Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Balika Shinde

Others

3  

Balika Shinde

Others

नात्यातले कुंपण

नात्यातले कुंपण

1 min
13.9K


नात्यातही कुंपण असते हे मला वयात आल्यावर कळले....

जेंव्हा मला आईने कडक शब्दात समाजात कसे वागायचे हे शिकवले.....

*तेंव्हा मला नात्यातले कुंपण कळले*


कधी मन नको त्या गोष्टीकडे

वळले .....

तर त्याचा काय परिणाम होतो

हे बाबाने उदाहरणार्थसहित समोर मांडले....

*तेंव्हा मला नात्यातले कुंपण कळले...*


मित्रमैत्रिणींना किती जवळ करायचे हे ताई दादाने त्यांच्या अनुभवातून समजावले....

*तेंव्हा मला नात्यातले कुंपण कळले*


वयाने आणि कतृत्तवाने कितीही मोठे झालो तर मोठ्यांचा आदर कसा करायचा हे माझ्या आजीआजोबाने मायेने सांगितले...

*तेंव्हा मला नात्यातले कुंपण कळले*


संकट काळी एकमेकांमधले मस्तर ,द्वेष विसरून आत्मियतेने मदत कशी करायची हे शेजाय्रांनी त्यांच्या कृतीतून दाखवून दिले...

*तेंव्हा मला नात्यातले कुंपण* *कळले......*


कोणत्याही नात्याला कुंपण हे हवे....

नात्यात मर्यादा आणि आदर टिकून राहण्यास अदृश्य रूपी कुंपणाची नक्कीच मदत होते......


Rate this content
Log in