Quotes New

Audio

Forum

Read

Contests


Write

Sign in
Wohoo!,
Dear user,
विठु सावळा
विठु सावळा
★★★★★

© Shital Yadav

Others

1 Minutes   6.8K    16


Content Ranking


युगे अठ्ठावीस । विटेवरी उभा

झळाळे ही आभा । विठ्ठलाची ।।


पंढरीचा देवा । विठ्ठल बरवा

ओढ लागे जीवा । दर्शनाची।।


भाळी शोभे टिळा । कर कटीवर

वस्त्र पितांबर । मनोहारी ।।


सुंदर हे रुप । संगे रखुमाई

अवघी विठाई । शुभंकर ।।


नामाचा गजर । आषाढीचा पर्व

दंग होती सर्व । कीर्तनात।।


धन्य ही नगरी । संतांची संगती

वारकरी येती । भक्तीभावे ।।


मनोभावे भक्ती । घडो तुझी सेवा

पंढरीच्या देवा । अखंडित ।।

विठ्ठल वारकरी पंढरपूर

Rate the content


Originality
Flow
Language
Cover design

Comments

Post

Some text some message..