Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Sunil Jawale

Horror Tragedy Others

1.5  

Sunil Jawale

Horror Tragedy Others

शंभला रहस्य

शंभला रहस्य

45 mins
2.7K


      

भाग -- 1

            


          हिमालयीन पर्वतीय प्रदेशातील अनंत अंतरापर्यंत व्यापून असलेल्या उत्तुंग पर्वतरांगामधून लखलखता ठिपका वेगाने पुढे सरकत होता. तिच्या मिग-21जेट फायटर प्लेनचा लयबध्द आवाज हिमालयाच्या द-या- खो-यातून घुमत होता. नुकताच सुर्योदय झालेला होता. सोनेरी रंगाची कोवळी सुर्यकिरणे बर्फाच्छादित प्रदेशावर पसरत जात संपूर्ण परिसर सोन्याच्या रंगाने लख्ख उजळून निघाला. जणू काही तिला भूल पडून ती हिमालयातील कुठल्यातरी गूढ व अज्ञात प्रदेशात भरकटत जात होती. संपूर्ण पर्वतीय परिसर नजरेने टिपता यावा या उद्देशाने यासाठी ती विमानाला अधिकाधिक उंची देत निरभ्र आकाशातून भरारी घेत होती.

           तिची संमोहित मन:स्थिती पाहता असे वाटत होते की कोणीतरी जणू तिला साद घालून त्याच्याकडे बोलावित होते. नेमके कुठे जायचे... तिथे जाण्याचा मार्ग तरी कोणता.... आणि कशासाठी जायचे? बरेच प्रश्न डोक्यात भिरभिरत होते पण निश्चित असा उद्देश कळतच नव्हता. कुठली तरी अगम्य पवित्र दैवी शक्ती तिला आपल्याकडे बोलावित होती, असेच जाणवत ती मनाला धीर देत विमानाचा फ्लाईंग डाटा वरचेवर तपासून पाहत आकाशाला गवसणी घालायला जात होती. तिचे अत्याधुनिक मिग- 21 जेट फायटर प्लेन अधिकाधिक उंची गाठत हिमशिखरांवरून उडत जात होते. डोक्यावरील हेलमेटला अॉक्सीजनचा पुरवठा करणारा पाईप जोडून श्वासोच्छवासास होत असलेल्या अवरोधास सामना करीत संपूर्ण लक्ष केवळ विमानाच्या ठप्प झालेल्या कंट्रोल पॕनेलवरच केंद्रित करीत राहिली. कुठल्यातरी अगम्य,अज्ञात शक्तीने खेचली जात ती हिमालयीन पर्वतारांगावरून जणू अनंताच्या प्रवासास निघाली होती. 

         27°35′19" उत्तर 91°52′40″ पूर्व ! या स्थानावर ३०४८ मीटर्स उंचीवरील भारतीय वायुसेनेचा तवांग लष्करी विमानतळ! भल्या पहाटेसच इंडो- तिबेट सीमारेषा ओलांडून भारतीय हद्दीत घुसखोरी करून येत तीन अज्ञात विमानांची स्क्वॉड्रन घुसली होती. रडारद्वारे प्रक्षेपित होत असलेल्या त्या विमानांच्या इमेजेस एटीसी सेन्टरने अचूक टिपल्या होत्या. काहीच सेकंदात कंट्रोल टॉवरकडून धोक्याचा इशारा देणारा बझर वाजू लागला. त्याची दखल घेत स्क्वॉड्रन लीडर असलेली ती आपल्या सहका-यांना सावध करीत टेन्टमधून धावत बाहेर आली होती. लगेचच हँगर्समधून फायटर विमाने जीपने खेचून आणून रन वे वर आणून उभी केली गेली. पाचही पायलटस डोक्यावर हेलमेट चढवत तडकाफडकी विमानाकडे धाव घेत पळत सुटले. तिच्यासह चौघेही पायलट पटापट शिडी चढून वर येत उघडलेल्या कॉकपीटमध्ये येऊन सीटवर बसले. अॉल क्लिअरचा इशारा दिला जाताक्षणी पाच मिग फायटर जेट प्लेन्सची इंजिन सुरू झाली. मिग जेट फायटर्स बघताबघता रन वे वरून वेगाने धावत येत घोंगावत हवेत झेपावली होती. भारतीय हद्दीत घुसखोरी करून आलेल्या चीनी विमानांना हुसकावून लावण्यासाठी पहाटे तीन वाजता तवांग एयरबेसवरून भारतीय वायुसेनेच्या पाच मिग 21 जेट फायटर विमानांच्या स्क्वॉड्रनने उड्डाण केले होते. भारतीय वायुसेनेचे मुख्यालय असलेल्या तेजपूरपासून १३७ कि.मी. दूर भूतान व तिबेटच्या पूर्वेस तवांग येथील छोटेखानी एयरफोर्स स्टेशनच्या विस्तारीकरणाचे काम हल्लीच सुरू झाले होते. इ. स. १९१४ साली सिमला करारान्वये ब्रिटिश इंडिया व चीन यामधील बहुचर्चित सीमारेषा ठरविणारी 'मॕकमोहन लाईन' आखली गेली होती. या सीमारेषेपासून काहीच कि. मी. दूरवर तवांग लष्करी विमानतळ हा आतापर्यंत केवळ हेलिकॉप्टर्सच्या वापरासाठी होता. हल्ली मात्र सीमापार सुरू झालेल्या चीनच्या वाढत्या हालचाली लक्षात घेऊन भारतीय वायुसेनेच्या लढाऊ विमानांच्या वापरासाठी येथे या विमानतळ बांधणीचे काम नव्याने सुरू झालेले होते. तवांग विमानतळाच्या विस्तारीकरणाची कुणकुण चीनला लागून या बहुचर्चित वादग्रस्त नेफा ( नॉर्थ ईस्टर्न फ्रंटियर एरिया ) प्रदेशावर हल्लीच रात्री - बेरात्री चीनची टेहेळणी विमाने घोंगावू लागली होती. भारतीय वायुसेनेद्वारे हल्लीच एक हाय रेझोनन्स रडार केंद्र येथील एयरबेसवर नव्याने उभारण्यात आले होते. तवांगमधील या नव्या विमानतळाच्या सुरक्षेची जबाबदारी भारतीय वायुसेनेची स्क्वॉड्रन लीडर मिस अवनी देशमानेनी स्वतःच्या शिरावर घेतली होती. थोड्या वेळापूर्वीच भारतीय वायुसेनेची पाच मिग जेट फायटर्स विमाने चीनी वायुसेनेच्या तीन चीनी बनावटीच्या लढाऊ विमानांचा पाठलाग करीत हवेत झेपावली होती.

            तीन चीनी लढाऊ विमाने पळ काढून भारत - चीन सीमारेषेपार जात उडत होती. स्क्वॉड्रन लीडर अवनी इंडो- तिबेट सीमारेषा ओलांडून चीनच्या हद्दीतील भूभागावरून उडत येऊ लागली. तिने समोरून पळ काढत असलेल्या विमानाला लक्ष्य केले व एक लेझर गायडेड मिसाईल फायर करून त्या पळपुट्या विमानाचा धुव्वा उडवला. अवनीच्या पाठोपाठ तिचे सहकारी पायलट कॕप्टन आकाश, राकेश, हरविंदर कौर व मोहित उडत येत होते. अवनी एका निसटून पळणा-या चीनी विमानाचा पाठलाग करीत आपल्या स्क्वॉड्रनशी चुकामूक होत ब-याच दूर निघून आली. अचानक मार्ग बदलून तिबेटच्या दिशेने पळ काढणा-या विमानाचा पाठलाग करीत ती नकळतच हिमालयीन पर्वतरांगांच्या भुलभुलैय्यामध्ये घुसून आली होती. नजरेसमोर उडत असलेल्या चीनी लढाऊ विमान अनपेक्षितपणे तिला हुलकावणी देत पर्वतरांगांआड अदृश्य झाले होते. तिचे मिग फायटर प्लेन एकटेच हिमालयाच्या पर्वतरांगांमध्ये भरकटत जात होते. शत्रूच्या विमानांचा पाठलाग करण्याच्या ओघात भान विसरलेल्या अवनीने तिबेटवरून उडत जात कधीच तिबेट देश ओलांडला होता. आता ती पश्चिमेस कैलास पर्वताच्या दिशेने मार्गात आडव्या आलेल्या बर्फाच्छादित शिखर माळांना चुकवत मार्ग काढत पुढे जाऊ लागली.

         तिबेटच्या पश्चिमेस साधारण १६ कि. मी. अंतर पुढे आल्यावर विमानास अचानक हादरे बसायला सुरूवात झाली. उंचावरून उडणारे विमान जमिनीच्या दिशेने खाली येऊ लागले होते. विमानाच्या कंट्रोलवरील नियंत्रण हातातून एकाएकी सुटू पाहत होते. अचानक समोर उभ्या ठाकलेल्या अस्मानी संकटामुळे ती जबरदस्त हादरून गेली. एका अदृश्य शक्ती भरून राहिलेल्या प्रदेशातून जात असल्याचे तिला जाणवू लागले होते. काही क्षणानंतर तिच्या विमानातील संदेशवहन यंत्रणा पूर्णपणे ठप्प झाली. तवांग एयरबेसवरील कम्युनिकेशन्स सेन्टरशी तिच्या विमानाचा संपर्क खंडित झाला होता. ती सर्वांपासून एकटी पडली होती. दिशादर्शन, वेग, उंची दर्शवणा-या डायल्समधील काटे जागीच थांबले होते. कंट्रोलच्या डिजिटल स्क्रीनवरील डाटा ओव्हरलॕप होत केवळ शून्ये दिसू लागली. विमान कुठल्यातरी रेडिओ ॲक्टिव्ह लहरींच्या अदृश्य शक्तीने भारलेल्या भूगावरून जात होते हे मात्र निश्चित! दैवावर सारे काही सोपवून ती विमानाची जॉयस्टिक धरून शांत बसून राहिली. तवांग एयरबेसवरून उड्डाण करून तीन तास उलटून गेले होते. तिची सहकारी विमाने मागेच कुठेतरी भिरभिरत राहिली होती. तिचा परतीचा मार्ग बंद होऊन ती जणूकाही चक्रव्यूहात अडकून आकाशातून उडत अज्ञात स्थळी जात होती.

           चहुकडे पसरलेली हिमशिखरे तिला साद घालून आपल्याकडे बोलावित होती. छातीत धडकी भरवणारे बर्फाच्या राशीच्या राशी रचलेले उत्तुंग ग्लेशियर्स सुर्यकिरणांच्या तेजाने उजळून निघत तिचे डोळे दिपवत होती. डोळ्यावर गॉगल असला तरी तेजाळ हिमशिखरांकडे पाहणेही दुरापास्त झाले होते. हिमालयाच्या अज्ञात प्रदेशावरून ती जेट फायटर प्लेन उडवत निरंतर पुढे पुढे जात राहिली. अनंताकडून अनंताकडे चालू असलेला विमान प्रवास कधी थांबणार होता... तिला तिचेच कळत नव्हते. आकाशातून सफाईदार सूर मारत पर्वत शिखरांच्यामधून वाट शोधत ती कुठल्याही टेक्निकल डाटाशिवाय विमानाचा कंट्रोल सांभाळत ती पायलट सीटवर बसून होती. हातात धरून ठेवलेली जॉय स्टिक खालीवर करीत विमानाला कधी उंचावर तर कधी खाली येत पर्वतरांगांना चुकवत वेगाने उडत जाऊ लागली होती.

            आतापर्यंत साथ देत असलेल्या निसर्गाने आपला रंग बदलवायला सुरूवात केलेली होती. आकाशात लख्खपणे तळपत असलेला सुर्य कधीच ढगांआड लपला होता. हवामान कुंद झाले. मस्तवाल वारा पिसाटल्यासारखा गरगरत येऊन तिच्या विमानाला धडकू लागला. विमानाला सरळ रेषेत उडणेही अवघड होऊन बसले होते. विमानाला जबरदस्त धक्के बसत असल्याचे तिला जाणवू लागले होते. दोन्ही हात जॉय स्टिकवर घट्ट धरून ठेवत ती विमानाला दिशा देण्याचा प्रयत्न करू लागली. एकाएकी आकाशातून हिमवर्षाव पडायला सुरूवात झाली. विमानाच्या दोन्हीही पंखावर हिम साठून वजन वाढत जात तिचे विमान खाली खाली येऊ लागले. आजूबाजूला उभे असलेली ग्लेशियर्स कडा तुटून धाडधाड कोसळून खाली पडतांना दिसू लागले. पांढरे शुभ्र पीठासारखे दिसत असलेले हिम पर्वतरांगावरून ओघळून खालच्या दिशेने वाहत येऊ लागले. ग्लेशियर्सवरून ओघळून खाली पडून वाहत आलेला हिमकणांचा मोठा प्रवाह बघताक्षणी ती हादरलीच. पण पुढच्याच क्षणाला आपले कच खात असलेले मन घट्ट करून विमानाला उलटे पालटे होत पंख तुटलेल्या पक्ष्याप्रमाणे कोसळून खाली येऊ लागले. विमानाच्या पंखांवर साठलेल्या हिमकणांचे ओझे भिरकाऊन देत पुन्हा उंची गाठून सूर मारत विमानाला तशाही परिस्थितीतून सुखरूप बाहेर काढण्यात यशस्वी झाली होती. फायटर प्लेनच्या ग्लास डोममधून बाहेर डोकावून पाहत तिने दूरवर नजर टाकली. समोर काहीच दिसत नव्हते... दिसत होता तो भुरभुरणारा हिमवर्षाव! 

