Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Meenakshi Kilawat

Tragedy

3.3  

Meenakshi Kilawat

Tragedy

इच्छाशक्ती

इच्छाशक्ती

1 min
286


शवासमान झाल शरीर मती गेली कुंठूनी

कुठून आणू इच्छाशक्ती मोलमजूरी करूनी.!!


उजेड गेला कूठे दिसतच नाही कूठे

रीतभात कैसी गुदमरती जीव मनी..!!


हार होता सुगंधीत गुलाबांच्या नाजूक फुलांचा 

पण सोबत धाग्यात विणली खुळ्या व्यथांनी..!!


स्वप्नात भंगलेल्या त्या सुप्त कामनां माझ्या

खपली चढली त्यावर रक्ताळलेल्या वेदनांनी..!!


जगले कसे किती मी आघात सोसतांना

एक तोच आहे रे माझ्या श्वासात गुंतूनी..!!


दिसतात रोज येथे विघ्ने हजार मजला 

कुणा कळणार काय शल्ये काळीज देवूनी..!!


स्वार्थात धूंद खुळले नाही कुणी कुणाचा  

शुभकामनेस झाले मोकळे पाठीत वार करूनी.!!


माझ्या श्वासात गुंतलेला हा सुंगधीत वारा

नाही भरता आला अंगी जव्हार पेटवूनी..!!


अवहेरले कितीदा केलीस ना कधीही पर्वा

मैफल भावनेची मग जमलीच नाही रंगूनी.!!


 मनास सोसली नाही जीवनी बोच आठवांची

पाषाण झाले काळीज तरी इच्छा सदा दुनावूनी.!!


नियतीने मांडल्या माझ्या सरणावरी शलाका 

सांंगायचे कुणाला येई खोडात तेल जळूनी.!!


मजला कधी सुखाचा नाही कधी मिळाला

जगले आसवांचा डोळ्यात खार वितळूनी..!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy