Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

UMA PATIL

Fantasy

3  

UMA PATIL

Fantasy

असेलही नसेलही

असेलही नसेलही

1 min
6.9K


अजून चंद्र उगवला, असेलही नसेलही

अजून सूर्य हरवला, असेलही नसेलही


ठिगळ नवे किती, कुठे, कसे जरी लावले

तरी कपडा उसवला, असेलही नसेलही


अंगार या धरतीच्या देहाचा शमवावा कसा ?

पावसाने वणवा शमवला, असेलही नसेलही


बांधायचे घर होते, ओंजळ रितीच त्याची होती

भिकाऱ्याने पैसा जमवला, असेलही नसेलही


आली नाहीत अंत्ययात्रेला माणसे अजूनही

पत्राने निरोप कळवला, असेलही नसेलही


तब्येत आज घोड्याची, वाटते बरी नाही

तरी शर्यतीत घोडा पळवला, असेलही नसेलही


काही न खाता लेकरू, भुकेच झोपले कसे ?

आईने घास भरवला, असेलही नसेलही


अजून ना आली तू, अजून ना नभास लाली

तिथे पलीकडे कोंबडा आरवला, असेलही नसेलही


Rate this content
Log in