            एकाएकी बाजूला नजर पडून तिने विमानाच्या पंखांमधील एका इंजिनमधून धूर येतांना पाहिले. इंधन दर्शवणा-या डायलकडे नजर टाकली तर एकदम पोटात गोळाच उठला. इंधन साठाही जवळजवळ संपत आलेला होता. ओव्हरहीट होऊन भकाभका धूर येत असलेले डाव्या पंखातील इंजिन आता फारवेळ तग धरू शकणार नाही हे तिला जाणवत होते. थोड्याच वेळानंतर

ते इंजिन सीझ्ड होऊन थंडावणार होते. डाव्या बाजूच्या पंख्यातून एकसारखा कच् कच् आवाज ऐकू येत होता. कुठल्याही क्षणी तो फॕन फिरायचा बंद होईल हे कळत होते. एका पंखाशिवाय उडत राहणे म्हणजे विमान कोसळून स्फोटच व्हायचा, अथवा जमीनीवर आदळून बर्फात तिचे विमान दफन होणार होते. विमान या पर्वतीय प्रदेशात लँड करणे म्हणजे मृत्यूस आमंत्रणच देण्यासारखे! विमान पर्वतरांगांना धडकून त्याचे तुकडे तुकडे व्हायला वेळ लागणार नव्हता, तिला या बिकट परिस्थितीची पूरेपूर कल्पना आलेली होती. या मृत्यूजालातून बाहेर पडणे केवळ अशक्यच.... आता विमान सोडून पॕराशूटने खाली उतरण्याशिवाय पर्यायच राहिलेला नाही. तिने पाठीवरील पॕराशूट बॕग तपासून पाहत समोरील कंट्रोलवरील इजेक्ट नॉबवर हात ठेवला. आता तिचे विमान दिशाहीन होऊन भरकटत जात होते. वातावरणात थरार क्षणाक्षणाला वाढत जात होता. डोळ्यापुढे अंधारच अंधार साठून राहिलेला होता. हिमवर्षावाची तीव्रता वाढत जाऊ लागली. अत्याधिक उंचीवरून उडतांना हवेचा दाब वाढून तिला अस्वस्थ वाटू लागले. डोक्यात जणू घणाने घाव घालावे तसे डोके ठणकू लागले होते. रक्तदाब वाढल्यासारखे भासत तिला डोळ्यापुढे गरगरायला झाले होते. पोटात डचमळून येत वांतीची भावना होऊ लागली. तिची शुध्द हरपत जात होती. आता तिचे डोळे मिटणार तोच तिने विमानातील सीटचा इजेक्ट नॉब जोराने दाबला.

          अचानक विमानाचा ग्लास डोम टॉप उघडला गेला आणि ती सीटवरून उचलली जात एक जबरदस्त धक्का बसून धाडदिशी बाहेर फेकली गेली. तिच्या पाठीवरील बॕगमधून पॕराशूट सरसरत उलगडत जात आकाशात पसरत जाऊ लागले. एक जोराचा हिसका बसून पॕराशूटच्या कॕनव्हॉस बेल्टमध्ये जखडलेली ती आता आकाशातून तरंगत होती. वेगाने पुढे जात असलेल्या विमानाला अलविदा म्हणून ती आकाशातून हळूहळू जमिनीच्या दिशेने येऊ लागली. जबरदस्त थंडीचा तडाखा जाणवत होता. पक्ष्याप्रमाणे सूर मारत पॕराशूट जमिनीच्या दिशेने अलगद उतरून येऊ लागले. पॕराशूटला लटकलेला तिचा मूर्छित देह हळूहळू तिला जमीनीच्या दिशेने येऊ लागला. मघापासून हेलकावे खात उडत जाणारे मिग फायटर कधीच पर्वतरांगांआड जाऊन अदृश्य झालेले होते. पॕराशूटने तिला अलगदच जमीनीवर उतरवले होते पण ती आता बेशुध्दावस्थेत चेतनाहीन होऊन मऊशार हिमाच्या गादीवर पहुडली होती.

           अंगावर जाडजूड वुलनचा ओव्हरकोट असल्याने अंगात थोडीतरी उब शिल्लक राहिलेली होती. पॕराशूट दोन उंच पर्वत शिखरांमधील सपाट जमीनवर कोसळले होते. हिमाच्छादित जमीनवर अलगद पडल्याने विशेष शारीरिक इजा न होता ती सुरक्षित राहिली होती. तिचा कोवळा सुकुमार देह बर्फाच्छादित जमीनीवर बेवारसपणे पडून होता. नशीब म्हणायचे हेलमेटमुळे तिचे डोके कड्याला आपटण्यापासून बचावले होते. 

--------------------------------------------------

शंभला रहस्य भाग -- 2

 

       हळूहळू तिला शुध्द येऊ लागली होती. कितीतरी वेळ ती तशीच हिम साठलेल्या भुसभुशीत जमीनीवर पडून होती. तिने हळूच डोळे उघडले तर तिला घेरून उभे असलेले बरेच लोक तिच्या अवतीभवतीने उभे असलेले तिला दिसले. तिने झटदिशी कमरेचे रिव्हाल्व्हर काढून हातात पकडले. ती त्या लोकांवर रिव्हाल्व्हर रोखून ठेवत ताडकन उठून बसली व अंगावर साठलेल्या हिमाचा थर झटकत डोळे मोठाले करून समोर पाहू लागली. अंगावर केसाळ कातड्याचे पांढरे शुभ्र लाँगकोट व कानापर्यंत येत असलेल्या त्रिकोणी टोप्या घातलेली ती माणसे साधारण एस्किमोसारखे दिसत होती. काही तरुण पुढे येऊन तिच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करीत ओठ हलवत बोलत असल्याचे तिला जाणवत होते. ती अजूनही पूरेपूर शुध्दीवर आलेली नव्हती. तिचे डोळे गपागप मिटले जात होते. तिच्या हातातून रिव्हाल्व्हर गळून पडले. स्वतःचा तोल न सावरता आल्याने ती पुन्हा जमीनीवर कोसळणार होती पण एका तरुणाने तत्परतेने तिला सावरून धरले. त्याने पाठीवरील लांब भोपळ्याच्या आकारातील बाटलीतील कसलेसे पेय तिच्या तोंडात ओतले. तिचा चेहरा एकदम कसातरी होत आक्रसला गेला. कदाचित कडवट चवीचे घसा भाजून टाकणारे ते जळजळीत लाल पेय पोटात जाऊन पोहोचले होते. त्या पेयाच्या प्रभावाने पाच - दहा मिनिटांनंतर तिच्या शरीरात उब परतून येत ती शुध्दीवर येऊ लागली. महत्प्रयासाने तिने डोळे उघडून पुन्हा स्वतःवर नियंत्रण मिळवले व ती बोलू लागली.

" मी आता कुठे आहे? तुम्ही कोण आहात आणि या असल्या बर्फाळ प्रदेशात ? मी खरोखरच जिवंत आहे की मृत्यूपश्चात हे सारे पाहत आहे?" 

" तुम्ही जिवंतच आहात आणि आता सुखरूप आहात पण जास्तवेळ इथे थांबता नाही यायचे.... पुन्हा एकदा मोठ्या हिमवादळाची शक्यता दिसतेयं! आम्ही आता येथून निघत आहोत पण तुम्हालाही आमच्या सोबत यावे लागेल !" तिच्या समोर उभा असलेला तरुण तिला सांगू लागला.

" हो... पण कुठे घेऊन जाणार आहात मला ....? इथे तुमची वस्ती आहे का ? माझी काहीच हरकत नाही पण त्याआधी तुम्ही तुमच्या विषयी व कोठे घेऊन जाणार आहात त्याची पूर्ण कल्पना द्यावी!" ती अविश्वासाने पाहत थरथरत्या सुरात बोलत होती.

" तुम्ही आता शंभला खो-यातील सिध्दाश्रममध्ये येणार आहात.... म्हणजे आमच्या सिध्दांकडून तसा तुम्हाला येथे येण्याचा आदेश झालेला आहे. क्वचितच एखाद्या पुण्यात्म्याला आमच्या नगरीत यायची संधी मिळते. आमच्या सिध्दाश्रमामध्ये तुम्ही सुरक्षित असाल याची हमी मी देतो तुम्हाला! तुमचे नाव कळाले तर बरे होईल आणि तुम्ही कोठून आलात हे कळले तर .... सांगाल ना ?"

" मी अवनी... अवनी देशमाने ! भारतीय वायुसेनेत फायटर प्लेनची पायलट आहे. अरुणाचल प्रदेशातील तवांग एयरबेसवरून उड्डाण केले होते. अरुणाचल- तिबेट सीमारेषेवरून उडत जात असतांना अचानकच.... ? म्हणजे मलाच कळले नव्हते मी भरकटले होते. कुठल्यातरी अगम्य शक्तीने खेचली जात हिमालयाच्या पर्वतरांगांमधून मार्ग शोधत माझे फायटर प्लेन उडत जात होते. मी कुठे जात होते आणि का ते सुध्दा कळत नव्हते. माझ्या विमानाचे एक इंजिन बंद पडल्याने मी पॕराशूटच्या साह्याने येथे उतरून आले आहे!"

" अवनी.... तुम्ही अगदी योग्य ठिकाणी येऊन पोहोचला आहात.... कदाचित सिध्दाश्रमात वास करीत असलेल्या दैवी शक्तीने तुम्हाला येथे आणले आहे.... अर्थात तशी महावतार बाबाजी अखिलेश्वरानंदांची तशी आज्ञा असावी!"

" मला नीटसे कळले नाही... महावतार बाबाजी.... सिध्दाश्रम ? म्हणजे शंभला नगरी अर्थात बहुचर्चित गूढ शांग्रीला घाटी... असे म्हणायचे आहे का तुम्हाला?" अवनीने डोळ्याच्या पापण्या पटापट फडफडवत अविश्वासाने पाहत विचारले.

" अवनी... तुम्ही मनात कसलेही भय न बाळगता नि:संकोचपणे आमच्यासोबत चला... अशी संधी मानवजातीतील कोणाला कधीतरीच मिळत असते. ही स्वर्गतुल्य नगरी आहे तुम्ही कल्पनाही केलेली नसेल इतकी सुंदर आहे. तुमचे पूर्वजन्मीचे सुकृत म्हणून अखिलेश्वरानंद बाबाजींनी येथे येण्याची प्रेरणा तुम्हाला दिली आहे. येथील अनुभव घेऊन बघा... तुमची निराशा नाही होणार!"

" ठीक आहे चला तर.... मी यायला तयार आहे!" अवनी उठून बसत आपल्या शरीराभोवती जखडलेले पॕराशूटचे बंध सोडवू लागली. सातजणांचा तो समूह होता. सर्वच्या सर्व उंचपुरे, गोरेपान व निरागस चेहरे असलेले तरुण होते. अवनीच्या अंगावर त्या तरुणाने केसाळ कातड्याचा लाँग कोट व उंच टोपी घालायला दिली. हातात काठी धरून अवनी त्या तरुणाचा हात हातात धरून त्याच्यामागून चालू लागली. पुढे जात असलेल्या तरुणांचा जत्था बर्फातून मार्ग काढत पुढे जात राहिला. अवनी त्यांच्या सोबतीने सिध्दाश्रमात जायला उत्सुक झाली होती. कुठेतरी शांग्रीला नगरीविषयी वाचल्याचे तिला स्मरत होते. कदाचित जेम्स हिल्टनची प्रसिद्ध कादंबरी ' द लॉस होरायझन अबाऊट शांग्रीला किंगडम !' हो.... तीच कादंबरी मी वाचली होती... पण कॉलेजात असतांना! तसेच साधारण माहिन्यापूर्वी आपला पायलट सहकारी मित्र आकाशसोबत अरुणाचलच्या सुप्रसिद्ध तवांग येथील बौद्ध मठाला भेट दिली होती. त्यावेळी तेथील मठाधिपती लामांनी तिला कालचक्र विज्ञान हे तिबेटी धर्मग्रंथ प्रकारातील इंग्रजी आनुवाद असलेले पुस्तक वाचण्यास दिले होते. त्या पुस्तकात शंभला म्हणजेच शांग्रीला विषयी साद्यंत माहिती दिलेली होती. ती सुध्दा त्या दिवशी घाईघाईने वर वर ओझरती वाचली होती. तेव्हापासून मनात घर करून राहिलेली अदभूत नगरी शंभला तिला बोलावित होती. 'शंभला म्हणजे शांतता व नीरवता याचे स्थान अर्थात शंभू आलय .... साक्षात महादेवांची शंभला नगरी! म्हणतात येथे अमर होण्याचे रहस्य दडले आहे. मी मर्त्य मानव असून आज तिथे पाऊल ठेवणार आहे? मिळालेल्या माहितीनुसार येथे काळाचा प्रभाव नगण्य आहे. थोडक्यात फोर्थ डायमेंशन इथे अस्तित्वात आहे म्हणजे मी त्रिमिती आयामातील वर्तमान दुनियेतून चौथ्या आयामात जाऊन पोहोचणार आहे? हजार - दीड हजार वर्षे वय असणारे सिध्द महायोगी येथील गुंफांमध्ये आजही साधनेत लीन आहेत. काळाचा प्रभाव नसल्याने येथील लोक अमर आहेत.... येथे मृत्यू नाहीच नाही! तसेच दुःख, निराशा,भय, चिंता इ, विकारांना स्थानच नाही. इथे आहे तो केवळ आनंदीआनंद, सकारात्मक जीवनशैली, अध्यात्म/ विज्ञानवादी जीवनशैली! येथे आल्या मन- विचार- प्राणशक्ती जबरदस्त वाढून येते. ही चौथ्या आयामातील शंभला नगरी पृथ्वीवर भौतिकदृष्ट्या साकार नाही... कोणालाही ती दिसत नाही.... पण अध्यात्मिक योगसिध्दीने, मनाच्या अंर्तचक्षुंनी पाहण्याची, अनुभवण्याची ही साक्षात देवांची व सिध्दपुरुषांची नगरी आहे! बघू तरी नेमके काय आहे ते!' अवनी मनाशी पुटपुटत त्यांच्यामागून चालत येत होती. दूरवर कुठेतरी एक सोनेरी उंच कमान दिसू लागली होती. तेथे पोहचण्याचा रस्ता मात्र सोपा दिसत नव्हता. गुडघ्यापर्यंत पाय हिमराशीत रुतून बसत होते. काठीचा आधार घेत हिमातून पाय उपसून पुढे टाकत ते सर्व चालत येत होते. ह्या दुर्गम व उंच डोंगराळ भूभागावर नजर पोहोचेल तिथपर्यंत भुसभुशीत हिम साठून असलेल्या बर्फाच्या राशी पसरलेल्या दिसून येत होत्या. त्यावरून चालतांना बरीच दमछाक होत होती. आजूबाजूला हाडे गारठून टाकणा-या थंडीचा जोर जाणवत होता. 

