कसरत
कसरत
आयुष्य जगणे जीवघेणी शर्यत
पोटासाठी धावाधाव दिवसरात्र
साऱ्या आघाड्यावरती धावून
थकून जाते मन शरीर गात्र ।
मृगजळासम ध्येय दूरवर
पैसा, प्रतिष्ठा बनली गरज
सुखापाठी करायची मरमर
आरोग्यही सांभाळावे दररोज ।
कितीही झाले गतीमान जीवन
स्वतःसाठी काढावा थोडा वेळ
जपायचे छंदाला जाणीवेने
व्यायाम, खेळाचा घालून मेळ ।
कसरत लीलया पेलतो माणूस
आधुनिकतेचे दान; धावपळ
जगण्याची धडपड करताना
जरी झाली कितीही तारांबळ।