Rani More

Inspirational


5.0  

Rani More

Inspirational


शाळा

शाळा

5 mins 1.4K 5 mins 1.4K

आज ही ती वाट वाकडी करून दुसऱ्या रस्ताने निघाली,

थोडं अंतर वाढत असे तिकडून घरी जाताना तरीही त्याला बघण्यासाठी ती नेहमीच तो पर्याय निवडायची त्याच देखणं रूप पहिलं की तिचे डोळे तृप्त होत, होताच तो तसा रुबाबदार...

"अःहम"

कोणी तरुण नाही बरं का तो होता एक टुमदार बंगला, "अःहम" किती यूनिक नाव आणि त्याची वास्तुशास्त्रिय रचना सगळंच तिला भुरळ घालत असे त्यातल्या त्यात सगळ्यांत मोहित करत असे शुभ्र् चांदनफुलांनी दरवळलेली जुईची वेल....

तिचा पसारा जमिनिपासून प्रत्येक मजल्याच्या बेडरूममध्ये डोकावत थेट तिसऱ्या मजल्यावरच्या गॅलरीतल्या झोपाळ्या पर्यन्त पोचला होता.

"कोण असेल ह्या घराची मालकिन,कधी कधीच कोणी दिसत नाही इथे...जर मी असते तर.... किती छान हितगुज करता आलं असतं ह्या जुईशी आणि झोपाळ्यावर बसून किती कविता बहरल्या असत्या दरवळल्या असत्या माझ्या वहिवर....

......जर आणि तर....

तिने एक दीर्घ सुस्कारा सोडला.


"रागिणी...ये रागिणी..अग अशी का उभी राहिलिस रस्तात कधिपासुन हाक मारतेय लक्ष कुठे आहे तुझं"

तिची वर्गमैत्रीण शेफालीने तिची स्वप्नसमाधी भंग केली.

"अरे..शेफाली तू..व्हाट अ प्लेजन्ट सरप्राइज! किती दिवसांनी भेटतोय आपण.."

"हो ना यार, चल कॉफी घेऊ जरा निवांत बोलता येईल"

कॉफी सोबत शाळा कॉलेजचे सगळे दिवस पुन्हा एकदा जिवंत झाले कोणाची टोपणनावे काय होती,गॅदरिंगला झालेली फजीती, खेळ लूटुपुटीची भांडणं, आणि असचं अजुन खूप काही त्या फूलपाखरी दिवसांच्या आठवणित दोघी रमलेल्या.

"एक्सक्यूजमी मॅडम, सॉरी बट कैफ़े बंद करायची वेळ झाली"

वेटरच्या आवजाने दोघी भानावर आल्या.

"ओह, एक्सट्रीमली सॉरी!"

दोघी ही गडबडीने उठल्या.

"ते काही नाही रागिणी,आता आपण दोघी सगळ्यांना शोधु आणि मस्त एक गेट टुगेदर करू, चांगलं दिवसभर गप्पा मज्जा मस्ती धम्माल करू"

"ये नाही हां,शेफाली हे सगळ्यांना शोधायचं काम तूच कर मला बिल्कुल वेळ नाही तू माहेरपणाला आलीयस तो वेळ सत्कारणी लाव जरा,"

"ओके मॅडम, मीच शोधते अजूनही तुमचं मॉनिटरिंग चालूच आहे का"

"अरे नाही यार असं काही नाही पण माझ्याकडे काहीच सोर्स नाही कोणाशीच कॉन्टेक्ट नाही सध्या आणि माझा जॉब....."

"चिल्ड यार मस्करी केली यु कॅरी ऑन युवर जॉब अन् मोस्टली मेन्टेन्ट युअर प्रायवसी! अज्ञावासात रहायची तुझी सवय माहित आहे मला"

शेफाली तिला डोळा मारत म्हणाली.

"ओके भेटु पुन्हा निघु या आता खूप वेळ झाला"

"हो चल निघु भेटू पुन्हा बाय..."

एकमेकिंचे नंबर एक्सचेंज करून दोघी आपआपल्या दिशेनि निघुन गेल्या.

रागिणी पुन्हा रोजच्या रूटीनमधे बिजी होऊन गेली.

"हाय,रागिणी अग रश्मी बरोबर कॉन्टेक्ट झालय माझं ती डोंबिवलीला असते, आणि क्रांति वडाळ्याला दोघीही मे महिन्यात येणार आहेत सुट्टीला ओके"

" ती पंजाबी भांगड़ागर्ल सिमरन माहित आहे ना तुला ती पण येणार आहे फ्रॉम दिल्ली."

"रागिणी तुला सुर्वे आठवतोय का लास्ट बेंचवरचा अरे यार तो तर माझ्या मिस्टरांचा ऑफिस मधला कलीग निघाला कोइन्सिडेंटली भेटला मला पार्टीमध्ये, त्याच्या कडून आपल्या बॅचचे खूपजण भेटतिल उद्या येणार आहे तो बाकी सांगते सगळं नंतर.बाय,टेक केअर". शेफालीचे व्हाट्सएप्प वर अपडेट चेक करून ती वेळ मिळेल तसा तिला फ़क़्त गुड, नाइस, अरे वा, हो का मस्त". असा रिप्लाय देत असे.

आता शेफालीला कसं सांगणार की बाईग यातलं मला कुणी देखील स्पष्ट आठवत नाही तू पिंकी, योगिता आणि प्रतिभा सोडून.