            पायाखालील भुरभुरणा-या हिमकणांच्या टेकड्यांवरून ते सर्वजण सोनेरी कमानीच्या दिशेने चालत येत होते. प्रतिकूल बर्फाळ हवामानाशी दोन हात करीत आठजणांचा जत्था आता सोनेरी कमानीपाशी येऊन ठेपला. असल्या निर्मनुष्य व दुर्गम भागात ही सोन्याची कमान ? होय... ती पिवळ्याधम्म लखलखीत सोन्यातच घडवलेली होती! अवनी कमानीकडे पाहत स्वतःलाच विचारू लागली. त्या कमानीच्या पलिकडे दाट धुक्याचा पडदा पडलेला असल्याने काहीसुध्दा दिसत नव्हते. आता कमानीखालून पलिकडे जायचे म्हणजे बाह्य वास्तव जगातून एका अज्ञात व गूढ जगात सामावून जायचे असल्याचे टोळीप्रमुख शिवालिक सांगत होता. जणू ते एका मितीतून दुसऱ्या मितीमध्ये पाऊल ठेवणार होते. कमानीच्या अलिकडचे जग हे भौतिकदृष्ट्या साकार होते, ज्यामध्ये आतापर्यंत ते वावरत होते पण कमानीच्या पलिकडे पाऊल ठेवताच भौतिक जगताच्या सर्व व्याख्या बदलणार होत्या आणि प्रत्यक्षात ते देवलोकीचा स्वर्ग भासावा अशा शांभल नगरीत प्रवेश होणार होता. झपाझप पावले उचलत आठहीजण रांगेत येऊन एकामागोमाग एक असे कमानीखालून पलिकडे जाऊ लागले. अवनीला शरीरावर रोमांच उभे राहिल्याची जाणीव होत तिची कोमल काया शहारून उठली. हृदयात अनामिक हलकीशी वेदना देणारी पण हवीहवीशी अशी मधुर कळ सणदिशी उठून नखशिखान्त सळसळत गेली. तिची नाजूक कोमल काया हलकासा झटका बसून थरारली. तिच्या चित्तवृत्ती भावविभोर होत हृदयात मधुर संगीताच्या सूरमयी लहरी उफाळून आल्यासारखे वाटू लागले. एका अनामिक ओढीने ती त्या अगम्य नगरीत खेचली जाऊ लागली. उत्कट आत्मानंदाची अनुभूती होत ती झपाट्याने पावले उचलत त्यांच्या पाठोपाठ येऊ लागली. पायाखालची थंडगार बर्फाळ जमीनीची जागा आता लुसलुशीत उबदार गवताने घेतली असल्याचे जाणवू लागले होते. जमीनीवर पावले अलगद रुतून दबली जात मऊशार गालिच्यावरून चालत असल्याचा भास होत राहिला. दाट धुक्याच्या भिंतीपलिकडे काहीही दृष्टीस पडले नव्हते. धुक्याची घनता अधिक असल्याने अजूनही आजूबाजूचा परिसर दृष्यमान होत नव्हता. डोळे मिटून चालल्याप्रमाणे अंदाजानेच चाचपडत धुक्याने वेढलेल्या जंगलातून त्यांचा प्रवास चालू होता एवढेच कळत होते. एकमेकांना एकत्र जोडून ठेवणा-या दोरीला धरून आठही जण आस्तेकदम पुढे जाऊ लागले.

            हळूहळू धुक्याचा पडदा विरळ होत गळून पडू लागला. उंचच्या उंच हिमाच्छिदित पर्वतरांगा, ते राक्षसी जीवघेणे कडे, खोल खोल दिसणाऱ्या कैक मैल अंतरापर्यंत व्यापून आसलेल्या द-यांचे साम्राज्य आता नाहीसे झाले होते. डोळ्यांना सुखावणारा मंद सोनेरी धवल प्रकाश वातावरणात सर्वत्र भरून राहिला होता. मनाला प्रफुल्लित करणारा दुधाळ रंगाचा मनमोहक सौम्य प्रकाश आता दृष्टीस पडू लागला होता. भोवतालच्या परिसराची दृश्यमानता आता वाढू लागली होती. पायाखाली आता सपाट गवताळ जमीन संपून तिची जागा खालच्या दिशेने उतरत असलेल्या पायऱ्या - पायऱ्यांच्या मार्गाने घेतली होती. सोनेरी पाय-यांवर लाल रंगात नक्षी चितारलेली दिसून येत होती. पायऱ्यांची ही स्वप्निल वाट दोन्हीही बाजूला साथीला येणाऱ्या उंच झाडांच्या रांगांनी अधिकच खुलून दिसत होती. अनेक ठिकाणी वळणे घेत अगदी जवळजवळ असलेल्या असंख्य नाजूकशा पायऱ्यांची वाट खाली उतरून जात होती, जणू ती आता पाताळातच घेऊन जाते की काय असे वाटू लागले. आजूबाजूला हिरवीगार झाडी, फुलांचे ताटवे, विस्तारलेली गवताची कुरणे दिसत होती. हिरव्या रंगाच्या वनसंपदेने नटलेल्या मनोहर पर्वतरांगा बाहू पसरून वाटसरूंना आपल्याकडे बोलावित होत्या. एका प्रसन्न व उत्साहदायी वातावरणात ते सारे उत्साहाने चालत होते. चारही दिशेने छातीचा कोट करून उभे असलेल्या पर्वतांमधील खोलगट भागात स्थित असलेल्या अदभूत शंभला या अदभूत नगरीकडे आठजणांचा प्रवास चालू होता.

           गोलाकार व्यापून असलेल्या पाचूच्या बेटावरील आठ दिशांनी पसरत जाणाऱ्या पर्वतरांगा स्वागतास आल्या. त्या पर्वतांच्या पायथ्याशी अनेक शहरे वसलेली नजरेस पडू लागले. वर्तुळाकार मांडणीतील प्रदेशाच्या केंद्रस्थानी आपल्याला जायचे असल्याचे टोळीप्रमुख शिवालिकने अवनीला सांगितले. पर्वत शिखरांवरून परावर्तित होत दिव्य सोनेरी - धवल रंगाचा डोळ्यांना सुखावणारा प्रकाश संपूर्ण शंभला नगरीस उजळून टाकत होता. अवनीच्या लक्षात एक गोष्ट चटदिशी आली ती म्हणजे येथे सुर्य वा चंद्र यांचे अस्तित्वच नव्हते मुळी! हा दिव्य प्रकाश कुठंन येत आहे त्याचा उलगडा होत नव्हता. तिच्या गोंधळलेल्या चेहऱ्याकडे पाहत शिवालिक मंद हसला. त्याने हा दिव्य प्रकाश अंतरिक्षातून येत असल्याची तिला माहिती दिली. ती अजून काही विचारणार तोच शिवालिकने तिला गप्प केले व मुक्कामावर पोहोचल्यावर सर्व उलगडा होईल याची खात्री दिली.

           पायऱ्या - पायऱ्यांची वाट संपून सपाट मैदानी प्रदेशातून त्यांची वाटचाल चालू राहिली. शंभला आता जवळ येत दृष्टीपथात पडत होते. उंच टेकड्यांवरून सप्तरंगी धबधबे खाली कोसळत होते. निळ्या रंगाच्या स्फटिक पाण्याने झुळझुळणारी विस्तीर्ण जलाशये नजरेस पडू लागली होती. येथील राजवाड्यांसारख्या दिसणाऱ्या सुंदर व भव्य इमारतींनी अवनीचे लक्ष वेधून घेतले होते. ती मनोमन मोहोरून उठली होती. साक्षात स्वर्गाची अनुभूती देणारी विविधरंगी फुलांनी फुललेली उद्याने, मोठमोठाले सुंदर वळणावळणांचे रस्ते कडेला बहरलेली वृक्षसंपदा, ठिकठिकाणी दिसणारे नितळ पाण्याने भरलेले जलाशय, तळी, पाहत अवनी मंत्रमुग्ध होत जादूई नगरी पाहत चालत होती. रस्त्यावरून हसत खेळत गाणी म्हणत चालत रंगीबेरंगी वस्त्रप्रावरणे परिधाने केलेले दिव्य कांती व मोहक चेहरे असणारे स्त्री- पुरूष त्यांच्याकडे कुतूहलाने पाहत होते. वातावरणात सुगंधाची लयलूट होत मन प्रसन्न झाले होते.

          अवनीसोबत चालणारे तरुण आता नऊ मजली उंच प्रशस्त राजभवनासारख्या दिसत असलेल्या इमारतीच्या पुढ्यात येऊन थांबले. नवरत्नांनी झळकत आलीशान राजभवन अगदी स्फटिकासारखे झळाळत होते. दुधाळ तेजस्वी प्रकाश त्यावरून परावर्तित होऊन असंख्य किरणे सर्वांच्या चेहऱ्यावर नाचू लागली होती. एवढा विस्तीर्ण राजमहाल जणू स्फटिकाचा डोंगरच भासत होता. विलक्षण प्रकाशाने उजळेलेली तावदाने, दरवाजे, गवाक्षे तिला मोहित करीत होती. राजभवनाच्या परिसरात सुंदर फुलांची बागा, कारंजे उसळत असलेल्या अनेक लहान मोठ्या पुष्करणी दिसत होत्या. परिसराच्या चारही बाजूने सळसळणा-या उंच झाडांची महिरप दिसत होती.

          राजभवनातून हातात तबके धरलेल्या अप्सरेसमान सुंदर स्त्रिया उतरून आल्या. अवनीच्या अंगावर सुवासिक जलाचा शिडकावा करून तिला फुले देऊन तिचे स्वागत करण्यात आले. तिचे औक्षण करून तबकातील निराजंनाने ओवाळून तिला मिठाई भरवण्यात आली. तिला हाताला धरून त्या सुंदर स्त्रिया राजभवनामध्ये घेऊन आल्या. अवनीला तर हे सर्व नवीनच होते पण मनात आनंदही खूप होत होता. स्वर्ग म्हणावा तो हाच ! अवनी मनात पुटपुटत राजभवनात येऊन ठेपली. तिच्या अंगावर अजूनही फायटर प्लेनच्या पायलटचा युनिफॉर्म कायम होता. तिच्यासाठी एका तबकात रेशमी सुळसुळीत वस्त्रे ठेवून तिला कपडे बदलून यायला त्या स्त्रियांनी तिला सुचविले. मघाशी साथीला आलेले तरुण आता इतरस्त्र पांगलेले होते. अवनीचा ताबा आता राजभवनातील सुंदर स्त्रियांनी घेतलेला होता. अवनीसाठी खास जेवणाचा बेत ठेवला होता. अवनी फ्रेश होऊन नवीन पायघोळ रेशमी निळा झगा पेहरून दिवाणखान्यात आली होती. सुग्रास जेवणावर आडवा हात मारून पोटभर जेवून घेतले. तिच्या सोबत वावरत असलेल्या तरुणींनी तिला तिच्या विश्राम कक्षात नेऊन सोडले व नंतर रात्रीच्या जेवणाच्या शंभला नगरीचे शासक कुलिक राजे तिच्याशी बोलणार असल्याचे तिला सांगण्यात आले. तोपर्यंत आरामकक्षातील गुबगुबीत गाद्या गिर्द्यांवर पडून आराम करण्यास सुचविले गेले. अंगावर उबदार पांघरूण ओढून प्रवासाने दमलेली अवनी झोपेच्या आधीन झाली.

-------------------------------------------------- 

      शंभला रहस्य भाग -- 3


      सर्वत्र निळसर चंदेरी सौम्य पण आल्हाददायक प्रकाश पसरलेला दिसत होता. दुपारच्या शंभल नगरीत प्रवेश करतांना सोनेरी धवल प्रकाश सोबतीला होता पण आता निळसर मंद प्रकाश.... म्हणजे रात्र झाली असावी! अवनी मनाशी अंदाज बांधत तयारीस लागली. शीतल सुगंधित जलाने स्नान करून पायघोळ रेशमी लाल रंगाचा झिरझिरीत तलम झगा परिधान केला. आरशात पाहत केस व्यवस्थित विंचरून मानेवर अंबाडा सोडून ती आराम कक्षात बसून छताकडे नजर लावून पाहत बसली. छताला असंख्य गोलाकार गवाक्षे होती. त्यामध्ये बसवलेल्या काचेच्या टेलिस्कोपिक तावदानामधून बाहेरील निळेशार आकाश दिसत होते. आकाशातील तारे, ग्रह, नक्षत्रे अगदी जवळ आल्यासारखे भासत होते. ही गवाक्षे भिंगसदृश्य काचेच्या गोलाकार तावदानांनी बनवलेली असली पाहिजे. हा बहुतेक सर्वात वरचा म्हणजे नववा मजला पाहिजे व येथून आकाश निरीक्षण करीत असावेत. शंभलवासीयांच्या उत्कृष्ट कारागिरीचे कौतुक करीत ती हरखून गेली होती. दारासमोर सुंदर स्त्रिया येऊन थांबल्या व बाहेर बोलावू लागल्या. शंभला नगरीचे शासक राजे रुद्रचक्र तळमजल्यावर दिवाणखान्यात तिचे प्रतिक्षेत बसून असल्याचा निरोप एका तरुणीने तिला सांगितला व त्यांच्यासह खाली येण्यास सुचविले. लांबलचक पायघोळ झग्याचा घेर उचलून धरत अवनी आसनावरून उठली व त्या स्त्रियांच्या घोळक्यासह चालत येत उदवाहनाजवळ येऊन थांबली. उदवाहक सुरू होऊन सर्वांना घेऊन तळमजल्यावर येऊन थांबले. अवनीसह सहा तरुणी तिला मार्गदर्शन करीत अनेक कक्षातून फिरवून आणत दिवाणखान्यात घेऊन आल्या. लांबलचक नक्षीदार मेजाभोवती लाल कुशन्सच्या खुर्च्या हारीने मांडून ठेवलेल्या दिसत होत्या. दिवाणखान्यात छताला रंगीबेरंगी काचेचे लोलक जडवलेली मोठमोठी झुंबरे लटकत होती, सप्तरंगी प्रकाश किरणे संपूर्ण दिवाणखान्यात भरून लखलखतांना दिसत होती. मेजावर ब-याच प्रकारची फळे सोन्याच्या तबकात रचून ठेवलेली होती व बाकदार नक्षीच्या सुरया पेय वा जल भरून ठेवलेल्या असाव्यात, अवनी मनाशी जुळवाजुळव करीत एका तरुणीने निर्देश केलेल्या आसनावर येऊन बसली. शंभला नगरीचे शासक पांढरा शुभ्र पायघोळ अंगरखा व तुमान असा पोशाख घालून त्यांच्या लवाजम्यासह आसनावर बसून होते. त्यांची जवळची मंडळीतील तरुण तरुणीही सुहास्य प्रसन्नचित्त चेहरा, बांधेसूद शरीर चमकदार गोरी त्वचा व उंचपुरे असेच दिसत होते. सर्वांनी पांढरेशुभ्र पायघोळ वस्त्रे पेहरलेली होती. हल्लीचे शंभल शासक कुलिक राजे रुद्रचक्रांनी अवनीकडे पाहत प्रसन्न मुद्रेने स्मित करीत अवनीचे स्वागत केले. सोनेरी मेजावर पाने टाकली जात अन्नपदार्थ वाढले जात होते. गरमागरम पदार्थाचा घमघमाट पसरला जात सर्वांची भूक खवळली होती. गोडधोड पक्वान्ने पानावर येऊन पडत होती. द्रोण खिरीने भरले जात होते. साग्रसंगीत जेवणाचा आनंद घेत राजे अवनीशी गप्पा करू लागले.

