जीव तळमळला
जीव तळमळला
1 min
1.5K
खूप झाला हा लपंडाव आता
समोरी येऊन मिठीत घे मला
जीवघेणा डाव प्रेमाचा खेळून
हा जीव तळमळला
तुझ्या नकाराच्या नजरेत
दडलेले होकाराचे आसू
अश्रुत विरहाच्या
दडलेले प्रेमाचे हसू
कोडे नव्याने सोडवताना
अजुनी कोड्यात पडला
जीवघेणा डाव प्रेमाचा खेळताना
हा जीव तळमळला....