Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

kishor zote

Others

3  

kishor zote

Others

कशासाठी ? ( अभंग रचना )

कशासाठी ? ( अभंग रचना )

1 min
7.0K


कुटुंबा उध्दारी | सांभाळ ती करी I

हुंडाबळी ठरी I कशासाठी ? ॥१॥

स्त्री मुक्तीचा लढा | भाषणे ठोकती I

दासी घरात ती I कशासाठी ? ॥२॥

पहिली मुलगी | लक्ष्मीच घरात |

घडे गर्भपात I कशासाठी ? ॥३॥

मुली कोठे कमी | अनमोल ठेवा I

हवा वंशा दिवा I कशासाठी ? ॥४॥

वासनेचा डाव I आंतरीची हाव I

प्रेमाचा तो आव I कशासाठी ? ॥५॥

बलात्कार करी I दिस असो रात्र I

हवे असे मित्र I कशासाठी ? ॥६॥

उच्च निच्च सदा | शिकवण देतो I

धर्म म्हणवतो I कशासाठी ? ॥७॥

महामानवाला I साऱ्या विसरला I

पुजीतो ढोंग्याला I कशासाठी ? ॥८॥

देशात ऐक्यता I नांदतच नाही I 

बाटतो धर्म ही I कशासाठी ? ॥९॥

देव आणि भक्त I घडण्यास भेटी I

तेथे दानपेटी | कशासाठी ? ॥१०॥


Rate this content
Log in