" अवनी... एका विशेष हेतूने तुला शंभल नगरीत बोलावून घेतले आहे. महावतार बाबाजी अखिलेश्वरानंदांनी तुझी निवड करून आदेश दिला आहे व त्यानुसार घटना घडत जात तू आज येथे आहेस. म्हटले तर तू नशीबवानच आहेस.... या शंभलात पाऊल ठेवणे साधारण मानवास कदापीही शक्य नाही. हे स्थान तुमच्या सॕटेलाईटसच्या सूक्ष्म नजरेने टिपणे अजिबात शक्य नाही. अध्यात्मिक पराकोटीच्या उंचीस पोहचलेले साधकच येथे वास्तव्य करू शकतात. तुला अंतरिक्ष विज्ञानात विशेष रुची असल्याने आमच्या विज्ञान सिध्दाश्रमात तुला खगोलिय ज्ञानाची प्राप्ती होईल. जी मानवी कल्पनेच्या पलिकडची असेल म्हणजे परग्रहीय जगताशी तुझा संपर्क करून दिला जाईल. उद्या सकाळी तू आमच्या तीन सिध्दाआश्रमांना म्हणजे ज्ञानगंज, योगगंज व विज्ञान गंज यांना भेट देणार आहेस. तुला या तीही सिध्दाश्रमांची माहिती देणारे उच्च कोटीचे साधक महावतार बाबाजी अखिलेश्वरानंद, राम ठाकुर, श्यामाचरण लाहिडी, स्वामी विशुध्दानंद, कविराज इ. महान विभृती राहतील!"

" हे मी माझे परमभाग्य समजते की तुम्ही या लायक ठरविले व अदभूत अशा दुनियेत पाऊल ठेवण्याची संधी दिली. मला काही प्रश्न आहे त्याची उत्तरे मिळतील काय ? सर्वप्रथम शंभलाची भौगोलिक रचना, तिचे अलौकिक स्वरूप येथील शासक राजे इ बरेच काही विचारायचे आहे.... तर ?" अवनी भीतभीतच रुद्रचक्रांच्या तेजस्वी चेहऱ्याकडे पाहत म्हणाली.

" ठीक आहे अवनी ... मी समजू शकतो तुझी आतुरता ! मी सांगतो तुला शंभलाविषयी! तर संपूर्ण गोलाकार रचनेत ही शंभल नगरी आठ पर्वतशृंखलांनी घेरलेली आहे. बारा योजने व्यास असलेली ही नगरी तुझ्या भाषेत म्हणायचे तर १४४ ते १८० कि.मी. व्याप्ती असलेले पारलौकिक स्थान आहे. याच्या बरोबर मध्यभागी कालचक्र यंत्र निर्मिलेले आहे. हे शंभला स्थान तुमच्या सॕटेलाईटस कॕमे-यात वा जीपीआरएस सिस्टीममध्ये सुध्दा शोधता यायचे नाही. हे चौथ्या मितीतील नगर आहे जेथे काळाचा प्रभाव नगण्य आहे. त्रिमितीत राहणाऱ्या मानवांना हे शोधून काढणे कदापि शक्य नाही. तरी सुध्दा भारतात राहणारे कितीतरी योगी साधक आपल्या योगसाधनेद्वारा शंभलात येऊन उच्च कोटीची साधना करण्यात लीन राहतात. या भागातून आपल्या सिध्दीच्या साह्याने आकाशमार्गे प्रवास करून पृथ्वीवर मानवांची सेवा करण्यासाठी येत असतात. परग्रहावरील संस्कृतीशीही हे सिध्द योगी संपर्क करून त्यांच्या सोबत ब्रम्हांडीय ज्ञानाचे आदानप्रदान करीत असतात. विज्ञान - तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात पृथ्वीवासीयांपेक्षा कितीतरी पुढे शंभलावासी आहेत!" कुलिक राजे शंभलाविषयी माहिती देत सांगत होते.

" हो.... खरे आहे तुमचे म्हणणे ! आमची अंतरिक्ष याने अजूनही गुरु- शनीपर्यंतच मजल मारू शकलेली आहेत. ती सुध्दा निर्मनुष्य याने त्या ग्रहांच्या कक्षेत घिरट्या घालत ब-याच दूर अंतरावरून त्या ग्रहाच्या पृष्ठभागावरील फोटो मिळवत असतो. पृथ्वीवर चौथ्या आयामातील टाईम ट्रॕव्हेल ही कल्पना अजून केवळ कागदावरच आहे. शंभलात फिरण्यापूर्वी थोडी भौगोलिक माहिती दिलीत तर ?"

" अवश्य ! का नाही.... तर अवनी बघ असे आहे या गोलाकार अदभूत नगरीच्या केंद्रस्थानी म्हणजे आपण आता जेथे आहोत ते स्थान म्हणजे कलाप शहर आहे. याच्या पूर्वेस मनसा तर पश्चिमेस श्वेतपद्म ही सरोवरे आहेत. या दोघांमध्ये दक्षिणेस चंदनी उपवन आहे. तुला ऐकून आश्चर्य वाटेल पण या उपवनातच कल्पवृक्ष आहे. ज्याबद्दल तुम्ही फक्त पुराणात ऐकले आहे. या कलाप शहराच्या मध्यावर ही नऊ मजली इमारत उभी आहे. येथेच आपण आता बसलो आहोत. या इमारतीचे छत असंख्य टेलिस्कोपीक रचनेतील गवाक्षांनी बनलेले आहे. ज्या द्वारे अंतरिक्षातील हालचाली, ग्रहांची भ्रमणे टिपता येतात. पुराणात वर्णन केलेला सर्व चिंता हरणारा असा चिंतामणी अंतरिक्षातून येथेच म्हणजे कलाप नगरीत पडला होता पण आता तो पाताळात नागलोकांच्या ताब्यात आहे!"

" येथील शासक राजांविषयी थोडेफार कळेल? कधीपासून शंभला नगरी अस्तित्वात आहे? पुराणकाळापासून म्हणत आहात तर त्याविषयी अधिक माहिती.... जगाला शंभला कधी माहित झाले?" अवनी आता सारे काही विचारून घेण्याच्या मूडमध्ये होती.

" शंभला नगरी ही कुलिक अथवा कल्कि वंशाच्या लोकांच्या शासन यंत्रणेखाली आहे. कुलिक म्हणजे सर्व कुलांची एकजूट ठेवणारा. प्रथम कुलिक राजा सुचंद्र होता. त्याची शंभलावरील सत्ता इ. स.पूर्व ८७६ पर्यंत अबाधित होती. शाक्यमुनी पुत्र याने कालचक्राचे ज्ञान त्यास दिले होते. तेव्हापासून बौध्द धर्माचा येथे वरचष्मा राहिलेला आहे. कितीतरी लामा सिध्द येथील गिरीकंदरात विहार करीत असतात. कालचक्र विज्ञानाचा अभ्यास करून येथील सभ्यता स्थापन करून कुलिक राजांच्या कैक पिढ्या उलटून गेलेल्या आहेत. आतापर्यंत वीस कल्कि राजे होऊन गेलेत. आता मी रुद्रचक्र कुलिक राजा सत्तेवर आरूढ आहे. यापुढील शंभलाचा पंचविसावा शासक कल्कि राजा अधिचक्र हा असेल ज्याला भगवान विष्णूंचा दहावा अवतार समजला जाईल. हा कल्कि राजा जेव्हा संपूर्ण जग तिसऱ्या महायुध्दात ओढले जाईल त्यावेळी जगभरात महाविनाशक अणुयुध्दे होऊन जगाचा विनाश जवळ आलेला असेल. अशा वेळी हा राजा अधिचक्र शंभला शासक राजाच्या रुपाने कल्कि अवतार घेईल. हा विष्णू भगवान त्यांचा दहावा अवतार कल्कि असेल. विनाश पावलेल्या पृथ्वीवर कलियुग संपलेले असेल तेव्हा अधिचक्र पृथ्वीवर सत्ययुगाची स्थापना करेल... पण त्यास अजून कितीतरी म्हणजे ८३१ वर्षे शिल्लक आहेत!"

" पण या सगळ्या पुराणातील भाकडकथा आहेत असे म्हणतो आम्ही... कसले विनाश पावणारे कलियुग आणि येणारे सत्ययुग घेऊन बसलात तुम्ही ?"

" या काही गोष्टी तुम्हां मानवास अतर्क्य वाटणे साहजिकच आहे. मला सांग अवनी... तुमचे जगभरातील शास्त्रज्ञ हबल सारख्या दुर्बिणीद्वारे अवकाश अध्ययन करून नवनवीन ग्रह, निहारिका, कृष्ण विवर शोधून काढल्याचे प्रतिपादित करीत असतात. तरीसुद्धा अजूनही पूर्ण माहिती मिळविण्यास वा त्या ग्रहापर्यंत पोहचणारी याने बनविण्यात यशस्वी झालेले नाही आहात.... पण आमच्या सिध्द विज्ञानाश्रमात सा-या प्रश्नांची उत्तरे आमचे अध्यात्मिक साधनेत लीन असणारे उच्च कोटीचे साधक देतील किंबहुना परग्रहावरील सभ्यतेशी संवाद साधून देतील .... आणि शक्य झाल्यास परग्रहावर सफर घडवून आणतील सुध्दा.... यासाठी भौतिकदृष्ट्या अस्तित्वात असलेले तुमचे विज्ञान कुचकामी ठरते, तेथून पुढे ज्ञानाचा प्रकाश दाखवत अध्यात्म सुरू होते. त्याचवेळी अध्यात्माच्या पराकोटीस पोहचलेले सिध्द योगी आपल्या योगसाधनेद्वारा या सा-या वैज्ञानिक गोष्टी सप्रमाण सिध्द करून दाखवू शकतील. आता तुझा विश्वास बसणे आता कठीण आहे पण उद्या तू सिध्दाश्रमापैकी विज्ञानगंज येथे जाऊन तेथील साधकांना भेटशील तेव्हा अज्ञानाची पाळेमुळे गळून पडतील!"

" हे सारे खूपच आश्चर्यकारक वाटते ऐकायला.... पण असे होऊ शकते ?"

" अवनी तू आधी अनुभव घे आणि नंतर तुझ्या दुनियेत परतून हेच ज्ञान तू लोकांना दे. भारत देशाला विज्ञान तंत्रज्ञानातील अत्युच्च स्थानी नेऊन ठेवावेस म्हणून शंभलाची प्रतिनिधी म्हणून तुझी निवड आम्ही शंभलावासीयांनी केलेली आहे. तुला याविषयीचे संपूर्ण ज्ञान आमचे सिध्द योगी देतीलच!" 

" ठीक आहे.... माझी तयारी आहे! या कामासाठी माझी निवड करणे म्हणजे थोडे अतिच वाटत आहे म्हणजे मी केवळ एयरोनॉटियल इंजिनियर असून स्पेस अँड टाईमबेस्ड प्रोजेक्टवर काम करणे जमेल मला ?"

" अवनी.... खरे तर तुझ्या पदवीचा आम्हाला काहीच उपयोग नाही बघ.... तुझी कुशाग्र बुध्दीच सारे विज्ञानाधिष्ठित ज्ञान समजून घेण्यास समर्थ आहे आणि तू किती जिगरबाज आहेस हे आजच्या उदाहरणावरून सिध्द केलेले आहेसच. तर उद्या तयारीत राहा.... सिध्दयोगी अखिलेश्वरानंद तुला शंभलाची सफर घडवून आणतील!"

" ठीक आहे .... मी तयारीत राहीन !" अवनी एवढे बोलून जागेवरून उठली. सर्वांची जेवणे आटोपली होती. अवनी रुद्रचक्र महाराजांची परवानगी घेऊन आपल्या विश्रामकक्षाकडे जाण्यास निघाली.

