Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

अंजली (Anjali) बुटले (Butley)

Abstract

5.0  

अंजली (Anjali) बुटले (Butley)

Abstract

जून्या नव्या नात्यांची घट्ट

जून्या नव्या नात्यांची घट्ट

1 min
8.2K


घट्ट असलेल्या नात्यांची विण हळूहळू विरायला लागतेय !

विरलेल्या नात्यांना ठिगळे लावण्याचा मी मात्र प्रयत्न करते !!


ठिगळे लावलेली जूनी नाती वरवरची 'फसवी' असतात,

असे लक्षात यायला बऱ्याच वेळ लागतो !


नवीन नात्यांकडे काळजीपूर्वक बघितल्यावर,

वाटतं नवीन नात्यांची विण हळूहळू घट्ट होते !!


जशी ऋतुचक्रात बहरलेल्या वृक्षांची 'पानगळ', ' नवी पालवी',ठरलेलीच असते !

तशीच ही जून्या नव्या नात्यांची घट्ट विण असते !!


नात्यांची ही 'पानगळ', ' नवी पालवी' कधीही कशीही कुठेही बहरते !!!

काळवेळ न बघता केव्हाही बहरतच जाते, बहरतच जाते !!!


जगण्यासाठी नवा 'बीजमंत्र' जणू देऊन जाते !

जून्या नव्या नात्यांची घट्ट विण कशी असावी !!


मी स्वतःसाठी ऋतुचक्राचा कानमंत्र घेऊन !

स्वतःच ठरवते, माझ्यासाठी जून्या नव्या नात्यांची घट्ट विण कशी असावी !!

जून्या नव्या नात्यांची घट्ट विण कशी असावी !!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract