Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Dr. Razzak Shaikh 'Rahi'

3  

Dr. Razzak Shaikh 'Rahi'

लोकशाही

लोकशाही

1 min
16.4K


आपली अवस्था पाहून लाजली ही लोकशाही

जनमानसात आता रुजली ही लोकशाही

बांधलाय चंग 'त्यांनी' इतिहास बदलण्याचा

धास्तावली, भांबावली, खचली ही लोकशाही

भाग पाडले तयांनी मुजरा करायला

पायात चाळ बांधूनी नाचली ही लोकशाही

वृद्धाश्रमी रवानगीची सारी तयारी झाली

लेकरांचं 'कर्तृत्व' पाहून हसली ही लोकशाही

'ते' बोलले की बोलण्याचा सा-यांना हक्क नाही

ऐकून सर्द झाली, थिजली ही लोकशाही

मतदान करण्यापुरतं जनतेला स्थान आहे

बेबंद शासकांमुळे नासली ही लोकशाही



Rate this content
Log in