-------------------------------------------------- 

       शंभला रहस्य भाग -- ४


            'आजचा दिवस विशेष राहणार होता. खरे तर रात्री झोपायला आल्यापासून हृदयात एक प्रकारची हूरहूर लागून राहिली होती. अदभूत स्वप्ननगरी शंभलाविषयी ऐकून उत्सुकता चाळवली होती. येथील पक्षीही किती वेगळेच आहेत ना... सप्तरंगाची उधळण होत असलेला पिसारा फुलवून नर्तन करीत आहेत. त्यांची प्रभात समयीची किलबिल ही कानाला गोड वाटत आहे. येथील पशुजगतही खूपच आगळेवेगळे आहे. पृथ्वीतलावर कधीही न पाहिलेले प्राणी शंभलात बिनघोर विचरण करतांना मी पाहिले आहे. आज तीनही सिध्द आश्रमांना प्रत्यक्ष भेट देण्याचा अमृतयोग चालून आलेला आहे. काय असेल तिथे, तेथील वातावरण कसे असेल या विचारात कालची रात्र कशीबशी तळमळत पार पडली होती. सकाळी सकाळी डोळा लागला होता. स्वप्नात स्वर्गाहून रम्य असलेल्या शंभलाची दृश्ये सारखी डोळ्यासमोर फेर धरून नाचत होती. महावतार बाबाजी अखिलेश्वरानंद स्वतः मला सोबत घेऊन शंभलाची सफर घडवून आणणार आहे. सकाळीच पक्ष्यांचे मधुर कूजन ऐकून झोपेतून जागी झाले. खिडकीबाहेर डोकावून पाहिले तर सोनेरी शुभ्रधवल असा मनोहर प्रकाश सर्वत्र पसरलेला होता. खाली बागेतील झाडे फुलांनी डवरून आलेली होती. एक हवाहवासा मधुर सुगंध संपूर्ण वातावरणात पसरलेला होता. कानापर्यंत मन मोहून टाकणा-या संगीत लहरी येऊन पोहचल्या, मन प्रेमरसाने ओथंबून आनंदित होत हलके फुलके वाटू लागले.' मनोराज्यात विहरत असलेली अवनी अथंरुणावरून धडपडून उठली. तिच्या सख्या हसत खिदळत दालनात येऊन तिच्या भोवती उभ्या राहिल्या. थोड्याच वेळात अखिलेश्वरानंद येतील याची कल्पना देत तिला तयार राहायला सांगितले. अवनी त्यांच्या सोबत खाली यायला निघाली. बागेतील पुष्करणीच्या सुगंधित जलाने सख्या तिला न्हाऊ घालत होत्या. तिच्यासाठी सोनेरी रंगाची रेशमी वस्त्रे तबकात घेऊन दुसरी सखी उभी होती. चार सख्या हास्य विनोद करीत तिच्या देहास तैलमर्दन करून उटणे लावून तिला स्नान घालत होत्या. अवनीला ती एक राजकुमारी असल्याचे भासत होते. अंगावर रेशमी पायघोळ झगा पेहरून अवनी शृंगार करण्यासाठी सख्यांसमवेत एका दालनात येऊन बसली. अवनीला सोन्या- हि-यांच्या दागिन्याने मढवून तयार केले जात होते. मूळचीच सुंदर असलेली असलेली अवनी रेशमी वस्त्रप्रावरणाने, दागिन्यांने सजूनधजून नव्या नवरीसारखी मोहक दिसत होती. जणू त्यांच्यापैकीच एक अशी अप्सरा! अवनी हळूवार पावले टाकत राजभवनाच्या दिवाणखान्यात येऊन बसली. अखिलेश्वरानंद आधीच येऊन बैठकीवर बसलेले होते. अवनीकडे सुहास्य मुद्रेने पाहत बाबाजींनी बोलायला सुरूवात केली.

" अवनी पृथ्वीतलावरील तू एक पवित्र आत्मा आहेस. तुझे पूर्वसुकृत थोर म्हणून तू या शंभलात पाऊल ठेवले आहेस. तू सुंदर तर आहेसच तशी विद्वानही आहे. तुला येथील गोष्टी लगेच कळून येतील आणि एक विशेष म्हणजे येथे आल्यावर मन- प्राण- विचारांची शक्ती वाढत असते. हे दिव्य स्थान आहे येथे ईर्ष्या, लोभ, अहंकार इत्यादी विकारांना अजिबात स्थान नाही, आहे ते केवळ आनंद, मानसिक शांती, प्रेम !"

" होय.... बाबाजी ! मी काल येथे आल्यापासून ते अनुभवत आहे. शंभला ही स्वर्गाच्या तुलनेत कुठेही कमी नाही. येथील निसर्ग, पवित्र वातावरण, येथील नागरिक, माझ्या ह्या सख्या सारेच काही स्वप्नवत वाटत आहे. येथे आल्याबद्दल मी स्वतःला नशीबवान समजते आणि तुम्ही तो सन्मान मला देत आहात. मला झालेला आनंद शब्दात नाही सांगू शकत मी!" अवनी भरभरून बोलत होती.

" आपण शंभलाच्या सफरीवर निघण्यापूर्वी थोडी माहिती तू करून घ्यावीस असे मला वाटते... तर चालेल ना?"

" अर्थात .... बाबाजी ! मलाही बरेचसे प्रश्न पडलेले आहे ते मी विचारू शकते काय?"

" हो... का नाही ! तू आहेसच मुळात बुध्दीमान.... मलाही आनंद होईल तुझे शंका निरसन करण्यात. ही एक बौध्दिक चर्चा असेल हे मी जाणून आहे. तुला विज्ञानात अधिक रुची आहे आणि त्यासंबंधी तू अनेक प्रश्न विचारणार आहेस. तू मनावर कसलेही दडपण न आणता विचारू शकतेस! सुरूवातीला मी बोलणार... चालेल?" अखिलेश्वरानंद तिच्या मोहक हस-या चेहऱ्याकडे पाहत मृदू स्वरात म्हणाले.

" बाबाजी... तुम्ही बोला, मी ऐकतेयं!"

" शंभला ही अतिप्राचीन अशी वास्तवातील अदभूत नगरी आहे, पण ही साध्या डोळ्यांनी पाहता येण्यासारखी त्रिमितीतील नगरी नसून अंर्तचक्षुंनी पाहत अनुभवण्याची आहे. येथे काळाचा प्रभाव नगण्य आहे. येथील लोकांचे वय खूपच हळूहळू वाढत असते. येथे वयाची हजार वर्षे उलटून गेलेले अनेक सिध्दयोगी पाहायला मिळतील. येथील एक क्षण म्हणजे पृथ्वीवरील अनेक वर्षे... येथे दिशा, चंद्र, सुर्य यापैकी कशाचेही अस्तित्व नाही. येथे अंतरिक्षातून दिव्य दुधाळ श्वेत प्रकाश येत असतो. येथे दिवस आणि रात्र असे परिमाण नाहीच मुळी. केवळ सोनेरी छटा असलेला दुधाळ धवल प्रकाश म्हणजे दिवस आणि निळसर चंदेरी रंगाचा प्रकाश पसरला म्हणजे रात्र मानायची. त्यास समयाचे बंधन नाही. जसे पृथ्वीवर २४ तासांचा दिवस मानतात. ही चौथ्या आयामातील नगरी आहे ती त्रिमितीत राहणाऱ्यांना या मितीत आल्याशिवाय दिसत नसते. तू आता चौथ्या मितीत वावरत आहेस. तुला शून्य आयामापासून द्विमित, त्रिमित आयाम ठाऊकच असेल. येथे त्रिमित आयामात समय म्हणजे काळ समाविष्ट होत असल्याने येथील सारे काही चौथ्या आयामात घडत असते. काळ जवळजवळ शून्यच म्हणायचा येथे!" 

" हे जरी खरे असले तरी ही शंभला हिमालयातच कुठेतरी अज्ञात स्थानी आहे पण नेमकी कुठे असावी?" अवनीने अखिलेश्वरानंदांच्या शांत गंभीर चेहऱ्याकडे पाहत विचारले.

" शंभला ही कैलास पर्वताच्या आसपास आहे. तिबेटपासून पश्चिमेस सोळा कि.मी. अंतरावर! कैलास पर्वत हा अनेक गूढ रहस्ये पोटात दडलेला एक पिरामिडसदृश्य पर्वत आहे. याच्या परिसरात असे आणखी शंभर पिरामिडस स्थित आहेत. रेडिओ ॲक्टिव्ह लहरींचे या परिसरात सतत उत्सर्जन चालू असते. त्यामुळे कैलास पर्वतावर अजून कोणीही चढाई करू शकलेले नाहीत. ज्यांनी प्रयत्न केला ते कधीच जिवंत परत आलेले नाहीत, म्हणूनच चीन सरकारने त्यावर बंदी घातलेली आहे. अक्षय वैश्विक उर्जेने परिपूर्ण हा पिरामिड म्हणजे परग्रहीय संस्कृतीचे पृथ्वीवर येण्याचे स्थानक आहे. कैलास पर्वताच्या शिखरावर मध्यरात्रीनंतर काही दिव्य ज्योती पाहिल्याचे बरेचजण सांगतात ते दुसरे काही नसून परग्रस्थांची यूएफओज असतात त्यांचा प्रकाश असतो. ती यूएफओज शिखरावरून खाली झेपावून सरळ मानसरोवरात लुप्त होत असतात. अर्थात येथूनच या पिरामिडमध्ये जाण्याचा मार्ग आहे. कैलास पर्वत हा दैवी शक्तीने निर्मित असा आतमध्ये पोकळ असलेला भव्य पिरामिड आहे. गिझा येथील व मेक्सिकोमधील पिरामिडसशी संबधित आहे. हे स्थान विश्वाच्या अगदी बरोबर मध्यभागी आहे. मध्यरात्रीनंतर कैलास पर्वताच्या पोटातून कसलीतरी हालचाल होत असल्याचे आवाज येत असल्याचे तुमच्या संशोधकांनी नमूद करून ठेवलेले आहे. ते आवाज म्हणजे कैलास पर्वताच्या अंर्तभागात अगाथा नावाचे शहर वसलेले आहे, जेथे अवकाशातून पृथ्वीवर येणारी एलियन्सची स्पेसशिप्स प्रवेश करीत असतात, त्यांचे ते आवाज असतात. कैलास पर्वत शिखरभाग हा एक असा ॲक्सेस मोड बिंदू आहे जेथे धरती व आकाश एकमेकांशी येऊन मिळतात. याच बिंदूवर अलौकिक वैश्विक शक्ती एकवटलेली आहे. येथील जबरदस्त रेडिओ ॲक्टिव्ह किरणोत्सर्जामुळे याच्या जवळपासही कोणी पोहोचायची हिंमत करू शकत नाही, एकाअर्थी भगवान शिवांनी जनसामान्यांना कैलासावर चढाई करण्यापासून दूर ठेवले आहे आणि येथील रहस्ये अज्ञातच राहावी असाही हेतू असू शकतो. ॲक्सेस मोड बिंदूभोवती एकवटलेल्या अगाध वैश्विक शक्तीमुळे एलियन्स स्पेसशिप्सना येथून पृथ्वीवर लॕण्डिंग करणे सोपे जाते. याशिवायही या पर्वताखाली असलेल्या आगाथा शहरात स्पेसशिप्स घेऊन आलेल्या परग्रहस्थ संस्कृतीची काहीतरी गूढ संशोधनपर व त्यांच्या अंतरिक्ष यानांच्या दुरुस्तीची कामे चालत असतात. मोठमोठाल्या अवजड वस्तू सरकवल्यासारखेही आवाज रात्रीच्या वेळेस तेथे बाहेरून ऐकायला मिळत असतात. अतिशय गूढ असा कैलास पर्वत अनेक गुपिते आपल्या पोटात दडवून अनादी काळापासून या भूमीवर उभा आहे. या परिसरात सतत ॐ मंत्राचा नाद निनादत असतो. ही देखील एक वैश्विक शक्ती आहे ज्याचा उपयोग करून परग्रहस्थ सभ्यता अवकाशप्रवास म्हणजे कालप्रवास करून पृथ्वीवर येत असतात. साक्षात महादेवाचे निवासस्थान असलेला कैलास पर्वत म्हणजे पायरा वास्तू हे अक्षय वैश्विक शक्तीचे स्त्रोत आहे!"

" हो... मी वाचले आहे कैलास पर्वताच्या रहस्याविषयी पण याच परिसरात आपण आता आहोत असे म्हणायला हरकत नाही?"

" बरोबर आहे तू म्हणतेस ते! पण शंभला ही चौथ्या आयामात असल्याने तिचे स्थान गुप्त राहिलेले आहे. पराकोटीच्या अध्यात्मिक उंचीवर पोहोचलेले साधकच येथे येऊ शकतात. तुम्ही समजता की कित्येक ऋषी - मुनी तप करायला हिमालयात निघून जातात म्हणजे ते काही बर्फाच्या पर्वतरांगांमधील कडे - कपारीत, गुफांमध्ये बसून तप करतात असे नसून ते शंभलात येतात व इथे साधनेत लीन राहून हजारो वर्षे जगतात. आपण योग सिध्दाश्रमात जाऊ तेथे तू त्यांचे दर्शन घेऊ शकशील!"

" तुमच्या सारखे अजूनही बरेच साधक शंभलात असतील ना ?" अवनीने विचारले.

" येथे सिध्द रामावतार, श्यामाचरण लाहिडी, रामकुमार, कविराज, स्वामी विशुध्दानंद, नारायणदत्त यासारखे अनेक योगसिध्दीच्या पूर्णत्वाला पोहचलेले अनेक साधक आहेत. इथे राहून ते पृथ्वीवासीयांची सेवा करतात. अवकाशगमन करून पृथ्वीवर येतात व लोकांना मार्गदर्शन करतात, अनेक सिध्द जडीबुटी देऊन रोगनिवारण करीत असतात. बाह्य जगातूनही आवश्यक त्या वस्तू म्हणजे वस्त्र प्रावरणे इ. येथे घेऊन येत असतात. जे लोक या नगरीत येण्यास लायक आहेत त्यांना येथे वास्तव्याचा लाभही करून देतात!"

" हे तर खूपच चांगले कार्य करत असतात येथील सिध्द! शंभलाचे अस्तित्व कधीपासून आहे?"

" ऋग्वेदात सिध्दाश्रमाचे वर्णन आलेले आहे म्हणजे किती प्राचीन नगरी आसावी तू कल्पना करू शकतेस. रामायण - महाभारतकाळातही याविषयी उल्लेख आलेले आहेत. पवनसुत हनुमानजी, योगीराज दतात्रयही येथे चिरंजीवी स्वरूपात वास करून आहे तसेच महर्षी विश्वामित्र, अगस्त्य, पुलत्स्य, कणाद, गोरक्षनाथ, आदी शंकराचार्य इ. ऋषी येथे कायमस्वरूपी निवास करतात. महाभारतातील कौरव - पांडवांचे युध्द संपल्यानंतर वानप्रस्थाश्रमात जेव्हा पांडव निघाले तेव्हा केदारनाथच्या पुढे भारतीय सीमेवरील हल्लाच्या माणा गावापर्यंत येऊन पोहचले होते. येथूनच स्वर्गारोहणाची कामना धरून शंभलाच्या शोधात पुढील पर्वतरांगा ओलांडून येऊ लागले. तेव्हा एक एक पांडव आतिश्रमाने कोसळून पडू लागला. अर्थात त्यांचे पुण्य कमी पडले असे म्हणायला हवे. तर नकुल, सहदेव, भीम, अर्जुन व द्रौपदी यापैकी कोणीही शंभलापर्यंत पोहोचू शकले नव्हते. अपवाद केवळ धर्मराज युधिष्ठिर व त्याचा कुत्रा हे सदेह शंभलात पोहोचले होते. येथून त्यांना स्वर्गात घेऊन जाण्यासाठी पुष्पक विमान येथे आले आणि युधिष्ठिराने त्याच्या कुत्र्यासह सदेह स्वर्गारोहण केले होते. यावरून किती प्राचीन असली पाहिजे ही शंभला तुला कल्पना येईल!"

