या भाबडेपणाचा आव आणत म्हणाला .

" न्हाई ! पोरीच तुला बघत्यात ! " विक्कू आपलं हसू आवरत म्हणाला .

सुध्या डी .एड. ला शिकायला येणार्‍या पोरी बघत दिवस काढतो असं विक्कूनीच मला एकदा सांगीतलं होतं . पण ते कितपत खरं होतं यावर शंकाच होती . एक मात्र होतं , डी .एड. ला शिकणाऱ्या पोरा-पोरींमुळे टक्केकरच्या सुध्याचं दुकान मात्र चांगलं चालायचं . कारण डी .एड. कॉलेजच्या आवारात एका सुध्याचं दुकान सोडलं तर काहीच नव्हतं .

भाग २ समाप्त ...


Rate this content
Log in

Similar marathi story from Children