Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

kishor zote

Inspirational

3  

kishor zote

Inspirational

वचन

वचन

1 min
11.8K


वचन दिले होते

स्वतःचे स्वतःला

वराती मधील प्रसंग

लागो ना विसरायला ॥ १॥


अज्ञान हेच जाणले

समस्येच्या मुळाला

स्त्रीयांना केले शिक्षित

पत्निसह विडा उचलला ॥ २ ॥


हंटर कमिशन पुढे

स्पष्ट वक्ता जाहला

शेतकऱ्यांचा आसूड

व्यवस्थेवर ओढला ॥ ३ ॥


शोधले महाराष्ट्राच्या

आराध्य दैवताला

पुजीले मनोभावे

शिवरायांच्या समाधीला ॥ ४ ॥


अनिष्ठ रुढी परंपरा

त्यागीले त्या धर्माला

सत्य प्रकाशात

पदरी सत्य धर्म टाकला ॥ ५ ॥


महात्मा ज्योतीबा फुले

वचनाला तुम्ही जागला

सर्व नतमस्तक तुम्हा पुढे

तोड नाही तुमच्या कार्याला ॥ ६ ॥



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational