Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Dinesh Kamble

Others

4  

Dinesh Kamble

Others

चारोळी.

चारोळी.

1 min
5.9K


०१]पाऊल..

का ग इतक्यात अडखळल.

सैराट होत जे पाऊल तुझ..

जबाबदारीच्या चिखलात.

तू रुतुवुन बसली का पाऊल तुझ..?


२]पाऊल ..

माझ्या अंगणात पडो.

तुझ्या पावलांचे ठसे...

रोज घडते स्वप्नात

आता खरे व्हावे असे..


३]पाऊल..

माझ्या ग पावलांवर.

ठसे तुझ्या पावलांचे...

सोबतीला माझ्या राणी.

सदा असे चालायचे....



४]पाऊल..

पावलांनी माझ्या

केली संगत नित्य...

दामल्या भागल्याच.

नाही केल कधी निमित्य..



५]पाऊल..

माणसाच एक पाऊल.

आधुनिक विज्ञान जगात...

दूजे पाऊल अजूनही अडकले.

रुढी अंधश्रद्ध्येच्या युगात..



६]पाऊल

तुझ्या सोनेरी पावलांनी .

माझ अंगण बहरून आल ...

तुझे पाय लागले अंगणी.

माझ्या मनातल झाल



७] पाऊल..

टाक अलवार तुझ पाऊल.

सजल्या फुलांनी रणवाटा...

मी काळजाच्या करतो पायघड्या.

रूतू नये तव पाऊली विरहकाटा...


८]पाऊल..

वर्षे सरली आता सोळा.

यौवन देते पाहा चाहूल...

एक सांगणे माझे तुला

पोरी जपून टाक तू पाऊल...



९]पाऊल..

तिच्या पावलागणिक हल्ली.

उठे काळजात या कंप..

तिच्या डोळ्याला भिडता डोळा

होतो काळजात या भूकंप...


१०]पाऊल..

तुझ्या पावलांवर हल्ली.

झुलतात चारचौघे...

तिच्या हास्यावर फिदा

होतात दोघेतिघे...

___________________________


Rate this content
Log in