श्वास तुझ्या स्वप्नाचा...
श्वास तुझ्या स्वप्नाचा...
आज फिरुनी वारे
तेच गीत का गाई
पाश नात्याचे सारे
मला दोष का देई
नयनी कोरडे वारे
रात काजवे या मनी
उरी भरूनी हे वाहे
भाव कोरडे साहुनी
श्वासातही आस जागे
भासात स्वप्न आहे
असुनी नसण तुझं
मला छळू का पाहे
मरणात माझ्या या
दोष कोणास ठेऊ
उरल्या श्वासाच या
देण कोणास देऊ
भास तुझ्या स्वप्नचा
ह्रदयी या उरु पाहे
श्वास या जगण्याचा
विरह तुझा हा साहे
वेंधळी असे ती सांज
पहाट बावरी झाली
विखुरलया भावनेस
मनी खिळवुनी गेली
रोजचीच कथा जुनी
बहाणा नवा का शोधी
भास तुझ्या स्वप्नाचा
मनास जीवन देई