आज कशी अचानक गंधाळली रातराणी
आज कशी अचानक गंधाळली रातराणी
आज कशी अचानक गंधाळली रातराणी ?
स्पर्श तुझा झाल्यावर शहारली रातराणी
गुंफले जेव्हा एकमेकांच्या हातात हात
तना-मनाच्या प्रेमात मोहोरली रातराणी
तुझ्या ओठांचा माझ्या ओठांशी हलकासा स्पर्श
त्या गोड चुंबन धुंदीत धुंदावली रातराणी
सांग सख्या कधी शमेल ही आग शरीराची ?
श्वासांत गरम श्वास मिसळवतांना थंडावली रातराणी
हलके-हलके बुडत गेलो डोहात प्रणयाच्या
मिठीत तुझ्या आल्यावर सैलावली रातराणी