" ओहss माय गॉड ... थेट रामायण- महाभारतकालीन प्राचीन नगरी म्हणायची तर ? पण या शंभला नगरीस बाह्य जगताने शोध घेण्याचा प्रयत्न केला नव्हता का ?" अवनी डोळे विस्फारून पाहत म्हणाली.

" येथे अंतरिक्षातून पडलेल्या चिंतामणी रत्नाची महती हिटलरपर्यंत जाऊन पोहचाली होती. हा सर्व इच्छा पूर्ण करणारा चिंतामणी मिळविण्यासाठी हिटलरने जर्मन सैन्याच्या तुकड्या ह्या ठिकाणी पाठवल्या होत्या, परंतु जंग जंग पछाडून सुध्दा या ठिकाणाचा मागमूसही लागला नव्हता. चीनचा कम्युनिस्ट नेता माओ त्से तुंग यालाही अमरत्व प्राप्त करून देणाऱ्या शंभलाची कुणकुण लागताच त्याने १९५० साली तिबेटवर आक्रमण करून संपूर्ण तिबेट ताब्यात घेतला. त्याच्या सैन्यानेही अथक परिश्रम घेत हे स्थान शोधण्याचा प्रयत्न केला पण त्यात यश आले नाही. मात्र एक गूढ रीत्या या भागात वावरत असलेला लामा साधू दिसला. त्याचा पाठलाग करायला सुरूवात केली तेवढयात तो अदृश्य झाला. पण तो भारताच्या दिशेने जात असल्याचे पाहून शंभला त्या दिशेलाच असली पाहिजे असे समजून १९६२ साली भारताशी मैत्रीचा हात पुढे करून हिंदी - चीनी भाई भाई म्हणत असलेल्या चीनने धोक्याने भारताशी युध्द पुकारले. त्यावेळी तिबेट सीमेला लागून असलेल्या अरुणाचल प्रदेशाच्या ब-याच मोठ्या भूभागावर आपला कबजा केला होता. तो भाग आजही अक्साई चीन म्हणून ओळखला जातो, पण शेवटपर्यंत शंभलाचा ठावठिकाणा चीनी सैन्याला लागला नाहीच. दुसऱ्या महायुध्दाच्या वेळेस दोन जर्मन युध्दकैदी पळून या भागात आले होते. शंभलावासीयांनी त्यांना आश्रय दिला होता. काही वर्षानंतर येथून निघून येत हे दोघेही जर्मन सैनिक भारतात निघून आले व आपले अनुभव साप्ताहिक हिंदुस्थान या वर्तमानपत्रातून सलग लेखमाला लिहित संपूर्ण जगाला शंभलाविषयी माहिती दिली होती. असे नंतर बरेचसे संशोधक या भागात घिरट्या घालत फिरत होते, पण कधीतरीच कोणीतरी सिध्दयोगी एका विशिष्ट स्थानावर बसलेला आढळला. त्याला विचारण्यासाठी ते पुढे येणार तेवढ्यात तो योगी अदृश्य झाला. नंतर तो कधीही त्याभागात पुन्हा दिसला नाही!" महावतार बाबाजी अखिलेश्वरानंद आपले अनुभव अवनीला सांगत होते. अवनी अनिमिष नेत्रांनी त्यांच्याकडे पाहत एकेक शब्द कानात साठवून ऐकत होती.

-------------------------------------------------  

     शंभला रहस्य भाग-- ५


" अवनी ... आता आपण निघू या का ?" अखिलेश्वरानंदांनी त्यांचे बोलणे ऐकण्यात गुंग झालेल्या अवनीला भानावर आणत विचारले.

" हो चालेल... पण आपण कसे जाणार आहोत .... म्हणजे पायीच जाणार का? इथे मला तर एकही वाहन दिसले नाही म्हणून विचारते आहे!" अवनीने भीतभीतच विचारले. त्यावर अखिलेश्वरानंद मोठ्याने हसून तिच्या निरागस चेहऱ्याकडे पाहू लागले.

" अवनी... तू आता चौथ्या आयामात वावरत आहेस. येथे काळ थांबलेला आहे म्हणजे वेळेचे अस्तित्व नाहीच. तर आपण सहज विनाविलंब एका ठिकाणाहून दुसरीकडे जाऊ शकतो. आम्हा लोकांना अवकाशगमन सिध्दी प्राप्त आहे. तू माझा हात धर आणि डोळे मीट.... पुढच्याच क्षणाला तू स्वतःला सिध्दाश्रमात उभी असलेली पाहशील !" अखिलेश्वरानंद राजभवनातून अवनीला सोबत घेऊन बाहेर पडले. तिचा हात हात हातात धरून डोळे मिटून अष्टमहासिध्दीपैकी ईशित्वा सिध्दीस आवाहन केले. अवनीनेही त्यांच्या शेजारी उभी राहत डोळे मिटले. तिचे शरीर हळूहळू हलके होत जात असल्याचे भासत पाय जमिनीवरून सुटून वर उचलले जात असल्याचे जाणवू लागले. अवनी त्यांच्यासह कलाप शहरावरून उड्डाण घेत आकाशमार्गाने जाऊ लागली. शंभला नगरीस अष्टदिशांनी वेढून उभ्या असलेल्या व झाडाझुडुपांनी हिरव्यागार दिसत असलेल्या पर्वतरांगाच्या पायथ्याशी अखिलेश्वरानंद व अवनी आकाशमार्गाने येत उतरले. बाबाजी अवनीला माहिती देत सांगत होते की ते आता सिध्दाश्रम म्हणजेच ज्ञानगंज आश्रम परिसरात आलेले आहेत. येथे सपाट मैदानी प्रदेशात हिरवीगार उंच झाडे असलेला वर्तुळाकार मोठा भूभाग होता. त्या भागात मोकळ्या जागेवर कितीतरी पर्णकुटी उभारलेल्या दिसून आल्या. उंच पर्वतरांगांनी घेरलेला सुंदर परिसर पाहून अवनी हरखून गेली. अखिलेश्वरानंद एका मोठ्या पर्णकुटीबाहेर येऊन थांबले व बाहेरूनच त्यांनी प्रमुख योगी सिध्दाश्रमाचे प्रमुख श्यामाचरण लाहिडींना साद घालून ते आल्याचे सांगितले. धडधाकट बांध्याचे, श्वेत वस्त्र धारण केलेले, पांढरी दाढी लांब वाढवलेले श्यामाचरण अखिलेश्वरानंदांचे स्वागत करण्यास कुटीबाहेर आले. अवनीसह त्यांना आदरपूर्वक सत्कार करून पर्णकुटीत बोलाविले. आसनावर बसत अखिलेश्वरानंदांनी अवनीबद्दल थोडक्यात सांगून तिला सिध्दाश्रमाची माहिती देण्याची त्यांना विनंती केली. योगी श्यामाचरण अवनीला सिध्दाश्रमाविषयी सांगू लागले.

" या सिध्दाश्रम परिसरात पर्णकुटी उभारलेल्या दिसताहेत त्यामध्ये विविध विषयांवर अध्ययन करण्यासाठी बरेच तरुण योगी साधक विद्याग्रहण करीत आहेत. काही कुटीमध्ये हिमालयात मिळणाऱ्या दुर्लभ जडी - बुटींपासून दिव्याषौधी बनविण्याचे काम चालते. येथील दिव्याषौधी बाह्य जगतामधील लोकांच्या मागणीनुसार आम्ही पुरवत असतो तेही विनाशुल्क! ही एक जनसेवाच आहे. कित्येक धर्मग्रंथांचे अध्ययन व संशोधनात्मक कामही येथे चालते. आपण हवंतर बाहेर जाऊन एक फेरी मारून येऊ म्हणजे ज्ञानगंज आश्रमाची कल्पना तुला येईल!" 

" मला आवडेल माहिती करून घ्यायला... चलावे बाबाजी !" अवनीने इच्छा प्रदर्शित करताच श्यामाचरण दोघांना बाहेर घेऊन आले व संपूर्ण आश्रम संकुलात फिरवून माहिती देत राहिले. अवनीचे समाधान झालेले होते. तिने अखिलेश्वरानंदांना सिध्द योग आश्रमाकडे जायचे असल्याचे सांगितले. योगी श्यामाचरणजींचा निरोप घेऊन अखिलेश्वरानंदांनी अवनीला सोबत घेऊन सिध्द योग आश्रमाकडे प्रयाण केले.  

            सिध्दाश्रमाच्या जवळच पर्वतरांगांमधील गुफांमध्ये योगसिध्दाश्रम स्थित होता. गिरीकंदरातील असंख्य गुहेमध्ये साधना करीत बसलेले तपस्वी ध्यान लावून समाधीवस्थेत गेलेले दिसत होते. कृश देहाचा केवळ सापळा झालेले व त्वचा ओघळून खाली उतरलेली शरीरे समाधी लावून दुसऱ्या जगात विहार करीत होते. ब-याचशा गुफा मात्र कायमस्वरूपी बंद असल्याचे दिसून आले. तेथे पूर्णत्वाला पोहोचलेले पराकोटीचे उच्च साधक हजारो हजारो वर्षांपासून साधनेत लीन असल्याचे अखिलेश्वरानंद अवनीला सांगत होते. कित्येक आश्रमात योगविद्येचे धडे दिले जात साधकांना मार्गदर्शन केले जात होते. योगसिध्दाश्रमाचे प्रमुख परमयोगी विशुध्दानंद यांना अखिलेश्वरानंद भेटले व आपल्या येण्याचा हेतू सांगितला. त्यांनी अवनीकडे पाहत मंदस्मित केले व सांगू लागले.   

" या योग सिध्दाश्रमात संपूर्ण योग, हठयोठ, कुंडलिनी जागरण व हठयोगाद्वारे अष्टमहासिध्दींना प्रसन्न करून घेण्याबद्दल शिक्षण दिले जाते. त्याशिवाय इतरही सिध्दींची, अनेक गूढ विद्यांची प्राप्ती करून घेणारे योगसाधक निरंतर योगसाधनेत लीन राहतात. साधारण ध्यानधारणेपासून ते समाधीवस्थेपर्यंत जातीने लक्ष घालून उच्चा कोटीचे साधक तयार केले जातात. संपूर्ण जगातील एकमेवाद्वितिय असा हा सिध्दाश्रम आहे. फारच थोड्या भाग्यवंतांना याचा लाभ घेता येतो. मला वाटते अवनी तू सुध्दा योगविद्येत पारंगत होऊन सिध्दी प्राप्ती करून घ्यावीस. ज्यायोगे तू अखिलेश्वरानंदांसोबत सूक्ष्म शरीर धारण करून ब्रम्हांडाचा अभ्यास करण्यासाठी सिध्द विज्ञानाश्रमात त्यांना सहकार्य करू शकतेस!" 

" हो.. असे झाले तर मला आनंदच होईल... पण मी याविषयी केवळ महावतार बाबाजींसोबत बोलणार आहे. मला वाटते आता सिध्द विज्ञानाश्रमात जायला हवे.... येथे मी नंतर कधीतरी येईनच.... तूर्तास जाण्याची परवानगी मिळावी!" अवनीने हात जोडून स्वामी विशुध्दानंदांना विनंती दिली. त्यावर त्यांनी सहमतीपर मान हलवून परवानगी दिली. अवनी घाईघाईने अखिलेश्वरानंदांना हाताला धरून योगसिध्दाश्रमातून बाहेर पडली.

" अवनी.... काय झाले ? तू अशी अस्वस्थ का ?"

" बाबाजी खरे तर योग शिकण्यासाठी मला हजारो वर्षे या आश्रमात तपश्चर्या करीत घालवायची नाहीत.... मला विज्ञानाश्रमात घेऊन चला.... तेथे मला काल प्रवासाबद्दल खूप काही जाणून घ्यायचे आहे. मला भौतिकशास्त्राची आवड असून मला ब्रम्हांडाच्या रहस्याविषयी खूप काही जाणून घ्यायचे आहे. मला वाटते माझ्या सर्वच प्रश्नांची उत्तरे तुमच्याकडे मिळतील. जेणेकरून मी येथून बाहेरील दुनियेत जाऊन लोकांना नवी माहिती देऊ शकेन!"

" अवनी.... मी तुला सिध्दाश्रमात कायम राहण्यासाठी आमंत्रित केले आहे. देवानांही हेवा वाटावा अशी आमची शंभला नगरी आहे. येथून आम्ही अंतरिक्षातील दुसऱ्या ग्रहांवरील सभ्यतेशी संपर्क साधून माहितीचे आदान प्रदान करीत असतो. या कामासाठी मला तुझी गरज होती... पण तूच आता येथून जायच्या गोष्टी करीत आहेस?" बाबाजी निराशेच्या सूरात अवनीकडे हतबल होऊन पाहत बोलत होते.

" मला माफ करा बाबाजी... पण हे माझे क्षेत्र नाही आणि मला बाहेरील दुनियेत बरेच काही करून दाखवायचे आहे. माझे तर अजून लग्नही झालेले नाही. कोणीतरी माझी एयरबेसवर वाट पाहत चिंतेत पडला आहे. बाबाजी मला संसाराचा आनंद घेऊ द्या... एवढ्यात मला योगिनी नका हो बनवू!" अवनी मुसमुसून रडत म्हणाली. 

