Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Shital Yadav

Romance

2  

Shital Yadav

Romance

प्रीत माझी

प्रीत माझी

1 min
7.5K


जीवलगा सख्या प्रीत तराणे ऐसे तू छेडीले

विसरुनी भान होऊनी धुंद मी न माझे राहीले


अस्त रवी झाला, आला नभी शुक्रतारा

गंधीत वारा, दरवळे हा ओला किनारा

खुलता कळी मनाची हळूच मी लाजले

विसरुनी भान होऊनी धुंद मी न माझे राहीले


अलवार स्पर्शाने अधर ही थरथरले

येऊनी वसंत जीवनी तनमन मोहरले

चाहूल तुझी लागता प्राजक्त मनी बहरले

विसरुन भान होऊनी धुंद मी न माझे राहीले


मिटता नयन हे स्वप्नी मज तूच दिसे

रोमरोमात बनूनी प्रीत सख्या तूच वसे

मिठीत येता अबोल श्वास हे गुणगुणले

विसरुनी भान होऊनी धुंद मी न माझे राहीले


तुझ्याच संगतीने जीवनाचा अर्थ कळे

समीप नसता नजर तुला वेड्यापरी शोधे

आरंभ अंत सर्वस्व तूची जीवन अलंकारीले

विसरुनी भान होऊनी धुंद मी न माझे राहीले


फेनील धबधब्यापरी ओसंडूनी वाहले

सुटता धीर भावनांचा व्याकूळ मन धावले

परीस स्पर्शाने सर्व विश्वची स्वर्णमय झाले

विसरुनी भान होऊनी धुंद मी न माझे राहीले


Rate this content
Log in