Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Mangesh Medhi

Classics

2  

Mangesh Medhi

Classics

पाऊस आला पाऊस आला

पाऊस आला पाऊस आला

1 min
472


धो-धो पाऊस आला धो-धो पाऊस आला

 

टपटप टपटप थेंबांचा नाच

तड-तड तड-तड गारांचा ताल

गारा वेचायची शर्यत लावू

कागदाच्या होड्यांची स्पर्धा खेळू

ओले चिंब भिजुन न्हाऊ 

आईचा ओरडा, रेनकोट घाल ! रेनकोट घाल !


धो-धो पाऊस आला धो-धो पाऊस आला 


झरझर झरझर सरीवर सर

गडगड गडगड गरजती ढग

बेडकाचे गाणे ऎकून हसू

सरी संगे नाच नाचू

रंगांची कमान आभाळात छान

आजोबांच एकच, पुरे रे आता ! पुरे रे आता !


धो-धो पाऊस आला धो-धो पाऊस आला 


रपरप रपरप पानांची साद

काडकाड काडकाड विजेचा रॉक

गोल गोल फ़ेर धरु पावसाची गाणी म्हणू

धडामधुडूम आवाजाने घरात पळू

साऱ्यांचा गलका,

फ़िटली ना हौस ! फ़िटली ना हौस !


धो-धो पाऊस आला धो-धो पाऊस आला

धो-धो पाऊस आला धो-धो पाऊस आला


Rate this content
Log in