          तिला तिच्या दुनियेत परत जाण्याची ओढ लागलेली तिच्या भावगंभीर डोळ्यात स्पष्ट दिसत होती. बाबाजी तिला योग सिध्दाश्रमाबाहेर घेऊन येत आता शेवटचा टप्पा सिध्द विज्ञानाश्रमात जाण्याचा बाकी होता तो संपवून तिला तिच्या दुनियेत परत पाठविण्याचा विचार करू लागले. तिने बाबाजींचा हात पकडला व डोळ्यांनी खुणावले. बाबाजी तिच्यासह विज्ञानाश्रमाकडे आकाश मार्गाने उडत जाऊ लागले. काहीच क्षणात अवनीने डोळे उघडले तेव्हा ती पर्वतरांगाच्या मधील खोलगट भागात उभी असल्याचे पाहिले. समोर लांबलचक व उंच रंगीबेरंगी काचेच्या छतांनी शाकारलेल्या शेडस दिसत होत्या. हाच सिध्द विज्ञानाश्रम असल्याचे बाबाजींनी तिला सांगितले. दोघेही एका मोठ्या शेडखाली येऊन थांबले. हे एक नियंत्रण कक्ष भासत होते. तेथे बरेचसे श्वेत वस्त्रधारी लोक आपआपल्या कामात गर्क होते. कॉम्प्यूटरसदृश्य मोठमोठ्या काचेच्या स्क्रीनवर अगम्य अशा लिपीतील, सांकेतिक खुणांमध्ये भरलेला डाटा सरसरत वरून खाली जात धावत होता. कितीतरी प्रकारची उपकरणे, रडारसारख्या मोठाल्या तबकड्या अवकाशातील संदेश ग्रहण करीत ते उलगडून स्क्रीनवर झळकत होते. मोठमोठाल्या दुर्बिणींच्या नळ्या शेडबाहेर पडून आकाशाकडे तोंड उंचावून लावलेल्या होत्या. अवनी सुसज्ज कंट्रोल रुम पाहून थक्क झाली. शंभलात एवढे मोठे अवकाश संशोधनाचे काम चालत आसावे या विचाराने ती हरखून गेली होती. अखिलेश्वरानंद तिला माहिती सांगू लागले.

" अवनी अंतरिक्षातून कालप्रवास करायचा म्हणजे चौथ्या आयामातूनच जावे लागते. एकतर इथे टाईम व स्पेस दोन्हीही पूर्णपणे थांबलेले असतात म्हणजे अगदी स्टँडस्टिल. टाईम व स्पेस यांचे परस्पर विरोधी बलाबल समसमान होऊन ते एकमेकांत कोसळून शून्यवत होतात. याच निर्माण झालेल्या शून्य हायपर स्पेसमधून क्षणार्धात अंतरिक्षातील अनंत अंतरावर कुठल्याही ग्रहावर पोहचता येते!"

" बाबाजी तुम्ही सांगत आहात ते सारे माझ्या डोक्यावरून जात आहे. काहीसुध्दा कळले नाही. मला आधी आयामाबद्दल स्पष्ट करून समजावून सांगा।" अवनी गोंधळून जात बाबाजींकडे पाहत म्हणाली.

" हो खरंच की... माझ्या लक्षातच आले नव्हते. ठीक आहे आधी आयाम समजून घे म्हणजे ब्रम्हांडाविषयी कल्पना येईल. तर दहा आयामांपर्यंत मी समजावून सांगू शकेन पण असे एकूण चौसष्ट आयाम ब्रम्हांडात स्थित आहे. त्यापैकी परग्रहस्थ सभ्यतेला केवळ सव्वीस आयाम माहित आहे. आपल्याला त्याची कल्पना करता येणेही अशक्य आहे, त्यासाठी असाधारण बुध्दीमत्ता असायला हवी. इथे विज्ञानाश्रमात दहाव्या आयामापुढील आयामांचा अभ्यास चालू आहे. येथे तुझ्यासारखे संशोधन करणारे निष्णात स्पेस साईंटिस्ट याच प्रोजेक्टवर काम करीत आहे. ब्रम्हांडाचे रहस्य आम्हालाही अजून उलगडलेले नाही पण आमचे अथक प्रयत्न चालू आहेत. तर आयामाविषयी आपण आता बोलू या का?"

" हो... मला त्याविषयी समजून घ्यायला निश्चितच आवडेल... तुम्ही बोलत राहा मी ऐकते!" अवनी आनंदून जात उत्साहाने म्हणाली.

" तुला शून्य आयाम म्हणजे केवळ एक बिंदू असून तो एका ठिकाणी कैद होऊन पडलेला असतो म्हणजे पुढे- मागे वगैरे अजिबात हालचाल नाहीच. द्विमित आयाम म्हणजे केवळ लांबी आणि रुंदी एखाद्या चित्राप्रमाणे आणि फक्त पुढे आणि मागे एवढीच हालचाल होऊ शकते. त्रिमित आयामामध्ये लांबी - रुंदीच्या जोडीला उंची व खोली असेल... थोडक्यात तुमची दुनिया! आता वळू या चौथ्या आयामाकडे. इथे लांबी-रुंदी- खोली या त्रिमितीशी काळ म्हणजे टाईम जोडला जात चौथा आयाम बनत आहे. जो आता या ठिकाणी म्हणजे संपूर्ण शंभलावर प्रभावित आहे. यामुळे आपल्याला भूत- वर्तमान- भविष्य यांचे ज्ञान होत असते. आपण काळामध्ये एका सरळ रेषेत जात आहोत. थोडक्यात हा काळ एका बिंदूपासून सुरू होऊन अनंत अंतरापर्यंत जात आहे. पाचव्या आयामात आपण काळाच्या सरळ रेषेत जाण्याबरोबर डावी - उजवीकडे जाऊ शकतो. याचे एक उदाहरण सांगतो, कल्पना कर की तुला पायलट व्हायचे होते आणि त्याबरोबर तू शास्त्रज्ञही बनू पाहत होती. तर चौथ्या आयामात तू केवळ पायलटच बनत होतीस पण पाचव्या आयामात तू पायलटबरोबर शास्त्रज्ञही बनणार आहेस. म्हणजे काळाबरोबर तू सरळ जात डावी - उजवीकडे वळू शकतेस या नियमाप्रमाणे ! पण यामध्ये एक समातंर विश्व कार्यरत असते, एकामध्ये तू पायलट तर दुसऱ्यामध्ये शास्त्रज्ञ पण हे दोन्हीही विश्व वेगवेगळे असतील!"

" हो बाबाजी.... कळले मला तुम्हाला काय सांगायचे आहे ते.... आता सहाव्यात काय होईल!"

" अवनी तू पूर्वीच्या दोन्हीही विश्वांमध्ये एक सेलिब्रेटी बनलेली असते. तर या समातंर विश्वातील तुझी प्रतिरूपे जर एकमेकांना भेटू पाहत असतील तर याचे दोन मार्ग आहेत. एक म्हणजे पायलटचे प्रतिरूप कालप्रवास करून मागे येईल जेथे दोन्हीही क्षेत्रात तू करियर करू इच्छिते आहेस. तेथून भविष्यातून आलेले शास्त्रज्ञाचे प्रतिरूपासह पुढे जात राहशील.एक वेळ अशी येईल की तुझे पायलटचे प्रतिरूप शास्त्रज्ञाचे प्रतिरूप बनलेले असेल, दोन्हीही प्रतिरूपे तेथे भेटतील... पण यासाठी बराच वेळ जावा लागेल. दुसरा मार्ग म्हणजे पायलटचे प्रतिरूप समययात्रा करून मूळ स्थानी येत असेल व तेथे तू दोन्ही प्रतिरूपाचा विचार करीत असेल तर पायलटचे प्रतिरूप सरळ शॉर्टकट घेऊन शास्त्रज्ञाच्या प्रतिरूपाजवळ येऊन पोहोचलेले असेल.जेथे तू आधीच शास्त्रज्ञ म्हणून सेलिब्रेटी बनलेली आहेसच. दोन्ही प्रतिरूपे एकमेकांशी भेटतील. तर हे असे सहाव्या आयामात होत असणार आहे!"

" बाप रेss बाप ! काय पण सुपर आयडिया आहे म्हणायची ना !" अवनी हर्षाने मोहोरून उठत म्हणाली.

" तुला माहितच आहे की हे सर्व आयाम अनंत म्हणजे इन्फानाईट आहेत जसा टाईम भविष्यात अनंत आहे.याची लांबी- रुंदी- खोलीही अनंतच राहणार आहे, आता कल्पना कर की सातव्या आयामात आपले ब्रम्हांड हे केवळ शून्य आयामाने बनले आहे जे एका ठिकाणी कैद होऊन पडले आहे. त्यात आता सहाही आयाम कार्यरत आहेत ज्यामधून आपण अनंत अंतरापर्यंत कुठेही जाऊ शकत होतो. आता जरा दुसरा विचार कर की आपल्या ब्रम्हांडाप्रमाणे दुसरेही एक ब्रम्हांड आहे ज्यामध्ये सारे भौतिकी नियम आपल्या ब्रम्हांडापेक्षा वेगळे आहेत पण ते सुध्दा शून्य आयामात कैद आहेत म्हणजे स्टँडस्टिल! जर आपण आपल्या शून्य आयामातील विश्वामधून दुसऱ्या शून्य आयामातील विश्वात जात असू तर जो मार्ग दोन्हीही विश्वांना जोडत आहे त्यास सातवा आयाम म्हणायचा!"

" थोडे कठीणच होते समजायला पण आता हळूहळू डोक्यात उतरत आहे. यापुढे काय.... आठवा आयाम ना ?" अवनीने डोक्याला ताण देत विचारले.

" दुसऱ्या आयामात आपण जसे पुढे- मागे जाण्याबरोबर डावी- उजवीकडे जाऊ शकत होतो. त्याचप्रमाणे डावी - उजवीकडे जात आपण तिसऱ्याच एका विश्वाशी संपर्क करीत आहोत. त्यास आठवा आयाम म्हणतात. आता तिसऱ्या आयामात आपण वर- खाली व पुढे- मागे, डावी- उजवीकडे जात होतो.

 त्याचप्रमाणे एका वेगळ्याच विश्वात जात असू तर तो नववा आयाम ठरत असेल. तसेच चौथ्या आयामात समय पुढे जात होता तर तो आता पुढे - मागे, वर- खाली जात कुठेही जात असेल तर हे दहाव्या आयामात शक्य होत आहे!" 

" बाप रेss संपले वाटते दहाही आयाम ! अजून काही जास्त सांगू शकाल ?"

" स्ट्रिंग थिअरीप्रमाणे हे दहा आयाम मानले आहेत तर एम थिअरीनुसार हे अकरा आहेत. समातंर विश्वाविषयी बोलतांना आपल्या मनात ज्या घटनांचा विचार चालू असतो बरोबर त्याच घटना दुसऱ्या समातंर विश्वात तशाच घडत असतात!"

" बाबाजी... आपण आपण आणखीही काही हायर डायमेंशन्समध्ये जाऊ शकतो काय ?"

" अवनी.... तुझा प्रश्न बरोबरच आहे पण येथे एक समस्या आहे. हायर डायमेंशन्समधून फक्त एक गोष्ट जाऊ शकते ती म्हणजे केवळ एक डायमेंशन असलेली! आपले शरीर हे त्रिमितीत बनले आहे. त्याचा सूक्ष्मातिसूक्ष्म बिंदू म्हणजे परमाणु म्हटला तरी त्या त्यात केंद्रात प्रोटॉन+ न्युट्रॉन असतील व इलेक्ट्रॉन त्याभोवती फिरत असेल म्हणजे वन डायमेंशन होऊ शकत नाही ना? अर्थात ते त्रिमित असेल. तेवढ्याचसाठी आम्ही योगविद्येद्वारे शरीरास अणूसम सूक्ष्म करुन अत्यंत सूक्ष्म अशा कृमिविवरातून कालप्रवास करण्याचे प्रयोग करीत आहोत. अजून आम्हाला यश मिळालेले नाही पण भविष्यात आम्ही कालप्रवास करून दुसऱ्या ग्रहावरील संस्कृतीस अवश्य भेट देऊच!"

" तुमच्या कार्यक्रमास माझ्या शुभेच्छा राहतील! तुम्ही आतापर्यंत दुसऱ्या कोणत्या ग्रहवासियांशी संपर्क साधलेला आहे ?"

" वृषभ राशीतील कृत्तिका तारकासमूहातील ऐर्रा ग्रहावरील मानवजातीशी आमचा संपर्क झालेला आहे. त्यांच्याशी आमचे बोलणे यापूर्वी झालेले आहे. टेलिपथीद्वारे आम्ही त्यांच्यासोबत कम्युनिकेशन्स करीत असतो. लवकरच आमचा कालप्रवासाचा मार्ग मोकळा होईल. मला तुझी मदत एवढ्याचसाठी हवी होती की तू कालप्रवास करून त्या ग्रहावरील संस्कृतीचा अभ्यास करून आमच्या ज्ञानभांडारात भर घालशील! असो पण आता तुला आम्ही पुन्हा तुझ्या एयरबेसवर सुखरूपपणे पोहोचवून देऊ तेही कालप्रवासात मागे येऊन पृथ्वीवर चालत असलेल्या वेळेमध्ये बसवून देऊ. जसे अगदी तू काल एयरबेसवरून गायब झाल्यानंतर चौथ्या दिवशी पोहचणार आहेस. तू आज- उद्या राजभवनामध्ये आराम कर... परवाला तुझ्या दुनियेत तू असशील !"

" बाबाजी.... मी तुमचे आभार कसे मानू तेच कळत नाही बघा! तरीही मनापासून मी तुम्हाला धन्यवाद देत आहे!" अवनीने त्यांचे आभार मानून हात पकडला. दोघेही आकाशमार्गाने राजभवनाच्या दिशेने उडत जाऊ लागले.

-------------------------------------------------- 

       शंभला रहस्य भाग -- ६


" अरीं अवनी डियर तू थी कहाँपर? चार दिन बीत चुके... तुम्हारा कहीं भी आतापता ही न था।" अवनीची सहकारी हरविंदर कौर तिला विचारीत होती.