मला आठवतात फ़क़्त कामामुळे शाळेेला उशीर झाला तरी सांभाळुन घेणारे शिक्षक, माझी हक्काची जागा लायब्ररी मला स्वताःचा विसर पाडायला लावणारी त्यातली पुस्तकं, आणि जगण्याची किंमत शिकवणारी जगण्याची स्पर्धा......ह्या तारेवरच्या कसरतीत चालताना तोल जाऊ नये म्हणून कधी पहिलचं नाही आजुबाजुला आणि माझ्या ह्या कसरतीला तुम्ही ईगोस्टिकचं लेबल दिलंत, मी ही टाळलं मग एक्सप्लेनेशन देणं,आणि त्याच कोषात स्वताःला बंद करून सुरवटां सारखी वावरत राहिले.

विचार करत चालता चालता तिला ठेच लागली.ती कळवळली तीने समोर पाहिले ती "अःहम" समोर उभी होती. आज तिथे हालचाल दिसत होती. झोपाळ्यांवर पांढऱ्या शुभ्र् फ्रॉकमध्ये एक जाईच्या कळी सारखी गोड कळी झोके घेत होती. खिडक़ीतुनही आतमधल्या वावर जाणवत होता.

एवढ्यात मोबाईलची बेल किणकीणली....

शेफालिचा कॉल होता..

"हेलो रागिणी, गुड़ न्यूज़ यार सुर्वे मुळे माझं अकरा जणांशी कॉन्टेक्ट झालयं आणि बाकीचे आपण सगळे मुलं मूली धरून टोटल पंचवीसजण आहोत फ़क़्त एक प्रॉब्लम आहे.

"ओह पंचवीस वा...वा.. मिशन शेफाली सक्सेसफुल पण प्रॉब्लम काय आहे". तिने ठेचाळलेला दुखरा अंगठा दुर्लक्षित करत विचारलं

"अग फार मोठा नाही आपण मे महिन्यातला प्रोग्राम थोडा आधी घेऊ या का मी बाकिच्याना कळवते तसं तू एडजस्ट करशील ना"

"हो बघते पण कारण तर सांगशील"

"अग तो आंनद देसाई होता ना आपल्या वर्गात तो यूएसए ला असतो सध्या तो काही दिवसांसाठी भारतात आलाय त्याच्या प्रॉपटीची सगळी विल्हेवाट लावून बंगला बिल्डरला विकुन तो परत जाणार आहे. त्याच्या बाबांनी बांधला होता तो बंगला त्याचा जिव गुंतलाय पण त्याच्या बायकोला त्या ओल्ड फॅशन बंगल्यात काही इंटरेस्ट नाही, सो तो जायच्या आधी प्लान करू या"

"ठीक आहे तु प्लान कर आणि तारीख कळव मला,ठेऊ का फोन" अंगठयाातून असहय कळा येत होत्या.

"अग थांब थांब ऐक तर तो आंनद तुझ्याबद्दल विचारत होता"


"कोण आंनद यार मला खरचं नाही आठवत"


"अग हेच म्हणाला, तो की तिला तर मी आठवत पण नसेल कधी पहिलं देखील नाही तिने माझ्याकडे पण मला ती खूप आवडायची...तिचा स्वभाव बघता बोलणं तर दूर पण कधी नजर वर करून बघण्याची देखील हिम्मत झाली नाही... बट माय फर्स्ट क्रश... असला हळवा झाला होता ना यार.... तो बोलताना"


"शेफाली इनफ नाऊ, जमिनीवर ये आपण कॉलेजमधे नाही आहोत"


"तुला खरंच नाही आठवत का ग आपण त्या दिवशी भेटलो ना त्याच गल्लित घर आहे त्याच अःहम की काहीतरी असं विचित्र नाव आहे. सगळे व्यवहार झालेत.आठ दिवसात बुलडोजर फिरेल तिथे घर पाडायच्या आधी एकदा येऊन जा म्हणाला.. " तिचा चेहरा वेदनेने विदीर्ण झाला जणु बुलडोजर तिच्या काळजावर फिरला होता.

तिने समोर पहिलं नेहमी स्वताःच्या गुर्मित असणारा "अःहम" तिला आज खूप केवीलवाणा भासला.शेफाली फोनवर काय बोलत होती तिला काही समजत नव्हतं. तिने भरलेल्या डोळ्यांनी जुईचा वेल, झोपाळा आणि "अःहम"ला डोळे भरून पाहून घेतलं.

"हेलो शेफाली ऐक ना मी साफ विसरले होते,अग माझं सेमिनार आहे तिन महिन्यासाठी मी आउट ऑफ़ टाउन आहे.उद्याच निघतेय,रिझर्वेशन आहे,सो प्लीज ट्राय टू अंडरस्टैंड मी नाही येऊ शकणार गेटटुगेदरला,तुम्ही एन्जॉय करा नेक्स्ट टाइम बघू आणि हो, हा नंबर तिकडे चालणार नाही सो ह्यावर कॉल,मेसेज ट्राय करू नको मी परत आले की तुला कॉन्टक्ट करेन ओके बाय टेक केअर."

शेफाली हेलो म्हणेपर्यन्त तिने कॉल डिसकनेक्ट केला.आणि शेफालीचा नंबर ब्लॉकलिस्टला टाकला.....

ठेचाळलेल्या अंगठ्याच्या वेदनांवर तिच्या मनाच्या वेदना मात करत होत्या....तिला "अःहम" पुन्हा दिसणार नव्हता आणि तिच्या मित्रमैत्रीणीनां पुन्हा ती दिसणार नव्हती .... ठेचाळलेला अंगठा आणि चिरडलेलं मन घेऊन ती चालू लागली तीची पुन्हा सुरु झाली होती जगण्यासाठीची तोल जाऊ न देणारी तारेवरची कसरत इगोस्टिकपणाच्या बेगड़ी कोषात हळवं मन लपवुन....Rate this content
Log in