Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

गोविंद ठोंबरे

Fantasy

3  

गोविंद ठोंबरे

Fantasy

गाव वारं

गाव वारं

1 min
7.0K


गहिवरलं आभाळ सारं

शेत वाऱ्याच्या संगतीनं ।

बांधावरल्या भरजरीनं

हिरव्या शालूचं नेसनं ।।


बाया बापड्या भोळ्या माझ्या

धनी राजाच्या सोबतीनं ।

कष्ट पाझरून ओटी

माय हासते गोडीनं ।।


भरल्या अंगाचं लेकरू

झिजतं मळक्या अंगानं ।

कौल पडल्या शेणा-मातीचं

घर नांदते गुण्या-गोविंदानं ।।


नको बीज तुझ्या शहराचं

वेड लागलं रान मातीनं ।

आड-विहीरीच्या पाण्यानं

खळगी भरलिया चवीनं ।।


पडक्या शाळेचं गाव बरं

नको झपाटलेलं शहर गाणं ।

इथं माणुसकीची नाती

नको मोडाया शहर संगतीनं ।।


ऊन वाऱ्याची झळ बरी

न्याहारी कष्टाची साथीनं ।

गुरं ढोराचं माझ्या माहेर

भरलं दही-दुधाच्या लोण्यानं ।।


खेळ गडी उनाड रांगडा

थाप मारीतो जिद्दीनं ।

तुझ्या शहराच्या दिव्याखाली

लई अंधार लोक वस्तीनं ।।


वास खेड्यातला खमंग

चुलीवरल्या भाकरीनं ।

भाऊ-भावकीचा वाडा माझा

कसा ओघळतो मायेनं ।।


गाव खेडी माय बाप

नाळ बांधली देवानं ।

नाही सुटायाचा खुमार

जन्म सार्थकी या जगण्यानं ।।


आता येऊ दे रे सरी

माझ्या गावाकडल्या वाटेनं ।

सुख भांगेत भरून

श्रावणी मधु-चंद्राच्या ओढीनं ।।


Rate this content
Log in