         आज पहाटेसच अवनी तवांग एयरबेसवर येऊन हजर झाली होती. महावतार बाबाजी अखिलेश्वरानंदांनी तिला सरळ शंभलातून बाहेर काढून तिच्या दुनियेत सुखरूप परत आणून सोडले होते. खरंतर शंभलामधून पाय निघत नव्हता. खूप जीवावर आले होते तेथून बाहेर पडतांना... पण हा निर्णय तिचा स्वतःचा होता. तिला त्या अदभूत दुनियेत अडकून पडायचे नव्हतेच. तिच्या जीवनाचा उद्देश तो नव्हता. एका विशिष्ट उमेदीने ती भारतीय वायुसेनेत पायलट म्हणून रूजू झाली होती. देशसेवेबरोबर काहीतरी करून दाखविण्याची उर्मि तिला स्वस्थ बसू देणार नव्हती. शंभला सोडतांना तिच्या तेथील सख्यांनी व शंभलाचे शासक कुलिक राजे रुद्रचक्रांनी तिला साश्रू नयनांनी निरोप दिला होता व आवर्जून सांगितले गेले की पुन्हा कधीही शंभलात यायची इच्छा प्रदर्शित केल्यास फक्त टेलिपथीने बाबाजींशी संपर्क करायचा. त्यांचे मनात स्मरण करताक्षणी तिचा संदेश त्यांना पोहचणार होता. तिला शंभलात घेऊन जाण्यासाठी ते कमानीजवळ त्यांची माणसे पाठवणार होते पण आता नकोच तिथे जायला! अवनी आपला पूर्वीचा भारतीय वायुसेनेचा युनिफॉर्म अंगावर चढवून शंभलातून निघून बाबाजींसोबत आकाश मार्गाने एयरबेसवर उतरली होती. महावतार बाबाजींचा निरोप घेऊन सरळ आपल्या बॕरककडे धावत सुटली होती. तिची सहकारी कॕप्टन हरविंदर अजून गाढ झोपेतच होती. अवनीने तिला झोपेतून जागे करीत ती परत आल्याचे सांगितले. हरविंदरच्या आश्चर्याला पारावारच रहिला नाही. तिने अवनीला कडकडून मिठी मारली व रडत रडत तिच्याशी बोलू लागली.

" अरे यार.... हम तों समझ बैठे थे कि शायद तुम्हारा प्लेन... ? तुम्हें हमेशा के लिये हम खो बैठे थे। आकाश का हाल तों बहुतही बुरा था.... तुम्हारी याद में बस रोये जा रहा था।"

" अरे क्या बताऊ यार.... उस चीनी एयरक्राफ्ट का पीछा करते मैं हिमालयीन रेंजेस में पता नहीं कहां खो गई .... और एक अलग ही दुनिया में जा पहुँची, जिसे शंभला के नाम से जाना जाता है। लेकिन तू अब रोना धोना बंद कर.... मैं आ गई हूँ ना ? चलो अपने पूरे कोरम से मुलाकात करते है।" अवनीने हुरळून जात हरविंदरला हाताने धरून टेन्टच्या दारापाशी खेचतच आणले. 

     अवनी सर्व सहका-यांना भेटायला उत्सुक झाली होती. कधी एकदा आपला अदभूत अनुभव त्यांच्या कानावर घालते असे झाले होते. तसे आता पंधरा मिनिटात सर्वच मेसमध्ये नाश्त्यासाठी एकत्र भेटणारच होते. अवनी हरविंदरला सोबत घेऊन मेसच्या दिशेने धावत सुटली. आकाश तिथे भेटणार होता. त्याला मिठी मारून सारेकाही सांगून परत आल्याचा आनंदोत्सव साजरा करण्याच्या कल्पनेने ती अधीर झाली होती. मेसमध्ये त्यांचे कोअर चीफ विंग कमांडर सुरजितसिंहही हजर असणार होते. तसे तिला परतायला फार उशीर झालेला नव्हता.... फक्त चार दिवसच! पण या चार दिवसात काय काय अनुभवले ते सांगितले तर त्यांच्या रिॲक्शन्स काय असतील या कल्पना करीत शब्दांची जुळवाजुळव करीत मेसमध्ये येऊन बसली होती. एकेकजण मेसमध्ये पाऊल ठेवताक्षणी तिथे अवनीला पाहून आश्चर्यचकित होत होता. सर्वजण तिच्याभोवती कोंडाळे करून बसले. तेवढयात विंग कमांडर सुरजितसिंहाची एन्ट्री झाली. त्यांनीही हर्षभराने पुढे येत अवनीशी हात मिळवून तिचे स्वागत केले. अवनी चीनी विमानाचा पाठलाग करीत जात असल्यापासून परत येईपर्यंतचा संपूर्ण वृतांत कथन करीत सांगू लागली. सर्वच संमोहित झाल्यासारखे मन लावून तिची कहाणी ऐकत होते. 

" अवनी मला नाही वाटत.... अशी कोणती शंभला सिटी पृथ्वीतलावर असावी. तुला एखादे स्वप्न वगैरे पडलेले असावे?" कॕप्टन मोहित अविश्वासाने तिच्याकडे पाहत म्हणाला.

" हां... मुझे भी ऐसा ही लगता है, यह सब मनगढन्त कहानी ही है।" सुरजितसिंहही मोहितला साथ देत म्हणाले.

" अवनी तू हे सारे खरे सांगते आहेस ?" आकाशही बेचैन होऊन तिला विचारायला लागला. बाकी चौघेही अवनीकडे साशंक नजरेने पाहत होते. एकदम अवनीच्या रागाचा पारा चढला व तिच्या डोळ्यातून आश्रू वाहू लागले.

" अरे यार ! काय हा मुर्खपणा आहे.... मी एवढी जीव तोडून सांगते आहे आणि तुम्ही आहात की विश्वासच ठेवायला तयार नाहीत! मी कशाला मनाने स्टोरी रचून सांगू? माझ्याबाबत हे घडले आहे आणि खरंच सांगते आहे. तिबेटपासून सोळा किलोमीटर पश्चिमेस खरोखर अशी एक गूढ रहस्यमय शंभला नगरी आहे. साक्षात स्वर्गाची अनुभूती व्हावी एवढी ती सुंदर आहे. अतिशय पवित्र स्थान आहे. तुम्ही हवंतर तवांगच्या लामांना याविषयी विचारून बघा आणि तेथील कालचक्र विज्ञान या ग्रंथात वाचून बघा. खरोखरच पृथ्वीवर शंभला आहे आणि ती फोर्थ डायमेंशनमध्ये स्थित असल्याने सर्वांनाच नाही पाहता येणार! तिथल्या सिध्दांची परवानगी असेल तरच कोणी शंभलात जाऊ शकतो. तिथे कुलिक राजाचे शासन चालते आणि पंचविसावा कुलिक राजा अधिचक्र पृथ्वी नष्ट होत असेल त्यावेळी आपले साम्राज्य पृथ्वीवर प्रस्थापित करून सत्ययुगाची सुरूवात करणार आहे. कधी ते नाही माहित मला.... पण मी आताच्या कल्कि राजास प्रत्यक्ष भेटून आले आहे!" अवनी भडभडून बोलत होती. तरीही सर्वांच्या नजरा तिला विचित्र वाटू लागल्या. ती ठार वेडी झाली आहे अशा भावनेने सर्वच तिच्याकडे पाहत गप्प होते.

" मुझे लगता है, अवनी को किसी साईकोयास्ट्रिक डॉक्टर को दिखाना होगा। लगता है, अवनी चार दिनोंतक किसी बर्फीली चट्टानों के बीच पडी होगी और दिमागपर असर हुवा है।" सुरजितसिंह तिच्या पाठीवर थोपटून इतरांना सांगत होते.

" क्या कहा सरजी आपने....मैं पागल लगती हूँ? जों आप इस तरह बातें कर रह है।" अवनी एकदम भडकून त्यांना जाब विचारू लागली.

" अवनी डियर... शांत हो जा! सब ठीक हो जाएगा.... फिलहाल तुम्हें आराम की सख्त जरुरत है।" हरविंदर तिला जवळ घेऊन अश्रू पुसत म्हणाली.

" ठीक है.... आप मानते हो ना कि मैं बर्फीली पहाडियों में फंसी हुई थी। पर कोई ऐसे ठण्डे वातावरण में जिन्दा रह सकता है? वों भी चार दिनोंतक भूखे- प्यासे रहकर ? मैं तों सही सलामत लौट चुकीं हूँ ... वों भी बाबाजी के साथ आकाश से उडते आकर.... भला चार दिन में कोई तिब्बत से यहां पहुँच सकेगा? है, कोई जबाब आप के पास ?" अवनी चिडून मोठमोठ्याने किंचाळून बोलत होती. 

" अच्छा अवनी .... ये बता की वह चीनी फायटर प्लेन आंखो से ओझल होते ही तुमने लौटने का फैसला क्यों नहीं लिया? क्या जरुरत थी, तिब्बत क्रॉस कर के आगे जाने की?" विंग कमांडर सुरजितसिंह कडक शब्दात तिची हजेरी घेत विचारीत होते. 

" सरजी.... उस रहस्यमयी इलाके में रेडिओ ऐक्टिव्ह एनर्जी फील्ड फैला हुआ है, जिस के कारण प्लेनका कंट्रोल हैंग हो चुका था। मुझे बिल्कुल भी पता ही नहीं चल रहा था कि प्लेन किस दिशा में जा रहा था? वों भी जैसे कोई गुमनाम ताकद उसे खींचते अपने साथ ले जा रही हो... किसी एक अनजान ठिकाने!" अवनी किंचाळून सांगू लागली. तिचे बोलणे संपताच एकच हशा पिकला. तिच्या भोवताली उभे असलेले आकाशला सोडून सर्वचजण मोठ्याने हसून तिच्याकडे पाहत होते.

" क्या कहा.... रेडिओ ऐक्टिव्ह एनर्जी फील्ड... वों भी हिमालयीन रेंजेस में? अवनी अब तो तुम सहीं में पगला गई हो... ऐसा भी कभी होता है? मुझे तो तुमपर शक सा होने लगा है!" विंग कमांडर सुरजितसिंह कुत्सितपणे अवनीकडे पाहत म्हणाले.

         अवनीने आशेने आकाशकडे पाहिले तर तो ही हातावर हात धरून मूग गिळून गप्प बसलेला होता. त्याच्या नजरेतही अविश्वासाचेच भाव दिसत होते. अवनी दोन्ही हातांनी डोके घट्ट दाबून मटकन खाली बसली. इथे एकहीजण असा नव्हता की जो तिच्या सांगण्यावर विश्वास ठेवेल. अवनीचे डोळे भरून येत घळाघळा आसवांच्या धारा वाहत होत्या. 

" अवनी तुम क्या स्पेस साईंटिस्ट हो की टाईम ट्रॕव्हेल कर के दूसरे प्लॕनेटपर जाना चाहती हो.... और दस आयाम जो बता रहीं हो.... यह सब के सब फेक है। जादा सोंचने से तुम्हारे दिमाग में शंभला बस चुकी है। मुझे और कुछ सुनना नहीं है, कल ही तुम्हे तेजपूर के मिलीटरी अस्पताल भर्ती करा दिया जाएगा। फिलहाल अपनी बैरेक में पडें पडें आराम करो..., हां एक बात और इस के बाद तुम्हें कोई भी मिशन नहीं सौंपा जाएगा तबतक तुम ठीक ना हो। कमॉन गाईज लेटस डिस्पर्स नाऊ!" म्हणत विंग कमांडर मेसच्या बाहेर पडले. सर्वजण एकेक करून बाहेर पडले. हरविंदर अवनीला बॕरकमध्ये घेऊन आली. अवनी मनाशीच पुटपुटत धाडदिशी बेडवर पडली व डोळे मिटून घेतले. हरविंदर तिच्या अंगावर पांघरूण घालून बॕरकच्या बाहेर पडली.

" सरss अभी कुछ समय पहले मैंने अवनी को जेट फायटर उडाते टेकअॉफ लेते हुए देखा है। सर अवनी हमारे बेस से दूर जा चुकीं होगी। सर ... वह सच ही कह रही थी, लेकिन किसी ने उस की एक भी नहीं सुनी... आपने भी!" कॕप्टन हरविंदर कौर विंग कमांडर सुरजितसिंहाना रिपोर्ट करीत भल्या पहाटेसच त्यांच्या टेंटमध्ये उभी होती.

" क्या बक रही हो... तुमने जाने कैसे दिया उस गद्दार को ?" सुरजितसिंह मोठ्याने किंचाळून हरविंदरच्या अंगावर धावून जात ओरडू लागला.

" सर...मुझे क्या पता वह ऐसी करनेवाली है। प्लेन की आवाज सुनते ही मैं टेंट से बाहर आयीं तों मैंने देखा रन वे पर से एक जेट फायटर टेक अॉफ ले चुका था और अवनी भी अपने बिस्तरपर नहीं थी। शायद ... नहीं यकिन के साथ कहती हूँ सरजी... अवनी जा चुकी है, वहीं शंभला में!"

" तिघेही पायलटस धावत येत घाईघाईने सुरजितसिंहाच्या टेंटमध्ये शिरले व अवनी मिग 21 जेट फायटर प्लेन घेऊन एयरबेसवरून निघून गेली असल्याचे रिपोर्टिंग करू लागले. आकाश डोक्याला हात लावून स्थितप्रज्ञासारखा पाहत दाराच्या चौकटीला धरून उभा होता. त्याची अवनी त्याला सोडून दुसऱ्या दुनियेत निघून गेलेली होती ती कधी ही परतन येण्यासाठी!"

" अरेss यहां मेरा मुँह देखते क्यूँ खडे हो...जावों अपने प्लेन से उस का पीछा करो और पकड के मेरे सामने हाजिर करो!" सुरजित डोक्यावरचे केस उपटत आरडाओरडा करीत उभा होता.

" सर.... पन्द्रह मिनट से जादा समय हो गया है, अवनी को जाकर.... अब तों उसने तिब्बत क्रॉस कर लिया होगा। कुछ फायदा नहीं सर.... कल ही उस के बातोंपर यकिन किया होता ... तों आज यह नौबत नहीं आती।" कॕप्टन राकेश जरा चढ्या सुरातच म्हणाला. विंग कमांडर सुरजितसिंह चक्कर येऊन धाडदिशी खाली कोसळले. सर्वजण एकमेकांच्या चेहऱ्याकडे निराशेने पाहत होते. सुरजितसिंहांना उचलून स्ट्रेचरवर टाकले गेले. मोहित व राकेश त्यांना प्रथमोचारासाठी डिस्पेन्सरीत घेऊन जात होते.



Rate this content
Log in

Similar marathi story from Horror