Quotes New

Audio

Forum

Read

Contests


Write

Sign in
Wohoo!,
Dear user,
माझा बळीराजा
माझा बळीराजा
★★★★★

© Shabana Mulla

Tragedy

1 Minutes   405    39


Content Ranking

*बळी राजा


माझा सोन्याचा संसार

जरी पोट शेतीवर

घाम गाळतो अंगाचा

रोज काळ्या मातीवर|१|


करी शेतीची राखण

झाडे मोठी बांधावर

असे काटेरी बाभूळ

उभी राही काठावर|२|


नांगरणी कुळवणी

कामे किती मेहनती

सर्जा राजा सोबतीला

दिनरात काम करी|३|


हळूहळू वाफ्यातुन

मोटारीचे पाणी जाई

ध्यान ठेवी शेतकरी

जशी तान्हुल्याची आई|४|


धान्य पिके भरपूर

प्रेम आहे शेतावर

जशी लाडाची बायको

जीव लावी माझ्यावर|५|


माझं सपान फेडती

माझे हिरवे शिवार

डोळा भरून येईल

सुखी होईल संसार|६|


बैले जुंपतो गाडीला

जातो घरच्या वाटेला

झोप लागे गाडीतच

वाटे आराम जीवाला|७|


मुकी बैल जोडी माझी

माझ्या साथ जीवनाची

वाटे मनाला माझ्याही

आज आस जगण्याची।८।

शेती नांगरणी कुळवणी

Rate the content


Originality
Flow
Language
Cover design

Comments

Post

Some text some message..