Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Sanjay Raghunath Sonawane

Inspirational

2  

Sanjay Raghunath Sonawane

Inspirational

हक्क जगण्याचा

हक्क जगण्याचा

1 min
7.3K


द्वेषापोटी बळी जातो आमचा जनसामान्यांचा

दररोजचे जगणे संघर्षाचे सवाल असतो उद्याचा

पोटाची खळगी भरणे हा मार्ग असतो नित्याचा

शांततेचे जीवन मिळावे हा हक्क आहे प्रत्येकाचा


कष्ट मिळावे दोन हाताना नको कुणाची लाचारी

फुकटचे जीवन जगणे हा भार आहे पृथ्वीवरी

आळस म्हणजे निराश जीवन आयुष्याचा नाश करी

सदा कष्टाचे जीवन देई मान सन्मान संसारी


कष्टाने मिळते भाकर त्याची चवच मिळते न्यारी

आयते बसून खाणे हे पाप सदाचे डोक्यावरी

फुकटची श्रीमंती देई अशांतता जीवनभर

कष्टाचे जीवन देई सुख समाधान आयुष्यभर


कष्टाचे जीवन आहे आरोग्याचे खुले दालन

आळसाने अनेक रोगांची होते कायमची लागण

आळसाचे जीवन आहे अप्रगतीचे लक्षण

कष्टाने माणूस शोभून दिसतो हेच खरे शिक्षण


गुंडानाही शिक्षा व्हावी न्याय मिळावा लवकर

जरब बसवी त्यांना शिक्षेची कायदा असावा कठोर

जगणे व्हावे आनंदाचे मुक्त संचार करण्याचे

गरीबानाही आधार मिळावा जीवन सुखी जगण्याचे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational