हळवं मन...
हळवं मन...
1 min
811
आभाळ फाटलं तांबड फुटलं,
सोनेरी पीवळ होऊन फाकल,
परतली निशा उजळल्या दिशा,
सोनेरी सोनेरी उन ओसंडल,
रानात वनात वारा सोसाटला,
गुटूर गुटूर पारवा घुमला,
ढगांचा विजांचा आकाशी तांडवा,
टिपूस टिपूस पाउस गारवा,
काळोख्या रातीला चांदाच कोंदण,
टिपूर टिपूर ताऱ्यांच चांदण,
ओलेत्या दवात पहाटेच येण,
चिंब चिंब झाल हळवं मन