Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Vijay Sanap

Others

3  

Vijay Sanap

Others

कुंकवाचा करंडा

कुंकवाचा करंडा

1 min
1.5K


दिसे चार पाय डोळे

भासे मळवटा परी

लाल पिवळा कासव

शोभे तुझ्या हातावरी ।।


कुंकू हळद वाहून

केली पूजा आराधना

घेता दर्शन पायरी

सुख वाटे भक्तगणा ।।


जगदंबा दरबारी

कुंकू हळद करंड

रुप भासे ते अंबेचे

दिसे कान डोळे तोंड ॥


रुप तुझे गं पाहून

मज वाटे गं प्रसन्न

तुझी किमया अफाट

मन होई माझे सुन्न ।।


कासवाच्या आकारात

तुझा मुखवटा भासे

अंबे दारी मान पान

कसा कासवाला असे ।।


Rate this content
Log in