जबाबदारी
जबाबदारी
1 min
646
समोर टेबलवर पडलेला पेन खुणावतोय..
म्हणतोय लिहून काढ तुझ्या मनातले कच्चेपक्के सारे शब्द..
पण कागदावरती उमटणारे ते शब्द फक्त शब्द नसणार ना..
त्यात भावभावना..
गुपितं..
मनाची घालमेल..
भूतकाळाची जळमटं..
नव्या ऊमेदीचे कवडसे..
आणि अजून काय-काय..
त्या बिचा-या कागदावर तरी किती जबाबदारी द्यावी..?