Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Abasaheb Mhaske

Inspirational

3  

Abasaheb Mhaske

Inspirational

तुम्ही कुल , आम्ही कुल

तुम्ही कुल , आम्ही कुल

1 min
380



हात - घडीचा संयोग इथला

खेळ खुर्चीचा रंगला डाव ...

तू चोर , मी साव

तुम्ही कुल , आम्ही कुल


चिंता नको मागाल ते मिळेल

तुमचा भाव आपोआप कळेल

विचार कसला करताय ?

तुम्ही कुल , आम्ही कुल


चिखलात रुतलंय

कमळाचं फुल ...

एप्रिल फुल , एप्रिल फूल

तुम्ही कुल , आम्ही कुल


खूप काही घडतंय

घडतंय , बिघडतंय

आम्ही मात्र ढिम्म ...कसे ?

तुम्ही कुल , आम्ही कुल



नकोच आता ती मते- मतांतरे ...

मीच राजा माझ्या मर्जीचा

पटत नसेल तर चालते व्हा

तुम्ही कुल , आम्ही कुल


आखून घ्यावी सीमारेषा

बिनधास्त व्हावे क्षणभर

भलेही भोवताली घडो काहीही

तुम्ही कुल , आम्ही कुल


कुणी मारावी बेडूक उडी

कुणी गावी कुणासाठी अंगाई

कुणी मांडावी चूल वेगळी

तुम्ही कुल , आम्ही कुल


स्वातंत्र्याची सत्तरी साजरी

लोकशाहीचा राजा आजही

शोधतोय अन्न , वस्त्र ,निवारा

तुम्ही कुल , आम्ही कुल

लोकशाही असून ठोकशाही

अनुभवावी आतून - आतून

तुम्हारी भूल , हमारी भूल

तुम्ही कुल , आम्ही कुल



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational