सतमार्ग
सतमार्ग
ठेऊ नये । सूडाची भावना ।
मंगल कामना । दुजे प्रती ॥ १॥
देऊ नये थारा । कंपोत वृत्तीला ।
नि माणुसकीला । सोडू नये ॥२॥
अढी इतरांची । ठेऊनि मनात ।
कधीच मनात । जळू नये ॥ ३॥
द्वेषभाव जर । उपजे मनात ।
विष जीवनात । मिसळले ॥ ४॥
क्षमा करण्यात । असे पुरूषार्थ ।
त्यात परमार्थ ।शोध घ्यावा ॥ ५॥
तोंडाशी लावणे । मूर्ख माणसांसी ।
सुज्ञ माणसांसी । शोभती ना ॥ ६॥
म्हणुनिया दिनू । मौन तू धरावे ।
व्यर्थ ना करावे । वार्तालाप ॥ ७॥